मधूमेह हा विकार पुर्ण बरा होऊ शकत नसला तरी त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य असते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवल्यास तुम्हाला डोळ्यांचे विकार,किडनी विकार,ह्रदय विकार,मज्जातंतू बिघाड व पायाच्या गंभीर समस्या टाळता येतात. मधूमेहींनी निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम,पौष्टिक आहार,नियमित रक्तातील साखर तपासणे व वेळेवर हेल्थ चेक-अप करणे आवश्क आहे. तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?
मधूमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी करा या महत्वाच्या गोष्टी-
नियमित योग्य आहार घ्या-
दिवसभरात कमीतकमी तीन वेळा वेळेवर जेवण घ्या.त्याचसोबत दर चार ते पाच तासांनी काहीतरी योग्य खाल्याने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहील.बाहेर प्रवास करताना कार्बोहायड्रेट पदार्थ अथवा १० ते १५ ग्रॅम कार्बोहायड्रेट घटक असलेले पेय सोबत घ्या.प्रवासात रक्तातील साखर अचानक कमी झाल्यास त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल.
निरनिराळे खाद्यपदार्थ खा-
असे अन्नपदार्थ खा ज्यामुळे तुम्हाला पोषण मिळेल.यासाठी कमी फॅट्स,कमी साखर व कमी मीठ असलेले पदार्थ खा.तळलेले पदार्थ खाणे टाळा.यासाठी बेक केलेले,उकडलेले अथवा वाफावलेले पदार्थ खाणे फायदेशीर ठरेल.रेड मीट अजिबात खाऊ नका.कमी फॅट असलेले दूधाचे पदार्थ खा.भरपूर प्रमाणात फायबर असलेल्या भाज्या व फळे,तृणधान्ये व कडधान्ये असे पदार्थ खा. (नक्की वाचा – मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज ! )
रक्तातील साखर नियंत्रित ठेवा-
डॉक्टरांच्या सल्लानूसार दिवसभरात दोन ते चार वेळा ब्लडशूगर तपासा.यासाठी रक्तातील शूगर तपासण्याचे इलेक्ट्रानिक मशीन घरी ठेवा.या मशीनसोबत असलेली छोटी सुई बोटांवर टोचून थेंबभर रक्त मशीनला लावलेल्या केमीकली अॅक्टीव्ह डीस्पोजेबल टेस्ट स्ट्रीपवर टाका त्यामुळे काही सेंकदामध्ये त्या डिजीटल मशीनमध्ये तुमची ब्लडशूगर दर्शविली जाईल.
A1C वेळेवर करा-
दर तीन महीन्यातून एकदा ही टेस्ट करा.त्यामुळे गेल्या काही महीन्यांपासून तुमच्या शरीरातील लाल रक्तपेशींमध्ये ग्लूकोजचे प्रमाण किती आहे हे तुमच्या लक्षात येईल.दर तीन महीन्यांनी शरीरात नवीन लाल रक्तपेशी निर्माण होतात.जर तुमची ब्लडशूगर ७० ते १४० मिग्रॅ/डीएल इतकी असेल तर तुमचे A1C ६ ते ७ टक्के असणे अपेक्षित असते.
मद्यपान व धुम्रपान टाळा-
जर तुम्ही मधूमेही असाल मद्यपान व धुम्रपानामुळे तुम्हाला अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.मद्यपानामुळे शरीराला कोणतेही पोषण मिळत नाही व कॅलरीज मात्र खुप वाढतात.मद्यपान केल्यामुळे तुम्ही मधूमेहावर घेत असलेल्या औषधांचा परिणाम कमी होतो व आरोग्य समस्या निर्माण होतात. रिकाम्या पोटी मद्य घेतल्याने तुमच्या रक्तातील साखर अचानक खुप कमी होते.
कार्यक्षम व्हा-
शारीरिक अॅक्टीव्हीटीमुळे तुम्ही फीट रहाता.त्यामुळे तुमचे वजन व रक्तातील साखर नियंत्रित रहाते.शारीरिक कसरतीमुळे रक्तप्रवाह सुधारतो व ह्रदय समस्या दूर होतात.वजन कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होतो.
नियमित रक्तदाब व कोलेस्ट्रॉल तपासा-
तुम्ही तुमचा रक्तदाब वर्षातून दोन ते चार वेळा व कोलेस्ट्रॉल (फास्टींग लिपीड प्रोफाईल) वर्षातून एकदा तपासणे गरजेचे असते.जर तुम्ही मधूमेही असाल तर तुम्हाला उच्चरक्त दाब व हायकोलेस्ट्रॉल या समस्या निर्माण होऊन पुढे गंभीर विकार होऊ शकतात. कोलेस्टेरॉल कमी करायचयं? मग आहारात ठेवा हे 7 पदार्थ
मज्जातंतूच्या बिघाडाची लक्षणे तपासा-
डायबेटीक न्यूरोपॅथी हा मधूमेहींची रक्तातील साखर वाढल्यामुळे मज्जातंतूमध्ये बिघाड होणारा विकार आहे.यामध्ये हात-पायाला मुंग्या येणे,डायरिया,इरेक्टाईल डिसफंक्शन,मूत्राशयावरी नियंत्रण जाणे, दृष्टी दोष,चक्कर अशी लक्षणे आढळतात.जर तुम्हाला अशी कोणतीही लक्षणे आढळली तर त्वरीत तुमच्या डॉक्टरकडे जा.काही शारिरीक टेस्टकरुन डॉक्टर तुमच्या स्पर्श,हालचाली व संवेदना तपासतील.काही समस्या आढल्यास पुढील तपासण्या करुन त्वरीत उपचार करण्यात येतील.
पायांची विशेष काळजी घ्या-
मज्जातंतू बिघाड व कमी रक्तपुरवठा यामुळे मधूमेहींमध्ये अनेक समस्या निर्माण होतात.मधूमेहींना पायांची समस्या देखील वारंवार होते.त्यामुळे तुमच्या पायावर कोणतीही जखम अथवा इनफेक्शन झाले आहे का हे दररोज तपासा.धोका टाळण्यासाठी अनवाणी चालणे टाळा.पायांची नखे वेळेवर कापा.पायांची योग्य निगा राखा. मधूमेहींनी पायांची काळजी घेण्यासाठी या ’7′ गोष्टींकडे अवश्य लक्ष द्यावे
डोळे तपासा-
दरवर्षी नियमित डोळ्यांची तपासणी करण्यास विसरु नका. रक्तातील साखर सतत अनियंत्रित असल्यास डोळ्याच्या रेटीनामधील छोट्या रक्तवाहिन्यांचे नूकसान होते.या स्थितीला डायबेटीक रेटीनापॅथी असे म्हणतात.त्यामुळे दृष्टी अंधूक होते,दृष्य दोन दिसतात किंवा कायमचे अंधत्व येऊ शकते. मोतीबिंदू व काचबिंदू होण्याचा धोका वाढतो. कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?
किडनीची तपासणी करा-
वर्षातून एकदा किडनीची तपासणी करा.कारण मधूमेहामुळे किडनीमधील रक्तवाहीन्यांचे नुकसान होते.जर तुम्हाला मधूमेह व उच्चरक्तदाब दोन्हीही असेल तर तुम्हाला हा धोका अधिक असू शकतो.या विकाराचे प्रथम लक्षण लघवीमध्ये यूरीन येणे हे असू शकते त्यात जर किडनीमध्ये बिघाड झाल्यास परिस्थिती खुपच गंभीर होऊ शकते.तुमच्या शरीरातील रक्तदाब,कोलेस्ट्रॉल व ट्राग्लीसाईड वाढते.यामुळे पायाला सूज येत संपुर्ण शरीराला सूज येऊ शकते.पण जर लवकर या स्थितीचे निदान झाले तर उपचार करुन स्थिती सुधारता येऊ शकते. किडनी विकाराच्या या ’12′ लक्षणांना दुर्लक्षित करू नका!
दात व हिरड्या तपासा-वर्षातून दोनदा तुम्ही दात व हिरड्या तपासणे गरजेचे असते.मधूमेहामुळे दात,हिरड्या व तोंडातील पोकळीचे नुकसान होऊ शकते.रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे दात किडण्याचा धोका निर्माण होतो.मधूमेहामध्ये हिरड्यांच्या समस्या देखील निर्माण होतात. मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock