नारळाचे पाणी हे आरोग्यदायी असल्याचे आपण सगळेच जाणतो. हे पाणी १००% शुद्ध असून त्यात ९४% पाणी असते. अगदी कमी कॅलरीज आणि शून्य टक्के कोलेस्ट्रॉल असल्याने हे एक नैसर्गिक आरोग्यदायी पेय आहे. तसंच त्यात व्हिटॅमिन बी, अमिनो असिड, सायटोकायनिन (cytokinins) आणि पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, मेगनिज यांसारखी मिनरल्स असतात. या काही आरोग्यदायी फायद्यांमुळे नारळाचे पाणी रोज घ्या.
1. हृदयाच्या आरोग्यासाठी:
फक्त तहान क्षमावण्यासाठी नाही तर नारळपाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. काही अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की नारळपाण्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होते. तर दुसऱ्या अभ्यासानुसार नारळपाण्यात मुबलक प्रमाणात असलेल्या पोटॅशिअममुळे हायपरटेन्शनचा त्रास कमी होतो.
2. किडनी स्टोनचा धोका कमी होतो:
नियमित नारळपाणी घेतल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. त्यात असलेल्या पोटॅशिअम व मॅग्नेशिअममुळे लघवी साफ होण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्हाला किडनी स्टोन असल्यास लघवीसोबत स्टोन निघून जाण्यास मदत होईल.
3. डायरियावर गुणकारी:
डायरियामध्ये शरीरातील पाणी कमी होते. नारळपाण्यामुळे ती कमतरता भरून निघते त्याचबरोबर इलेक्ट्रोलाइट्स आणि मिनिरल्सची कमी देखील भागवली जाते. शरीरातील विषद्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात. आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या इलेकट्रॉलेटचे प्रमाण यात असते.
4. हायड्रेट ठेवते:
उन्हाळयात सतत घाम आल्यामुळे शरीर डीहायड्रेट होते. त्यामुळे पोटाला थंडावा देणारे पदार्थ खावेसे वाटतात. अशावेळी नारळपाण्यासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. कारण यात कार्ब्स, साखर कमी प्रमाणात तर इलेक्टोलेट्स मुबलक प्रमाणात असतात. फक्त नारळपाणी प्या किंवा त्यात लिंबाचा रस घालून ही तुम्ही हे हेल्दी ड्रिंक घेऊ शकता.
5. व्यायाम करताना आणि करून झाल्यावर:
व्यायाम करताना हायड्रेट राहणे खूप गरजेचे आहे. नारळपाण्यात कोणत्याही प्रकारचे प्रेजर्वेटिव्हस किंवा कृत्रिम साखर नसल्यामुळे हे एक नैसर्गिक स्पोर्ट्स ड्रिंक आहे. त्यामुळे व्यायाम करताना आणि झाल्यानंतर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसंच यात कमी कॅलरीज आणि पोटॅशिअम असते. आणि शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यास मदत करते.
6. त्वचा टवटवीत होते:
नारळपाण्यामुळे त्वचा मऊ मुलायम होते. त्वचेला नवा तजेला येतो. दिवसातून दोनदा नारळपाणी चेहरा, हाताला लावा आणि स्वतःच फरक बघा. त्यात असलेल्या cytokinins मुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत.
7. प्रेग्नसीमधील काही समस्यांवर फायदेशीर:
नारळपाणी हे नैसर्गिकरित्या शुद्ध असते. म्हणून प्रेग्नसीमध्ये हे पाणी पिणे सुरक्षित असते. प्रेग्नसीमध्ये होणारी असिडिटी, बद्धकोष्टता, छातीतील जळजळ यावर अत्यंत फायदेशीर ठरते.
8. तुटलेल्या दातांसाठी:
दात तुटल्यास डॉक्टरांकडे जाण्यापर्यंत दात त्याच्या जागी व्यवस्थित राहत नसल्यास नारळपाणी स्टोरेज सोल्युशन म्हणून वापरू शकता.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock