Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ‘९’मार्गांचा अवलंब करून साथीच्या आजारापासून रहा सुरक्षित !

$
0
0

किटाणू आपल्या परिसंस्थेचा एक भाग आहे. ते सगळीकडेच असतात. अन्न, खेळण्यापासून ते अगदी माणसांपर्यंत आणि काही वेळेस पाण्यातूनही ते आपल्यापर्यंत पोहचतात. त्यामुळे साथीचे आजार पसरतात. पण हे आजार फक्त पाण्यातून नाही तर विविध माध्यमातून आपल्याकडे पोहचतात.  Nanavati Super Specialty Hospital  मुंबईचे जनरल फिजिशियन राहुल तांबे यांनी  घरात जर कोणाला कांजण्या किंवा यासारखे साथीचे आजार झाले असतील तर या आजारात इन्फेकशनपासून परिवारातील इतर सदस्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही टीप्स दिल्या आहेत.

1. सुरक्षित पिण्याचे पाणी: गाळलेले आणि स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरा. त्यामुळे कांजण्या थायफॉईड टी.बी., measles, influenza यांसारखे आजार आणि मल व तोंडावाटे पसरणारे इन्फेकशन म्हणजे थायफॉईड, gastroenteritis अशा आजारांना प्रतिबंध होईल. उकळलेले,गाळलेले की बाटलीबंद पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे ?

2. हात धुण्याचे महत्त्व: हात धुण्यासाठी साबण आणि पाण्याचा वापर करा. हाताचा तळवा, बोटांमधील जागा घासून स्वच्छ धुणे गरजेचे आहे. कमीतकमी १५ सेकंद हात चोळून धुवा. हात पुसण्यासाठी टिशू पेपरचा वापर करा. हॅन्ड सॅनिटाइजर वापरणे योग्य की अयोग्य ?

3. इन्फेकशन होण्याची अधिक संभावना: ज्या ठिकाणी अधिक वावर असतो किंवा ज्या गोष्टी अधिक हाताळल्या जातात म्हणजेच दरवाज्याचे हॅन्डल, फोन्स, आरसा यांसारख्या गोष्टीतून इन्फेकशन पसरण्याचे प्रमाण अधिक असते. क्लोरीन किंवा फिनेल यांसारखी घरगुती जंतुनाशक वापरून तुम्ही स्वच्छता राखू शकता. स्वच्छतेसाठी वापरले गेलेले पेपर्स, कपडा नंतर टाकून द्या.

4. इन्फेकशन झालेल्या व्यक्तीने तोंड झाकून घ्यावे: इन्फेकशन झालेल्या व्यक्तीने स्वच्छ कपड्याने तोंड झाकून घ्यावे. त्यामुळे इन्फेकशन पसरण्यास प्रतिबंध होईल.

5. लसीकरण महत्त्वाचे: काही आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. ६ महिने किंवा त्याहून मोठ्या मुलांना फ्लू, nactivated influenza, recombinant influenza या लसी देणे गरजेचे आहे.

6. वापरलेले टिशु पेपर फेकून द्या: नाक, हात पुसण्यासाठी वापरलेले टिशू कचऱ्यात फेका किंवा फ्लश करा. कारण त्यातून अगदी सहज इन्फेकशन पसरू शकतं.

7. सिन्थेटिक इन्सेक्ट रिप्लिकन्ट वापरा: मलेरिया, डेंगी सारखे आजार डास, कीटकांमुळे होतात. इन्सेक्ट रिप्लिकन्टमुळे डास, कीटक यांना आळा बसतॊ किंवा त्याचे प्रमाण आटोक्यात राहण्यास मदत होते. सिन्थेटिक इन्सेक्ट रिप्लिकन्ट हे अधिक प्रभावी असून त्याचा परिणाम दीर्घ काळ चालतो. नक्की वाचा: पेस्टकंट्रोलऐवजी या ’5′ नैसर्गिक उपायांनी दूर करा घरातील किड्या-मुंग्या !

8.अन्न, पाणी शेअर करणे टाळा: इन्फेक्टड व्यक्तीच्या ताटात जेवणे, एकाच बाटलीतून पाणी पिणे टाळा. त्यामुळे तुम्हालाही त्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो.

9.बाथरूमची स्वच्छता राखा: बाथरूम रोज साफ करणे गरजेचे आहे. क्लोरीन, फिनेलने बाथरूम स्वच्छ करा.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>