Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पालकाच्या अतिसेवनाचे शरीरावर होतात हे ’5′दुष्परिणाम !

$
0
0

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे हे वाईटच असते. अगदी आरोग्यदायी गोष्टी, पदार्थ आणि सवयीदेखील त्रासदायक ठरू शकतात. अनेकदा आहारतज्ञ पालेभाज्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. त्यामधून शरीराला पोषणद्रव्य मिळण्यास मदत होते. मात्र सतत पालेभाज्या खाणं हे जितकं कंटाळवाण आहे तितकेच ते त्रासदायकही ठरू शकते. पालक ही अशीच एक पालेभाजी आहे. त्यामधून शरीराला आयर्न, फायबर आणि इतर मिनरल्सचा पुरवठा होतो. मात्र अतिप्रमाणात पालक खाल्ल्यास काय होते हे जाणून घेण्यासाठी Fortis Hospital कलकत्त्याच्या आहारतज्ञ मिता शुक्ला यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.

पोट फुगणे – पालक मधून शरीराला फायबर्सचा पुरवठा होतो तसेच पचन सुधारण्यास मदत होते. पण पालक खाल्ल्यानंतर त्याचे शरीरात शोषण होण्यास अधिक वेळ लागू शकतो. तुम्ही नुकतीच पालक खाण्यास सुरवात केली असेल तर घाई करू नका. वरचेवर पालकच्या भाजीचा आहारात समावेश करणे त्रासदायक ठरू शकते. यामुळे पोटात गॅस होणे, बद्धकोष्ठतेचा त्रास होणं अशा समस्या वाढू शकतात.

डायरिया – अति प्रमाणात फायबरचा आहारात समावेश केल्यास पचनकार्यामध्ये बिघाड होऊ शकतो. पालकसोबतच काही अति फायबरयुक्त पदार्थ आहारात घेतल्यास पोटदुखी, पचनविकार वाढण्याचा धोका असतो. म्हणूनच पालकासोबत प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.

किडनीस्टोन – पालकामध्ये oxalic acid घटक आढळतात. पालकाची प्युरी शरीरात शोषल्यानंतर त्यातून युरिक अ‍ॅसिडची निर्मिती होते. युरीक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यानंतर किडनीस्टोन निर्माण होण्याची शक्यताही वाढते.

गाऊट – पालकच्या अतिसेवनामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. परिणामी सांधेदुखी, सांध्यातील दाह आणि गाऊटचा त्रासही वाढतो.

मिनरल्स शरीरात शोषण्याचे प्रमाण कमी होते – पालकामध्ये  oxalic acid चेही प्रमाण अधिक असते. त्याचे कॅल्शियम किंवा आयर्न घटकांशी शरीरात संपर्क आल्यास मिनरल्स शोषून घेण्याची प्रक्रिया मंदावते.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>