कधीकधी बाळ दूध प्यायल्यानंतर लगेच उलटी करते.अनेकदा नवमाता या गोष्टीमुळे घाबरून जातात. अशावेळी बाळाची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. प्रत्येक वेळी बाळाने उलटी करणे हे गंभीर असलेच असे नाही.जसलोक हॉस्पिटलचे कन्सल्टंट पिडीएट्रिशन डॉ.राजू खूबछबदानी यांच्या मते उलटी करणे हे शरीराच्या प्रोटेक्टीव्ह मेकॅनिझम पैकी एक आहे.त्यामुळे शरीराला जे नको असते ते शरीर नैसर्गिकरित्या बाहेर टाकते.
कोणताही निष्कर्ष काढण्यापुर्वी बाळाची उलटी करण्याची कारणे तपासून बघा.डॉक्टरांच्या मते जर तुमचे बाळ दिवसभरात एकदा अथवा दोनदा उलटी करत असेल व इतर बाबतीत ते व्यवस्थित हसत-खेळत असेल तर त्यात काळजी करण्याचे काहीच कारण नाही.कारण कधीकधी तान्हे बाळ दूध भरवल्यानंतर लगेच अथवा ढेकर घेताना थोडेसे दूध बाहेर टाकते जे अगदी सामान्य आहे.बाळ दिवसभर सतत उलटी करते का याकडे नीट लक्ष द्या.
जाणून घ्या बाळाच्या रडण्यामधून त्यांच्या मनातील भावना कशा ओळखाल ?
काय कराल?
- प्रथम तुमचे बाळ दिवसभर उलटी करते आहे का हे नीट पहा व नंतरच डॉक्टरांची अपॉईंटमेंट घ्या.
- बाळ मोठे असल्यास त्याला पातळ डालखिचडी अथवा फळांचा रस द्या.मात्र बाळाला जबरदस्ती भरवू नका.स्तनपान करण्या-या मातेने स्वत:ला हायड्रेट ठेवा.
- जर तुमचे बाळ दूध प्यायल्या नंतर दह्याप्रमाणे चिकट द्रव्य ओकत असेल तर त्याला दूधाबरोबर हवा पोटात गेल्यामुळे तसे होत आहे.असे असल्यास स्तनपान करताना त्याची पोझिशन बदला.बाटलीतून दूध पाजत असाल तर बाटली ऐवजी पेला व चमच्याने दूध पाजा.
- तुमचे बाळ डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्या नाहीतर त्याला आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
- घाबरु नका व उलटी केल्यावर बाळाला जबरदस्ती पाजण्याचा प्रयत्न करु नका.डॉक्टरांच्या मते थोडावेळ दूध न पाजल्यास बाळाला त्रास होणार नाही.प्रथम बाळाच्या शरीराला आपोआप योग्य स्थितीत येेऊ द्या मगच त्याला दूध पिऊ द्या.
काळजी करण्याची केव्हा गरज आहे?
- उलटी करणे चुकीचे नाही पण कधीकधी हे धोक्याचे लक्षण देखील असू शकते.
- डॉक्टरांच्या मते डायरिया व सतत उलटी होणे हे पोट अथवा आतड्यांमध्ये इनफेक्शन असण्याचे लक्षण असू शकते.
- डिहायड्रेशन मुळे बाळाला सतत उलटी होऊ शकते.
- डॉक्टरांचा मते बाळ हिरवट उलटी करत असल्यास त्याच्या आतड्यांमध्ये काही समस्या असू शकतात.
- उलटी सोबत रक्त येत असल्यास बाळाला त्वरीत वैद्यकीय मदतीची गरज आहे.
- बाळाला उलटीच्या त्रासासोबत सतत झोप येत असल्यास हे एक गंभीर लक्षण असू शकते.
- डोक्याला मार लागल्यामुळे उलटी होते.
- भूक न लागून तुमचे बाळ उलटी सोबत गडद शू करत असेल तर बाळाला यकृताचा त्रास असू शकतो.
- कधीकधी मज्जासंस्थेमध्ये समस्या असल्यामुळे देखील उलटी होऊ शकते.डॉक्टरांच्या मते अचानक मज्जासंस्थेमध्ये इनफेक्शन झाल्यामुळे अथवा ट्यूमर मुळे डोक्यावर ताण येतो व उलटया होतात.
उलटी होत असल्यास डॉक्टर काय करतात?
डॉक्टर यासाठी तुमच्या बाळाला उलटी थांबण्याचे औषध देतात व काही सूचना देतात त्या तंतोतंत पाळा.डॉक्टरांच्या मते तुमच्या बाळाला उलटी झाल्यानंतर लगेच भरवू नका.त्यामुळे बाळाला औषध दिल्यावर एक अथवा अर्धा तासाने भरवा.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock