केसगळती ही आजकाल फारच गंभीर समस्या झाली आहे. फक्त वृद्धच नाही तर तरुणाई ही या समस्येने त्रस्त आहे. त्याची करणे जाणून घेण्यासाठी नक्की बघा: व्हिडियो- तुम्हाला केसगळतीची नेमकी कारणं ठाऊक आहेत का ?
बरेच घरगुती उपाय, केमिकल प्रॉडक्ट आणि हेअर लॉस ट्रीटमेंट करूनही काही फायदा होत नाही. तेव्हा आपल्यासमोर एकच पर्याय शिल्लक राहतो तो म्हणजे हेअर ट्रांसप्लांटेशनचा. पण ही प्रक्रिया क्रीम लावण्याइतकी सोपी नसून फार जिकरीची आहे. चुकीच्या पद्धतीने ही प्रक्रिया केल्यास मृत्यूही ओढावू शकतो. त्यामुळे त्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
अलीकडेच चैन्नईतील मेडिकलचा एक २२ वर्षांच्या विद्यार्थीचा ट्रीटमेंटच्या दोन दिवसानंतर मृत्यू झाला. त्याने एका साध्या लोकल सलोनमधून हेअर ट्रान्सप्लांटेशन करून घेतले होते. ही अशी एकच घटना नाहीये कारण बरेच लोक छोट्या, फार विकसित नसलेल्या क्लिनिक किंवा सलोनमधून अशा ट्रीटमेंट करून घेत असतात. आणि फसले जातात. या विद्यार्थाचा मृत्यू देखील निष्काळजीपणामुळे ओढावला. त्यामुळे यापुढे आपण अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुमच्याही डोक्यात हेअर ट्रान्सप्लांटेशनचा विचार असेल तर सर गंगाराम हॉस्पिटल, न्यू दिल्लीचे Dermatologist डॉ. रोहित बत्रा यांनी दिलेल्या टीप्स नक्की लक्षात घ्या.
तज्ञांचे मार्गदर्शन: बऱ्याच लोकांना हेअर ट्रान्सप्लांटेशन ही इतर कॉस्मेटिक ट्रीटमेंट सारखी अतिशय साधी सोपी वाटते. आणि कोणत्याही लोकल, सामान्य सलोन किंवा क्लिनिक मधून करून घेण्यास त्यांना काही गैर वाटत नाही. पण हे इतके सोपे नाही. ही एक मेडिकल प्रक्रिया असून ती एका तज्ज्ञ डॉक्टरकडून पार पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सगळ्या तज्ज्ञांना प्रॉपर नॉलेज असते असे नाही: हेअर ट्रान्सप्लांटेशनची प्रक्रिया अतिशय क्लेशकारक असते. त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड करु नका. हेअर ट्रान्सप्लांटेशन किंवा इतर कॉमेस्टीक ट्रीटमेंट म्हणजेच Botox आणि fillers या आजकाल सगळ्या छोट्या ब्युटी सलोन किंवा क्लिनिक मध्ये उपलब्ध असतात. आणि अशा ठिकाणी ट्रीटमेंट देणारी व्यक्ती एकतर मेडिकल प्रोफेशनल नसते किंवा प्रॉपर नॉलेज व शिक्षण नसलेले डॉक्टर्स असतात. सगळ्यात आधी हे समजून घ्यायला हवे की हेअर ट्रान्सप्लांटेशनसाठी मेडिकलचे योग्य ज्ञान आणि कौशल्य असणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य त्वचा तज्ज्ञांकडून ही प्रक्रिया करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
जाहिरातींना बळी पडू नका: वर्तमानपत्रात एखादी जाहिरात पाहून, त्यातील किंमती किंवा ऑफर्स वाचून त्याला बळी पडू नका. डॉ. बत्रांनी दिलेल्या सल्ल्यानुसार योग्य त्वचा तज्ज्ञांना भेट द्या. तुमची समस्या, अपेक्षा समजून घेऊन त्याप्रमाणे तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाईल. त्याचबरोबर त्यासाठी कोणती काळजी घ्यायची याचे ही पूर्ण मार्गदर्शन केले जाईल.
तज्ज्ञांची टीम असेल तर उत्तमच: हेअर ट्रान्सप्लांटेशन हे एकड्याने करण्याचे काम नाही. त्यासाठी तज्ज्ञांच्या टीमची आवश्यकता असते. त्वचा तज्ज्ञांबरोबरच प्लॅस्टिक सर्जन, एनेस्थेटिस्ट आणि ट्रेन टेकनिशन्स अशी ६-७ जणांची टीम असते. आणि हे सगळे तज्ज्ञ सगळी प्रक्रिया संपेपर्यंत तिथे उपस्थित असतात. त्यामुळे कमी खर्चात हेअर ट्रान्सप्लांटेशन करून देणारे क्लिनिक किंवा सलोन पेशन्टच्या सुरक्षिततेची काळजी घेत नाहीत, त्याचबरोबर चांगले प्रॉडक्ट्स आणि एक्सपर्ट्सच्या बाबतीत ही तडजोड करतात.
डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काही गोष्टींची खात्री करून घ्या: डॉक्टरांकडे जाण्याआधी त्यांच्या क्लिनिक आणि कौशल्याबद्दल खात्री करून घ्या. तुमच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका. डॉक्टरांच्या आधीच्या पेशन्टचे फिडबॅक चेक करा. त्याचबरोबर वापरली जाणाऱ्या मशिन्स बद्दल माहिती करून घ्या. एका उत्तम प्रतीच्या मशिनची किंमत ५0 लाख असून तशीच डुप्लिकेट मशीन १ लाखात मिळते. त्यामुळे त्यातून होणाऱ्या परिणामात ही फरक नक्कीच असणारच. चुकीच्या ट्रीटमेंट नंतर प्रोफेशनल डॉक्टरकडे जातात. याचा मेडिकल प्रोफेशनवर वाईट परिणाम होतो. असे डॉ. बत्रांचे म्हणणे आहे
आजकाल जागोजागी ब्युटी क्लिनिकची संख्या वाढत चालली आहे. पण अनप्रोफेशनल आणि चुकीच्या ट्रीटमेंट देणारे ब्युटी सलोन बॅन करायला हवेत. त्याचबरोबर सगळ्यात वाईट म्हणजे बऱ्याचशा विदेशी ट्रीटमेंट भारतात येतात. पण मध्यस्थी किंवा ट्रांसलेटर्स त्या ट्रीटमेंटस फक्त प्रायव्हेट क्लिनिकस आणि हॉस्पिटल्स पर्यंत मर्यादित ठेवतात. कारण त्यातून त्यांना जास्त पैसे मिळतात. मेडिकल टुरिजम मध्ये पसरलेले हे जाळे दूर करण्याची आणि त्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कारण यामुळे एका डॉक्टरचीच नाही तर संपूर्ण देशाची प्रतिमा मलिन होते, असे डॉ. बत्रा म्हणतात.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock