Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ‘९’टीप्सने करा प्रेगन्सीमध्ये होणाऱ्या मूड स्विंग्सवर मात !

$
0
0

मातृत्वाची चाहूल लागणं हा अतिशय सुखद अनुभव असतो. पण तो अनुभवताना अनेक भावनिक चढ उतारांना सामोरं जावं लागत. एका क्षणी आपण आनंदाच्या शिखरावर आहोत असं वाटतं तर दुसऱ्या क्षणी चिडचिड होते. काही हार्मोन्समुळे मूड स्विंग्स होतात.  विशेषतः पहिल्या तीन महिन्यात ही समस्या अधिक जाणवते. प्रसूती वेदनांची भीती, बाळाबद्दलची काळजी आणि चिंता यामुळे मूड सतत बदलत राहतात. गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?

मूड स्विंंग्स कमी करण्यासाठी काही खास टीप्स:

  •  पुरेशी झोप घ्या. दिवसभराच्या कामातून छोटासा ब्रेक घेऊन रिलॅक्स व्हा.
  • सकस, संतुलित आहार घ्या. काही वेळच्या अंतराने थोडे थोडे खात राहा. गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’
  • नुसते बसून न राहता सतत काहीतरी करत रहा. शारीरिकरीत्या अ‍ॅक्टिव्ह राहिल्याने मूड चांगला राहण्यास मदत होईल. चालणे किंवा स्विमिंगअसे व्यायाम तुम्ही करू शकता. ताण कमी करण्यासाठी योगसाधना, ध्यान जरूर करा.
  • प्रेग्नंसीबद्दलची चिंता सोडून द्या. काही वेळ मित्र-मैत्रिणींबरोबर घालवा. चांगले सिनेमे पहा.जरूर वाचा: नैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स
  • वाचन, लेखन, चित्र काढणे, नवीन पदार्थ बनवणे किंवा झाडं लावणे यांसारखे तुमचे काही छंद असतील तर ते जरूर जोपासा. छंद जोपासणं हा अतिशय सुंदर अनुभव आहे. त्यामुळे मनावरील सगळे ताण निघून जातात आणि रिलॅक्स वाटतंं. तसंच मनात सकारात्मक विचार येण्यास मदत होते.
  • घरच्या घरी मसाज घ्या. स्वतःचे लाड पुरवा. मनाला शांतता आणि प्रसन्नता देणारं संगीत ऐका. आणि कोणत्याही गोष्टीचा अधिक ताण घेऊ नका.
  • तुमच्या साथीदारासोबत वेळ घालवा. तुमच्या पालकत्वाची कल्पना करा. एकत्र बसून मुलांची नावं ठरवा. बाळाचे फोटोज गोळा करा.
  • तुमच्या जवळच्या व्यक्तीसमोर मनातील भावना व्यक्त करा. तुम्हाला सकारात्मकता देणाऱ्या व्यक्तींसोबत बोला. यामुळे तुमचं मन हलकं, शांत होईल आणि विचारात स्पष्टता येण्यास मदत होईल.
  • प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यात प्रसूती वेदनांच्या अधिक विचारामुळे मूड सविंग्स होतात. Lamaze क्लास लावा. त्यात एकाग्रता वाढण्यासाठी, आराम देणारे विविध तंत्र शिकवले जातात. तसंच प्रसूती वेदना सौम्य होण्यास मदत होते.

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>