डोळ्याभोवती काळी वर्तुळे येणे याला Periorbital circles अथवा डार्क सर्कल्स असे म्हणतात.तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नसेल,तुम्ही खुप ताणात असाल किंवा जर तुमची तब्येत ठीक नसेल तर तुमच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे दिसू लागतात.कधीकधी मद्यपान,धुम्रपान,अति मेक-अप करणे,सतत उन्हामध्ये फिरणे,काही औषधे,अॅलर्जी,सर्दी-खोकल्याच्या समस्या यामुळे देखील तुमच्या डोळ्याभोवती डार्क सर्कल्स येऊ शकतात.
डोळे हा आपल्या आरोग्याचा आरसा असतात.त्यामुळे डोळ्याभोवती डार्क सर्कल्स येणे हे आरोग्य समस्येचे एक लक्षण असू शकते.मात्र वयोमानानुसार येणा-या पिगमेंटेशमुळे या समस्येकडे ब-याचदा दुर्लक्ष केले जाते.पेरीयर बायटल हायपिगमेेंटेशन मध्ये डोळ्यांच्या त्वचेखालील मेलॅनीनचे प्रमाण वाढते व ही समस्या निर्माण होते.त्यामुळे जर तुम्हाला खुप डार्क सर्कल्स असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.
या आरोग्य समस्येमुळे डार्क सर्कल्स येऊ शकतात-
अॅनिमिया-
शरीरात लोहाचा अभाव असल्यास अॅनिमियामुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात.लोहासारख्या मिनरल्सच्या अभावामुळे शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा कमी पुरवठा होतो व डोळ्यांच्या खालील त्वचेच्या रंगात बदल होतो.
Periorbital cellulitis-
डोळ्याच्या पापण्या व आजूबाजूच्या भागाला हे इनफेक्शन व दाह झाल्यामुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात.
Parasite infection-
कच्चे अथवा कमी शिजवलेले मटण खाल्यामुळे हे इनफेक्शन होते यामुळे डोळे सूजतात,डोळ्यांच्या त्वचेचा रंग बदलतो व डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येतात.डोळ्यांच्या त्वचेखालील रक्तवाहिन्यांमध्ये हे इनफेक्शन झाल्यामुळे ही लक्षण दिसू लागतात.किटकदंशामुळे देखील हे इनफेक्शन होते.असे असल्यास चेह-यावर किटक चावलेल्या भागाकडील डोळ्याची पापणी सूजते. नक्की वाचा थंडगार दुधाने हटवा, डार्क सर्कल्सची समस्या!
Atopic dermatitis (eczema)-
या स्थितीत त्वचा लालसर होते व खाज येते.यामुळे पापण्यांवर लालसर,तपकिरी अथवा राखाडी चट्टे येतात.
थायरॉईड समस्या-
कधीकधी थायरॉईड हॉर्मोन्सच्या अभावामुळे डोळ्याच्या टिश्यूजमध्ये पाणी जमा झाल्याने काही लोकांच्या डोळ्याखालील त्वचेचा रंग गडद होेतो.
किडनीचे नुकसान-
किडनीमध्ये बिघाड झाल्यास त्वचेखाली द्रवपदार्थ साठू लागतात.त्यामुळे या विकाराचे प्रथम लक्षण सूजलेले व काळी वर्तुळे निर्माण झालेले डोळे हे असू शकते.
यकृतामध्ये बिघाड-
यकृताचा आकार वाढणे अथवा हिपॅटायटीस या समस्येमुळे यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे डार्क सर्कल्स दिसू शकतात.
दृष्टी दोष-
जवळचे किंवा लांबचे पाहताना त्रास होत असल्यास, समोरचे पाहताना डोळ्यांवर ताण येत असल्यास डोळ्यांभोवती काळी वर्तुळे निर्माण होतात.
Amyloidosis-
अॅमलॉईड या प्रोटीनच्या जमा होण्याने ही समस्या निर्माण होते.कधीकधी काही रुग्णांमध्ये यामुळे त्वचेतून रक्त देखील येऊ लागते.या स्थितीत डोळ्यांच्या पापण्यांखालील छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा झाल्याने त्वचेवर गडद रंगाचे चट्टे दिसतात. जाणून घ्या डार्क सर्कल्स हटवण्याचा घरगुती उपाय !
Porphyria
या समस्येमध्ये हेम या घटकाच्या निर्मितीवर परिणाम होतो.हेम हा हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लागणारा एक लोहघटक अाहे.या स्थितीमुळे डोळ्याच्या त्वचेखालचा रंग बदलतो ज्यामुळे डार्क सर्कल्स दिसू लागतात.
1. Sheth PB, Shah HA, Dave JN. Periorbital hyperpigmentation: a study of its prevalence, common causative factors and its association with personal habits and other disorders. Indian J Dermatol. 2014 Mar;59(2):151-7. doi: 10.4103/0019-5154.127675. PubMed PMID: 24700933; PubMed Central PMCID: PMC3969674.
2. Colucci G, Alberio L, Demarmels Biasiutti F, Lämmle B. Bilateral periorbital ecchymoses. An often missed sign of amyloid purpura. Hamostaseologie. 2014;34(3):249-52. doi: 10.5482/HAMO-14-03-0018. Epub 2014 Jun 30. PubMed PMID: 24975676.
3. Bulat V, Lugović L, Situm M, Buljan M, Bradić L. Porphyria cutanea tarda as the most common porphyria. Acta Dermatovenerol Croat. 2007;15(4):254-63. Review. PubMed PMID: 18093456.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock