Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

दिवसा सारख्या येणाऱ्या झोपेवर काही सोपे उपाय!

रात्री झोप झाल्यानंतर ही दिवसभर तुम्हाला झोप येत असते का? काम करत नसताना देखील तुम्हाला दमल्यासारखे वाटते? जर या प्रश्नांची उत्तर हो असतील तर तुम्हाला या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे. कारण ही underlying sleep disorder ची लक्षणं आहेत. याला hypersomnia असे म्हणतात.  Internal medicine and endocrinology at Apollo Clinics चे  consultant general physician डॉ. राजेंद्र नारायण शर्मा यांच्या सल्ल्यानुसार या विकारामध्ये दिवसा देखील खूप झोप येते. त्याचबरोबर निरुत्साही, थकल्यासारखे वाटते, विचारात स्पष्टता येत नाही.

रात्री जर पुरेशी झोप झाली असेल तर दिवसा झोप कशी येते?

बदललेली जीवनशैली हे याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. बैठे काम करणाऱ्या आणि अतिशय कमी प्रमाणात व्यायाम करणाऱ्या लोकांना hypersomnia होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर असलेल्याना हा विकार होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. hypersomnia होण्याची अजून काही कारणे देखील आहेत.

या परिस्थितीतून मार्ग कसा काढावा?

डॉ. शर्मांच्या सल्ल्यानुसार जर तुम्हाला दिवसभर निरुत्साही, सुतावल्यासारखे वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजाराच्या गंभीरतेनुसार तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाईल. यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप महत्त्वाची आहे. जर झोपताना येणारा श्वसनाचा अडथळा फार गंभीर स्वरूपाचा नसेल तर ही समस्या जीवनशैलीत काही लहानसे बदल करूनही दूर होऊ शकते. रात्रीच्या शांत झोपेसाठी करा हे ’3′ मिनिटांचे श्वसनाचे व्यायाम !

Apollo Cradle च्या  consultant obstetrician डॉ. शिल्पा आपटे यांनी hypersomnia तून बाहेर येण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत:

  • योग्य, पुरेशी झोप घ्या. आणि झोपेला महत्त्व द्या.
  • ३० मिनिटे व्यायाम करा.
  • दिवसा डुलकी काढणे कमी करा.
  • रात्रीच्या जेवणात जास्त मसालेदार, तेलकट पदार्थ घेणे टाळा. त्यामुळे असिडिटी होईल.
  • भरपूर पाणी प्या. झोपण्याआधी जास्त पाणी किंवा इतर पेय पिणे टाळा. त्यामुळे रात्रीच्या वेळी लघवीसाठी झोप मोड होणार नाही.

प्रेग्नसीमध्ये hypersomnia आढळून आला तर त्यावर उपाय काय?

प्रेग्नसीमध्ये अतिरिक्त झोप येणे साहजिकच आहे. डॉ. शिल्पांच्या सल्ल्यानुसार ७८% प्रेगनेंट महिलांमध्ये हा विकार दिसून येतो. परंतु प्रेगन्सीची १०व्या आठवड्यानंतर तो नाहीसा होतो. आधीपासून sleeping disorder असलेल्या महिलांमध्ये हा विकार अधिक दिसून येतो. प्रेग्नेंसीमध्ये hypersomnia होण्याची काही कारणे:

  • पहिल्या तीन महिन्यात progesterone हार्मोनची पातळी कमी होणे.
  • gastro-esophageal reflux disease म्हणजेच असिडिटीमुळे झोपेत येणारा अडसर, रात्री सारखी लघवीला होणे, चिंता, ताण यामुळे होणारी अपूरी झोप.
  • प्रेगन्सी मध्ये यावर काही औषध दिली जात नाहीत. त्यामुळे शक्य त्या टीप्स पाळून त्यावर नियंत्रण मिळवू शकता. परंतु प्रेगन्सीच्या काळात शरीराला आवश्यक तितकी झोप जरूर घ्या. अधिक माहितीसाठी नक्की वाचा: गर्भारपणात कशी घ्याल पुरेशी झोप?

 

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>