पालक नेहमी तान्हा बाळाला निरोगी व संतुलित आहार देण्याचा प्रयत्न करतात.आहारातील व्हिटामिन्स व मिनरल्समुळे बाळाची वाढ व विकास चांगला होतो.यासाठी एक वर्षापर्यंतच्या बाळाला साखर व मीठ आहारातून देणे टाळावे.त्या ऐवजी फळ,फळांचा गर,खजूर या नैसर्गिक माध्यमातून गोड बाळाला तुम्ही देऊ शकता.लहान मुलांंसाठी असणार्या infant formulas सारख्या पदार्थांंमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. सतत व भरपुर प्रमाणात साखर खाल्ल्याने तुमच्या बाळाला भविष्यात लठ्ठपणा व आरोग्य समस्यांंचा धोका वाढतो.यासाठी बाजारातील बेबीफूड तुमच्या बाळासाठी खरेदी करताना प्रथम त्यावरची माहीती जरुर वाचा. नक्की वाचा: लहान मुलांचा नेमका आहार कसा असावा ?
साखेरमुळे बाळाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
- रिफांइंड केलेल्या पांढ-या साखरेतील केमिकल्समुळे बाळाचे नुकसान होते.
- एका संशोधनानूसार साखरेमुळे बाळाच्या रोगप्रतिकारशक्ती वर देखील परिणाम होतो, असे आढळले आहे.रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे बाळाला इनफेक्शन होण्याचा व बाळ आजारी पडण्याचा धोका असू शकतो.
- काही क्लिनीकल स्टडीजनूसार तान्हा बाळाला साखर दिल्याने त्याला भविष्यात ह्रदय समस्या होऊ शकतात.
- अति प्रमाणात गोड खाणा-या मुलांचे दूधाचे दात लवकर किडू लागतात.लवकर गोड खाणा-या बाळामध्ये हे लक्षणे त्याच्या पहिल्या दातापासून दिसू शकते व त्यामुळे पुढे त्याचे दात किडण्याची समस्या वाढते.
- लहान बाळाला गो़ड दिल्यामुळे त्याची लहानपणीच एकाग्रता कमी होऊ शकते.
लहान बाळाच्या आहातून साखर कमी करण्यासाठी काय काळजी घ्याल?
- बेबीफूड वरील लेबल व्यवस्थित वाचा.
- कॅन्ड फळे देणे टाळा कारण त्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते.
- बाजारातील पॅक्ड व तयार फळांचा रस मुलांना देेणे टाळा.
- बिस्किट व कुकीज कमी प्रमाणात द्या.
- साधे दूध द्या.दूधात साखर मिसळू नका.
- घरी केलेल्या खीर,मिल्कशेक अथवा योगर्ट मध्ये नैसर्गिक गोडीसाठी फळांचा गर वापरा.
- जॅम,जेली,सॉस,सिरप,सॉफ्ट ड्रिंक असे प्रक्रिया केलेले पदार्थ देणे टाळा.कारण त्यात साखर खुप प्रमाणात असते व ते बाळासाठी हितकारक नसतात.
- बाजारात मिळणा-या अनेक प्लेवर्सच्या बेबीफूड मध्ये देखील साखरेचे घटक असतात.त्यासाठी बाळाला प्लेवर नसलेले साधे बेबी फूड द्या व नैसर्गिक गोडीसाठी त्यात फळे टाका.
- बाजारातील फ्लेवर्ड योगर्ट वापरु नका कारण त्यात देखील खूप साखर असते.
महत्वाची टीप-
साखर जरी गोड असली तरी ती बाळासाठी एक गोड विष असते.त्यामुळे एक वर्षाखालील बाळाला गोड पदार्थ देणे टाळा.रिफाईंड साखरे ऐवजी फळे देऊन त्यांना नैसर्गिक गोडीचे पदार्थ खाण्याची सवय लावा.एक वर्षांनंतर हळूहळू बाळाला साखरेचे पदार्थ देण्यास हरकत नाही मात्र त्यांना गोड पदार्थांची सवय लागणार नाही याची जरुर काळजी घ्या. मुलांसाठी खास चटकदार पण हेल्दी पदार्थांचे ’5′ पर्याय !
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock