लग्नानंतर प्रत्येक स्त्री सहाजिकच मातृत्वासाठी आतूर असते.खुप प्रयत्न करुनही कधीकधी गर्भधारणेमध्ये अनेक समस्या येतात.गर्भधारणेच्या यशातील मुख्य अडचण असते ती म्हणजे गर्भधारणेचा निश्चित काळ समजणे.ओव्हूलेशनच्या काळात गर्भधारेसाठी प्रयत्न केल्यास यश मिळण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे ओव्हूलेशनचा काळ ओळखण्यासाठी ही माहीती तुमच्या फायद्याची असू शकते.
ओव्हूलेशन म्हणजे काय आणि गर्भधारणेसाठी ते किती महत्वाचे आहे-
महिलांच्या मासिक पाळीच्या दोन आठवड्यांच्या काळात स्त्रीच्या अंडकोषातून बीजांड बाहेर पडते व गर्भधारणेसाठी तयार होते या काळाला ओव्हूलेशन असे म्हणतात.या काळात जर स्त्री व पुरुषांनी गर्भनिरोधके न वापरता शारीरिक संबध ठेवले तर शुक्राणू स्त्रीबीजात शिरुन गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते.
मात्र असे होण्यामध्ये समस्या ही असते की प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशीच हा काळ येतो असे नाही.प्रत्येक महिन्याचे ओव्हूलेशन कधी होणार हे सांगणे तसे कठीण असते.त्यात जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर ओव्हूलेशनचा काळ शोधणे अधिकच कठीण होऊन बसते.
गर्भधारणेसाठी ओव्हूलेशनचा काळ महत्वाचा का असतो?
शूक्रजंतू दोन ते तीन दिवस जीवंत राहू शकतात.पण स्त्रीबीजामध्ये ओव्हूलेशन झाल्यानंतर फक्त २४ तासापर्यंतच फलित होण्याची क्षमता असते.त्यामुळे यशस्वी गर्भधारणेसाठी तुम्ही ओव्हूलेशन होण्याआधीच्या एक-दोन दिवसापासून ते ओव्हूलेशन झाल्यावर २४ तासांच्या आतच प्रयत्न करणे गरजेचे असते. जाणून घ्या यशस्वी गर्भधारणेसाठी कसा ओळखाल ओव्हूलेशनचा दिवस ?
ओव्हूलेशनचा काळ ओळखण्यासाठी काही टीप्स-
सिंम्पल कॅल्क्युलेशन-
तुमच्या पुढील मासिक पाळीच्या ड्यू डेटच्या १२ ते १६ दिवस आधी तुमचे ओव्हूलेशन होऊ शकते.जर तुमचे २८ दिवसांचे मासिकचक्र असेल तर १४ वा दिवस ओव्हूलेशनचा असू शकतो.पण जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर मात्र ही पद्धत तुमच्या उपयोगाची नाही.
ओटीपोटात वेदना होतात-
काही स्त्रीयांना ओव्हूलेशनच्या काळात काही मिनीटे अथवा काही तास पोटात सौम्य वेदना जाणवतात.या स्थितीला mittelschmerz असे म्हणतात.पण कधीकधी काही वेगळ्या कारणांनी वेदना होत असल्यास हा नेमका ओव्हूलेशनचा काळ आहे हे समजणे कठीण असू शकते.
व्हर्जायनल डिस्चार्ज बदलतो-
ओव्हूलेशनच्या काळात योनीमार्गातून बाहेर पडणा-या स्त्रावाचा रंग,प्रमाण व टेक्चर बदलतो.या स्त्रावावरुन तुम्ही तुमचा ओव्हूलेशनचा काळ शोधू शकता.ओव्हूलेशन होण्याच्या काही दिवस आधी या स्त्रावाचे प्रमाण वाढते व तो अधिक शुभ्र व स्वच्छ दिसतो. नक्की वाचा गरोदरपणाच्या काळात योनिमार्गातून स्त्राव होणं योग्य आहे का?
शरीराचे basal body temperature (BBT) अथवा सामान्य तापमान बदलते-
ओव्हूलेशनच्या काळात तुमच्या शरीराचे तापमान ०.४ ते १.० डिग्री इतके वाढते.हे तापमान क्षणात बदलत असल्यामुळे ते साध्या थर्मामीटरने मोजणे कठीण असू शकते.यासाठी तुमचे बीबीटी दररोज सकाळी मोजा व त्याची नोंद करुन ठेवा असे २ ते ३ महीने केल्यावर तुम्हाला पुढील मासिक पाळीतील ओव्हूलेशनचा काळ ओळखणे सोपे होईल.लक्षात ठेवा हे तापमान वाढू लागल्यानंतर दुस-या ते तिस-या दिवशी तुमचा गर्भधारणेचा योग्य काळ असू शकतो.
अल्ट्रासाउंड स्कॅनींग करा-
ही इनफर्टिलीटी ट्रिटमेंटमध्ये महत्वाची गोष्ट आहे.या स्कॅनींग मुळे दिवसेंदिवस तुमच्या स्त्रीबीजाचा होणारा विकास व ओव्हूलेशनमध्ये त्यांचे फलीत होणे तपासता येते.
वर देण्यात आलेल्या इतर पद्धती अविश्वसनीय असू शकतात व अल्ट्रासाउंड स्कॅनींग ही पद्धत वेळकाढू व खर्चीक असते.त्यामुळे ओव्हूलेशन काळ ओळखण्यासाठी ओव्हूलेशन कीट घेणे हा उत्तम पर्याय असू शकतो.
ओव्हूलेशन कीट- या आधुनिक पद्धतीमुळे तुमच्या मासिक पाळीचक्रातील ओव्हूलेशनच्या काळात वाढणा-या हॉर्मोन्सच्या पातळीतील बदलानूसार तुमच्या ओव्हूलेशनचा नेमका काळ शोधता येतो.हे ओव्हूलेशन कीट वापरणे अतिशय सोपे व सुलभ असते.तसेच या कीट मुळे तुम्हाला ९७ टक्के ओव्हूलेशनचा काळ शोधणे सोपे जाते.तुम्ही हे कीट कोणत्याही केमिस्ट कडून अथवा ऑनलाईन विकत घेऊ शकता.
ओव्हूलेशन कीट कसे वापराल?
१.तुमच्या मासिक पाळीचक्रातील दिवसांचा अंदाज घ्या.जर तुमच्या मासिक पाळीेचे दिवस वेगवेगळे येत असतील तर मागील तीन सायकलमधून छोटा मासिककाळ निवडा.
उदा-समजा तुमचा सप्टेंबर,ऑक्टोबर महीन्यातला काळ ३१ दिवसांचा होता व ऑगस्ट मधला २९ दिवसांचा होता तर तुम्ही तुमच्या मासिकचक्राचा काळ २९ दिवसांचा आहे असे समजा.
२.तुमच्या पुढील मासिक पाळीच्या १७ व्या दिवसाआधी टेस्ट करणे सुरु करा.म्हणजे तर तुमचे मासिकचक्र २९ दिवसांचे असेल तर तुम्ही मासिक पाळीच्या १२ व्या दिवशी टेस्ट करणे अपेक्षित आहे.
३.एका भांड्यांत युरीन घ्या व ते ओव्हूलेशन किटमध्ये दिलेल्या युरीन स्टीकने किटवर सोडा.इंटीकेटर पहात रहा त्यात होणारे रंगातील बदल पाहून तुमचे ओव्हूलेशन झाले आहे का ते ओळखा.टेस्ट पॉझिटीव्ह असेल तर तुमचे २४ ते ४८ तासांत ओव्हूलेशन होणार आहे असे समजा.
लक्षात ठेवा ओव्हूलेशन कीटमुळे फक्त तुमचे एलएच सर्ज मोजता येते.यामुळे तुम्ही गरोदर आहात का हे समजू शकत नाही.
ओव्हूलेशन कीट का फायदेशीर नसू शकते-
- एलएच सर्ज मुळे तुमचे स्त्रीबीज बाहेर पडले आहे याची हमी देता येऊ शकत नाही.
- मॅनोपॉजस्थितीजवळ असलेल्या महीलांची एलएच पातळी नेहमीच वाढलेली असू शकते.त्यामुळे ४० वर्षांपुढील महीलांसाठी हे कीट फायदेशीर नाही. आई होण्याचा निर्णय वयाच्या कोणत्या टप्प्यावर घेणं अधिक योग्य आहे ?
- गर्भधारणेसाठी औषध-उपचार सुरु असल्यास अथवा गर्भनिरोधके घेत असल्यास या कीटचा फायदा होऊ शकत नाही.
जर तुम्ही आई होण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर या गोष्टींचा तुम्हाला काही बाबतीत नक्कीच फायदा होऊ शकतो.पण गर्भधारणेसाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते निरोगी जीवनशैली व उत्तम सेक्स लाईफ.जर या दोन गोष्टी असतील तर तुम्हाला लवकरच गोड बातमी मिळू शकते.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock