आपल्या मुलाला भविष्यात दाताचे काही त्रास होऊ नये असे वाटत असेल तर सुरुवातीपासूनच म्हणजे बाळाला दात येण्याच्या वेळेपासून तोंडाचे आरोग्य उत्तम राखायला हवे. साखर घातलेले दूध किंवा फ्लेवर्ड मिल्क याच्या अती प्रमाणामुळे बाळाचे दात खराब होऊ शकतात. तसंच फ्लोराईडचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढल्यास देखील हा त्रास होऊ शकतो. अपोलो व्हाईट डेंटल चे Consultant Periodontist डॉ. सबिता एम. यांनी बाळाच्या दातांचे आरोग्य सांभाळण्यासाठी काही टीप्स सांगितल्या. लहान मुलांच्या दूधाच्या दातांबाबत वेळीच जाणून घ्या या ’8′ गोष्टी !
- तोंडात चमचा किंवा खेळणं घालू देऊ नका.
- जेवल्यानंतर बाळाचे दात व हिरड्या स्वच्छ कपड्याने किंवा कापसाने नीट पुसून घ्या.
- ३-६ वयोगटातील मुलांचे दात घासण्यासाठी फ्लोराईड टूथपेस्ट वापरा. ती वापरताना त्याचे प्रमाण शेंगदाण्याच्या आकाराइतकेच असू द्या.
- pacifier साखरेत बुडवून मुलांना देऊ नका.
- एका ठराविक वयानंतर मुलांना बाटली ऐवजी कपाने दूध पिण्यास प्रवृत्त करा.
- बाळाचे फक्त दातच नाही तर हिरड्या सुद्धा न विसरता स्वच्छ करा. आणि त्यांना हलकासा मसाज करा.
- बाळाला दाताची कोणतीही समस्या नसताना देखील सहा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा दाताचे आरोग्य नक्की तपासा.
- दुधाची बाटली तोंडात ठेवून मुलांना झोपू देऊ नका.
- मुलांना चिकट किंवा साखरेचे पदार्थ देणे टाळा.
लहानपणी अशाप्रकारे तोंडाचे आरोग्य सांभाळ्यास मोठेपणी दातांच्या त्रासांना प्रतिबंध होण्यास मदत होते. मुलांमध्ये दाताचे आरोग्य बिघडल्याची काही लक्षणं दिसत असल्यास सुरुवातीच्या टप्प्यातच त्यावर योग्य उपचार होणे गरजेचे आहे. उपचाराचे स्वरूप हे दाताच्या किडण्याच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. बाळाला दात येताना ही काळजी नक्की घ्या.
सुरुवातीचा टप्पा: सुरुवातीच्या टप्प्यातच योग्य उपचार झाले तर काळजीचे काही कारण नाही. वरच्या पुढील दातांवर सफेत स्पॉट्स सुरुवातीच्या टप्प्यात दिसून आल्यास फ्लोराईड ट्रीटमेंटची आवश्यकता असते. यामुळे दात पुन्हा पूर्ववत होतात.
शेवटच्या टप्प्यात: दातांचे किडणे शेवटच्या टप्प्यात आढळून आल्यास फ्लोराईड ट्रीटमेंट पुरेशी होणार नाही. काही वेळेस दात किडल्यावर मोठ्याना दिली जाणारी ट्रीटमेंट मुलांनाही दिली जाते. यासाठी अनेस्थेशिया दिला जातो. काही वेळेस दात अधिक खराब झाला असेल तर तो काढला जातो.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock