लहान बाळांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या गुप्तांगाची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. कारण गुप्तांगांची योग्य स्वच्छता न राखल्यास इन्फेकशन होण्याची भीती असते. शरीरातील इतर भागांप्रमाणे वेळोवेळी मुलाच्या पेनीजची( शिश्नाची ) काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. Aslok, Saifee and Bhatia Hospital च्या Senior Consultant, Neonatology आणि paediatrician Dr KP Sanghvi यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पेनीजची काळजी घेत असताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
जन्मानंतरच्या सुरुवातीच्या वर्षात बाळाच्या शिश्नाची सुंता न केल्यास त्यांच्यामध्ये physiological phimosis ची समस्या उद्भवू शकते, पण ती तात्पुरती असते. वयाच्या २-३ वर्षांनंतर (काही वेळेस ५ वर्षांपर्यंत) सुंता न केल्यास phimosis ची समस्या दिसून येते. यावेळी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते. या परिस्थितीत डॉक्टर सर्जरीचा सल्ला देतात. सुंता करणे म्हणजे मुलांच्या शिश्नाच्या टोकाजवळ एक प्रकारचे त्वचेचे आवरण असते. त्यामुळे शिश्नाचे टोक झाकले जाते. सुंता करतेवेळी शस्त्रक्रियेने त्वचेचे ते आवरण काढले जाते. त्यामुळे टोक उघडे होते.
शिश्नाची स्वच्छता कशी राखावी?
१. पहिल्या काही वर्षापर्यंत शिश्नाच्या त्वचेवर अजून एक त्वचेचे आवरण असते. त्यामुळे ती बाहेरील त्वचा पाण्याने स्वच्छ करणे गरजेचे असते. पण ती त्वचा स्वच्छ करताना जास्त जोरात चोळू किंवा घासू नका. कारण त्यामुळे खाज येणे, दुखणे, रक्तस्त्राव होऊ शकतो. नक्की वाचा: बाळाला डायपर रॅशेसपासून वाचवण्याचे ‘५’ उपाय
२. जसं बाळ मोठं होत जाईल तसं शिश्नाच्या बाहेरील त्वचेचे आवरण हळूहळू मागे जाण्यास सुरुवात होईल. बाळाला अंघोळ घालताना शिश्नाची स्वच्छता अवश्य राखा. त्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. अँटीबॅक्टरील किंवा बेबी सोप वापरण्याची आवश्यकता नाही. लहान मुलांसाठी साबण आणि शाम्पू वापरायला सुरवात कधी कराल ?
३. मूल जस मोठं होईल तस त्याला शिश्नाची स्वच्छता कशी राखायची ते शिकवा. अंघोळ करताना त्वचेचे बाहेरचे आवरण मागे सारून पाण्याने स्वच्छ धुवा. आणि व्यवस्थित पुसा. पुसल्यानंतर ते आवरण पुन्हा पूर्ववत करा.
४. लघवी करताना मुलाला काही त्रास होत असल्यास किंवा त्वचा लालसर होणे, खाज येणे असे काही त्रास होत असल्यास लगेच डॉक्टरांना दाखवा. इन्फेकशन्सच्या कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. आणि शिश्नाच्या आरोग्यासाठी स्वच्छता पाळा. पुरुषांच्या शिश्नाबद्दल या ’5′ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock