पहिल्यांदा सेक्स करताना थोडसं टेन्शन येत. विशेषतः पुरुषांना, कारण त्यांना सगळं निभावून न्यायचं असतं. तुम्ही कदाचित ऐकलं असेल की पहिल्यांदा सेक्स करताना पुरुष सेक्स लवकर पूर्ण करण्याचा प्रयन्त करतात. पण चिंता करू नका. हे अगदी सामान्य आहे. दिल्लीचे सेक्सॉलॉजिस्ट डॉ. गौतम रैना यांनी पुरुष लवकर सेक्स पूर्ण करण्याचा प्रयन्त का करतात ते सांगितले. जरूर वाचा: पहिल्यांदा ‘सेक्स’करताना पुरूषांनी ठेवावे या ’8′ गोष्टींचे भान !
शीघ्रपतन : पहिल्यांदा सेक्स करण्याच्या ताणामुळे पुरुषांमध्ये शिश्नाची ताठरता येण्यात काही समस्या येऊ शकते किंवा अकाली वीर्य उत्सर्ग/शीघ्रपतन होऊ शकते.. पहिल्यांदा सेक्स करताना जाणवणाऱ्या एक्ससाईटमेन्टमुळे शीघ्रपतन होणे हे अतिशय सामान्य आहे. जर असे झाले तर चिंता करू नका. सवयीने ही समस्या दूर होईल. शीघ्रपतनाची समस्या कमी करतील ही ’5′ घरगुती हेल्दी ड्रिंक्स !
शिश्नाची ताठरता येण्यास समस्या येणे: पहिल्यांदा सेक्स करताना उद्भवणारी अजून एक समस्या म्हणजे शिश्नाची ताठरता न येणे किंवा कमी येणे. याचे मुख्य कारण पहिल्यांंदा सेक्स करण्याचे मानसिक दडपण हे असते. आणि कालांतराने ते आपोआप दूर होते. पण ही समस्या सारखी उद्भवत राहीली तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण शिश्नाची ताठरता न येणे किंवा कमी येणे हे मधुमेह किंवा हृदयविकाराचे लक्षण असू शकते. मधूमेहाचा त्रास असल्यास सेक्सलाईवर होतात हे ’5′ परिणाम
या समस्येवर हा घरगुती उपाय करून बघा.
टीप्स:
बरेचदा सेक्स करणं हा पुरुषांच्या इगोचा भाग बनतो. आपल्या पार्टनरला आनंद आणि समाधान देण्यात आपण कमी पडत नाही ना ही चिंता डोक्यात असते. पण हा विचार करणे सोडा आणि त्या क्षणाचा आनंद घ्या. पॉर्न मुव्हीएज मध्ये पाहीलेले काही डोक्यात ठेऊ नका. कारण ते खरे नसते. हा गेम नसून आपलं आयुष्य आहे. त्यामुळे आपल्या पार्टनर सोबतची जवळीकता अनुभवा त्याचा आनंद घ्या. त्या आठवणी कायम स्मरणात राहतील. सेक्सचा अधिक वेळ आनंद घेण्यासाठी ’10′ हॉट टीप्स !
पहिल्यांदा सेक्स करताना त्रास होण्याची शक्यता असते. हा त्रास दोघांना होऊ शकतो. पण हे सामान्य आहे. याचे कारण lubrication ची कमतरता आहे. हे लक्षात ठेवा व जवळ बाळगा.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock