गरोदरपणात स्त्रीला फॉलीक अॅसीड,आयर्न प्रमाणेच कॅल्शियमची देखील अधिक आवश्कता असते.यासाठीच इतर मल्टीविटामिन्स सोबत तुमचे गायनेकालॉजिस्ट तुम्हाला कॅल्शियम सप्लीमेंट घेण्याचा सल्ला देतात.हाडांच्या मजबूती व विकासासाठी शरीराला कॅल्शियम गरजेचे असते.Max Hospital, New Delhi,च्या Senior Consultant Obstetrician and Gynaecologist, डॉक्टर उमा वैद्यनाथन यांच्या मते जाणून घेऊयात गरोदरपणाच्या काळात कॅल्शियम सप्लीमेंटची आवश्यकता का असते ?
१.अर्भकाच्या हाडांची वाढ व विकासात मदत होते -
गर्भाच्या हाडांच्या विकासासाठी कॅल्शियमची गरज असते हे आपल्या सर्वांना माहीत आहेच.गर्भाची वाढ व विकास होण्यासाठी गर्भवती स्त्रीने आपल्या आहारातून पुरेसे कॅल्शियम घेणे आवश्यक असते.तिच्या आहारातून तिला पुरेसे कॅल्शियम मिळत नसल्यास तिला कॅल्शियम सप्लीमेंट घेण्याची गरज भासू शकते.
२.प्रेगन्सीमध्ये हाडांची झीज होण्यापासून बचाव होतो-
बाळाच्या हाडांच्या विकासासाठी कॅल्शियमचा अधिक पुरवठा होत असल्याने गर्भवती स्त्रीमध्ये कॅल्शियमचा अभाव होऊ शकतो.त्यामुळे तिस-या तिमाहीमध्ये तिच्या हाडांची झीज होण्याचे प्रमाण वाढते व हाडांची मिनरल डेन्सिटीदेखील कमी होते.या समस्येपासून वाचण्यासाठी तिने पुरेसे कॅल्शियम सप्लीमेंट घेणे आवश्यक असते.
३.स्तनपानासाठी दूधनिर्मितीचे प्रमाण वाढते-
स्तनपान करताना दूधनिर्मिती होण्यासाठी कॅल्शियमची गरज असते ही गोष्ट अनेक महीलांना माहीत नसते त्यामुळे पुढे स्तनपान करताना तिच्या शरीरातील कॅल्शियमच्या वापरावर ताण येतो.स्तनपान करताना स्त्रीयांना दिवसभरात ३०० ते ४०० मिग्रॅ कॅल्शियमची गरज असते.त्यामुळे ही गरज भागवण्यासाठी शरीर मातेच्या हाडांमधील कॅल्शियम शोषते.त्यामुळे सहाजिकच मातेच्या हाडांमधील कॅल्शियम कमी होते.ही समस्या टाळण्यासाठी डॉक्टर गरोदरपणापासूनच तिला पुरेसे कॅल्शियम सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देतात.
कॅल्शियम सप्लीमेंट घेताना या टीप्स लक्षात ठेवा-
गरोदर महीलेला दररोज १००० मिग्रॅ कॅल्शियमची गरज असते.तुमच्या दररोजच्या आहारातून पुरेसे कॅल्शियम मिळू शकत नाही.त्यामुळे कॅल्शियम सप्लिमेंट घेणे आवश्यक आहे-
- विटामिन डी सप्लीमेंट अथवा विटामिन डी असलेले पदार्थ आहारात घ्या.यामुळे हाडांना कॅल्शियम शोषण्यास मदत होईल. गर्भवती स्त्रीच्या आहारात आवश्यक असलेली दहा सुपरफूड्स
- जर तुम्ही आयर्न सप्लीमेंट घेत असाल तर त्यासोबत कॅल्शियम सप्लीमेंट घेणे टाळा.कारण आयर्न त्यातील कॅल्शियम शोषून घेते.
- काही लोकांना कॅल्शियम सप्लीमेंट घेतल्याने बद्धकोष्ठता अथवा डायरिया ची समस्या निर्माण होते.तर काही जणांना यामुळे ढेकर येण्याची समस्या होते.असे असल्यास औषध घेणे थांबवण्यापेक्षा त्वरीत तुमच्या डॉक्टरांना कळवा ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील. कॅल्शियमची कमतरता भरूनकाढेल हा खास ‘डाएट प्लॅन’ !
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock