गरोदरपणात स्त्रीने आहाराबाबत प्रचंंड सावध रहायला हवे.अशा स्थितीत ज्याप्रमाणे काही पदार्थ आवर्जुन खाणे गरजेचे असते त्याचप्रमाणे काही पदार्थ जाणिवपुर्वक न खाणेही तितकेच महत्वाचे असते.कारण काही पदार्थ जरी हेल्दी असले तरी गरोदरपणी ते खाल्याने तुम्हाला व तुमच्या बाळाला त्रास होऊ शकतो.यासाठी जाणून घेऊयात गरोदरपणात नेमके कोणते पदार्थ खाणे टाळावे.नक्की वाचा गर्भवतीस्त्रीच्या आहारात आवश्यक असलेली दहा सुपरफूड्स
१.कच्ची व कमी शिजवलेली अंडी-
गरोदरपणात अंडी खाल्याने तुम्हाला प्रोटीन मिळू शकत असले तरी कच्ची अथवा कमी शिजवलेली अंडी खाल्याने तुमच्या बाळाला त्रास होऊ शकतो.कच्चा अंड्यामुळे तुम्हाला सॅल्मोनेला इनफेक्शन होऊ शकते.यामुळे ताप,मळमळ,उलटी,पोटात गोळा येऊन गर्भाला इनफेक्शन होण्याचा धोका असतो.यासाठी व्यवस्थित उकडलेले अथवा शिजवलेले अंडे खा.
अनपाश्चराईज्ड दूध अथवा दूधाचे पदार्थ-
गरोदरपणी एक ग्लास दूध घेतल्याने तुमच्या शरीराला कॅल्शियमचा पुरवठा होऊ शकतो पण लक्षात ठेवा हे दूध पाश्चराईज्ड असणे आवश्यक आहे.कारण अनपाश्चराईज्ड दूधातील बॅक्टेरीया मुळे तुम्हाला बॅक्टेरीया इनफेक्शनचा धोका वाढतो.हा धोका गरोदर स्त्रीला इतर स्त्रीयांपेक्षा २० पट अधिक असू शकतो.गरोदरपणात प्रत्येकवेळी तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी असणे हे त्यामागचे एक कारण असू शकते.या इनफेक्शनचा संसर्ग बाळाला होऊन प्रिटर्म लेबर येणे,अचानक गर्भपात होणे,स्टीलबर्थ अशा समस्या होऊ शकतात.
न शिजवलेले सि-फूड-
कच्चे व न शिजलेले सि-फूड खाल्याने आईला इनफेक्शचा संसर्ग होऊन बाळाला धोका निर्माण होऊ शकतो.काही प्रकारच्या फिशमध्ये पार्याचे प्रमाण अधिक असल्याने बाळाचा मेंदूच्या विकासावर त्याचे दुष्परिणाम होतात.जेव्हा तुम्ही गरोदरपणात कोणते मासे खाताना जाणिवपुर्वक हाय मर्क्युरी असलेला टूना हा शेलफीश खाणे टाळा.
फिश मध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसीड असल्याने ते तुमच्या गरोदरपणातील आरोग्यासाठी व बाळाच्या विकासासाठी ते खाणे तुमच्या फायद्याचे असू शकते.यासाठी गरोदरपणात मासे खाण्यासाठी ताज्या पाण्यातील रोहू,काटला व पापलेट या कमी मर्क्युरी असलेल्या फिशनां व्यवस्थित शिजवून खा.फ्रिजमधले रेजी-टू-कुक मासे खाणे टाळा. जाणून घ्या गर्भारपणात काय खाणे टाळाल ?
४.हर्बल टी-
अळशी,ग्रीन-टी,पेपरमिंट घटक असलेल्या हर्बल-टी मुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते.२०१२ मध्ये करण्यात आलेल्या संशोधनानूसार शेवटच्या दोन तिमाहीमध्ये हर्बल टी घेतल्याने बाळाचे वजन कमी होत नाही.पण तरीही हा धोका न पत्करणेच योग्य असू शकते.
५.कच्चे स्पाऊट्स अथवा भाज्या खाणे-
सला़ड मध्ये कच्चा भाज्या खाणे चुकीचे नाही पण त्या खाताना सावध रहाणे खुप गरजेचे आहे.यासाठी भाज्या कापल्यानंतर खुप वेळ उघड्यावर ठेऊ नका.कारण असे केल्याने त्याला जंतुचा संपर्क होऊन तुम्हाला फूड पॉयझनिंग होऊ शकते.
त्याचप्रमाणे मोड आलेली कडधान्ये देखील पाण्याने स्वच्छ न करता खाऊ नका कारण त्याने देखील बाळाला इनफेक्शनचा धोका होऊ शकतो.यासाठी मोड आलेली कडधान्ये शिजवून अथवा उकडून मगच खा.
६.चायनीज पदार्थ-
गरोदरपणाचे नऊ महीने चायनीज खाद्यपदार्थांपासून दूर रहाणेच योग्य आहे.एका संशोधनात याबाबत उंदरावर प्रयोग केल्यास असे आढळून आले आहे की चायनीज पदार्थातील अती सोडीयम व मोनोसोडीयम ग्लूटामेट या घटकामुळे बाळाचे वजन वाढते व विकास कमी होतो.त्याचप्रमाणे कोणतेही सोडीयमयुक्त पदार्थ गरोदर स्त्रीने टाळणेच योग्य आहे.
७.गरोदर महीलेला अॅलर्जी असलेले पदार्थ-
लक्षात ठेवा गरोदरपण हे निरनिराळे पदार्थ अथवा चवी टेस्ट करुन परिक्षण करण्याचा काळ अजिबात नाही.त्यामुळे तुम्हाला अॅलर्जी असलेले पदार्थ खाण्यापासून दूर रहा कारण याचा परिणाम थेट तुमच्या बाळाच्या विकासावर होऊ शकतो.
८.आर्टिफिशीयल स्वीटनर-
ब-याच जणींना हे माहीत नसते की आर्टिफिशीयल स्वीटनर तुमच्या बाळाच्या व तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही.काही संशोधनानूसार सॉफ्ट ड्रिंकमधील आर्टिफिशीयल स्वीटनर मुळे बाळ वेळे आधीच जन्माला येऊ शकते.त्यामुळे जाणिवपुर्वक यापासून दूर रहा.
९.मध-
मधामुळे गर्भधारणे दरम्यान गर्भावर विपरित परिणाम होतो असे अद्याप कोणत्याही संशोधनात आढळले नाही आहे.तरीही मध कमी प्रमाणात घ्या व ते शुद्ध असेल याची जरुर काळजी घ्या.
१०.शिजे अन्न-
फ्रिजमध्ये ठेवलेले शिळे अन्न खाल्याने तुम्हाला गॅस्ट्रोइनटेस्टीनल इनफेक्शन होऊ शकते.जे तुमच्या व तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
जाणून घ्या गर्भारपणात काय खाणे टाळाल ?
संदर्भ-
1. 1: Tam C, Erebara A, Einarson A. Food-borne illnesses during pregnancy: prevention and treatment. Can Fam Physician. 2010 Apr;56(4):341-3. PubMed PMID:20393091; PubMed Central PMCID: PMC2860824.
2. Tam, C., Erebara, A., & Einarson, A. (2010). Food-borne illnesses during pregnancy Prevention and treatment. Canadian Family Physician, 56(4), 341-343.
3. 1: Moussally K, Berard A. Exposure to specific herbal products during pregnancy and the risk of low birth weight. Altern Ther Health Med. 2012 Mar-Apr;18(2):36-43. PubMed PMID: 22516883.
4. Von Diemen V, Trindade MR. Effect of the oral administration of monosodium glutamate during pregnancy and breast-feeding in the offspring of pregnant Wistar rats. Acta Cir Bras. 2010 Feb;25(1):37-42. PubMed PMID: 20126886.
5. 1: Halldorsson TI, Strøm M, Petersen SB, Olsen SF. Intake of artificially sweetened soft drinks and risk of preterm delivery: a prospective cohort study in 59,334 Danish pregnant women. Am J Clin Nutr. 2010 Sep;92(3):626-33. doi:10.3945/ajcn.2009.28968. Epub 2010 Jun 30. PubMed PMID: 20592133
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock