Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

दात काढण्याचा निर्णय या ’5′कारणांमुळे घ्यावा लागतो !

$
0
0

दात हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे.त्यामुळे दातांची योग्य स्वच्छता व निगा राखणे आवश्यक असते.दातांच्या समस्या असल्यास त्वरीत डेन्टीस्टचा सल्ला घेणे गरजेचे असते.पुर्वी दातांच्या कोणत्याही समस्येवर दात मुळासकट उपटून काढणे हाच एक उपाय असायचा.पण आजच्या आधुनिक काळात दातांवर अनेक प्रगत वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत.त्यामुळे कोणतीही समस्या असली तरी डेन्टीस्ट दातांवर उपचार करताना ते काढून टाकण्याचा पर्याय टाळतात. मात्र दातांच्या काही समस्येवर दात काढणे हाच एकमेव पर्याय असू शकतो.

या  काही कारणांमुळे दात मुळापासून उपटून काढावे लागतात-

दातांच्या एखाद्या समस्येवर उपचार नसणं - 

जेव्हा दातांमध्ये भयंकर कीड लागते,दात फॅक्चर होतात किंवा हिरड्यांमधील हाडांची झीज होते तेव्हा दाताचे नुकसान झाल्यामुळे दात मुळापासून उपटून काढण्याशिवाय कोणताही मार्ग उरत नाही. जाणून घ्या दात किडण्याची ही 10लक्षणे

दातांची रचना चुकीची / वेडीवाकडी असल्यास-

ब-याचदा  अक्कलदाढ ही चुकीच्या जागी येते अथवा जागे अभावी ती हिरड्यांच्या बाहेर येऊ लागते.चुकीच्या रचनेमुळे दात स्वच्छ करणे कठीण जाते व त्यामुळे इनफेक्शन होण्याची दाट शक्यता निर्माण होते.जीभ अथवा गालाच्या आतील बाजूने अक्कलदाढेचे घर्षण झाल्यामुळे तोंडांला अल्सर होऊन वेदना होऊ शकतात.अशा स्थितीमुळे तोंडामध्ये सिस्ट अथवा ट्यूमर विकसित होण्याची देखील शक्यता असते.अक्कलदाढ चुकीच्या जागी आल्यामुळे होणा-या या समस्या टाळण्यासाठी ती दाढ त्वरीत काढून टाकणे आवश्यक असते.

अक्कलदाढेला जबडयामध्ये पुरेशी जागा न मिळाल्याने इतर दातांच्या रचनेवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो.अक्कलदाढेच्या वाढीमुळे इतर दातांच्या नसा व मुळांचे नुकसान होऊ शकते.या परिस्थितीत दातांच्या रचनेत बदल होऊ लागल्यास हिरडयांच्या समस्या निर्माण होतात.त्यामुळे अशा परिस्थितीत अक्कलदाढ काढून टाकणे हेच योग्य असू शकते.

काही ऑर्थोडोन्टीक कारणांमुळे-

ऑर्थोडोन्टीक उपचारांमध्ये दातांची रचना सुधारण्यासाठी योग्य जागा निर्माण करताना काही वेळा एखादा दात काढून टाकण्याची गरज भासू शकते.

एक्स्ट्रा दात असल्यास-

तुम्हाला नैसर्गिकरित्या जास्तीचे दात आल्यास गालाच्या आतील भाग अथवा जीभ वारंवार दुखावली जाऊ शकते.अशा दातांमुळे दातांची योग्य स्वच्छता राखणे कठीण होते.त्यामुळ असे दात काढून टाकावे लागतात.नियामित  ब्रश करताना या ’7 चुका टाळा म्हाणजे त्यांचे आरोग्य सुधारायला मदत होईल. 

डोके व मानेला रेडीएशन घेण्यापुर्वी-

डोके व मानेला रेडीएशन उपचार घेताना जबडयातील हाडांवर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.अशा वेळी दात किडले असल्यास अथवा हिरड्या कमजोर झाल्या असल्यास थेरपीमधील दुष्परिणाम टाळण्यासाठी असे दात काढून टाकावे लागतात. दातदुखी कमी करण्याचे हे नैसर्गिक उपाय नक्की आजमावून पहा. 

वर दिलेल्या या कारणांव्यतिरिक्त इतर कोणत्या कारणांमुळे तुम्हाला दात काढण्याचा सल्ला दिला जात असेल तर मात्र सेकंड ओपिनीयन घ्यायला विसरु नका. नैसर्गिक उपायांनी वाढवा दातांची शुभ्रता !

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>