Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’3′कारणांंसाठी पुरुषांनी अवश्य प्यावा डाळींबाचा रस !

$
0
0

एखादा सोपा घरगुती उपाय तुमची सेक्स लाईफ पूर्ववत करू शकतो. हे ऐकून आश्चर्य वाटतं ना? पण हे खरं आहे. डाळींबाच्या रस घेतल्याने सेक्स लाईफ सुधारते. काही संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, ग्लासभर डाळींबाचा रस घेतल्याने पुरुषांमध्ये कामवासना वाढीस लागते. शिश्नाची ताठरता येण्यास काही समस्या असल्यास त्या दूर होतात आणि testosterone ची पातळी वाढते. म्हणून प्रत्येकाने डाळींबाचा रस अवश्य घ्यावा.

कामवासना वाढीस लागते: Queen Margaret University in Edinburgh च्या संशोधकांनुसार डाळींबाचा रस हे नैसर्गिक aphrodisiac आहे आणि त्यामुळे स्त्री-पुरुषामध्ये कामवासना वाढीस लागते. काही अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की जे स्त्री-पुरुष १५ दिवसांपासून नियमित डाळींबाचा रस घेत आहेत त्यांच्यात testosterone संप्रेरकाचे प्रमाण वाढलेले दिसून येते. हे संप्रेरक कामवासना जागृत करण्यास कारणीभूत ठरते. जरूर वाचा: भोपळ्याच्या बीयांनी सुधारा तुमचं ‘सेक्सलाईफ’

शुक्राणूंची क्षमता सुधारते:  द जनरल क्लिनिकल न्यूट्रिशिअन, २00८ च्या अहवालानुसार रोज सकाळी डाळींबाचा रस घेतल्याने शुक्राणूंची क्षमता सुधारते. तसंच सेक्स करण्याची इच्छा वाढीस लागते. शुक्राणूंची संख्या, मोटिलिटी वाढते. तसंच शुक्राणूंच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या स्पेर्माटोजेनीक पेशींची घनता आणि जर्मिनल थराची जाडी सुधारते. त्याचबरोबर डाळींबाचा रस न घेणाऱ्यांच्या तुलनेत अबनॉर्मल शुक्राणूंची संख्या कमी होते. ‘जायफळ’ – सेक्सलाईफचा आनंद वाढवणारा घरगुती उपाय

नपुसंकता दूर करण्यासाठी फायदेशीर: The Internal Journal of Impotence Research 2007 च्या अहवालानुसार डाळींबाचा रस पुरुषांमधील नपुसंकता दूर करण्यासाठी मदत करतं. शिश्नाची ताठरता येण्याची समस्या असलेल्या ४२ पुरुषांवर प्रयोग करण्यात आला. चार आठवडे डाळींबाचा रस घेतल्यानंतर त्यांच्यात सुधारणा दिसून आली. कारण डाळींबाच्या रसात असलेल्या नाइट्रेटमुळे गुप्तांगाकडील रक्तप्रवाह सुधारतो आणि शिश्नाची ताठरता न येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. अश्वगंधा – पुरूषांमधील इन्फर्टिलीटीचा त्रास दूर करण्याचा रामबाण उपाय !

References:

1. Türk G, Sönmez M, Aydin M, Yüce A, Gür S, Yüksel M, Aksu EH, Aksoy H. Effects of pomegranate juice consumption on sperm quality, spermatogenic cell density, antioxidant activity and testosterone level in male rats. Clin Nutr. 2008 Apr;27(2):289-96. doi: 10.1016/j.clnu.2007.12.006. PubMed PMID: 18222572.

2. Forest CP, Padma-Nathan H, Liker HR. Efficacy and safety of pomegranate juice on improvement of erectile dysfunction in male patients with mild to moderate erectile dysfunction: a randomised, placebo-controlled, double-blind, crossover study. Int J Impot Res. 2007 Nov-Dec;19(6):564-7. Epub 2007 Jun 14. PubMed PMID: 17568759

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>