Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सेक्स न करताही होऊ शकतात हे लैंगिक आजार !

$
0
0

STD म्हणजे सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज. सामान्यतः हा आजार असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे होतो. पण तुम्हाला माहित आहे का? की लैंगिक संबंध नसताना ही या आजाराची लागण होऊ शकते. ही ’7′ लक्षणं देतात लैंगिक आजारांचे संकेत !

लैंगिक संबंध नसताना STD होण्याची कारणे:

STD ग्रस्त व्यक्तीशी शारीरिक संबंध आल्यास हा आजार होऊ शकतो. तसंच ओरल सेक्स मुळे देखील एखादी व्यक्ती या आजाराला बळी पडू शकते. ओरल सेक्समध्ये संपूर्ण शारीरिक संबंध ठेवले जात नाहीत तरीही हे इन्फेकशन होण्याचा धोका असतो. ओरल सेक्स करताना पार्टनरच्या शरीराच्या इन्फेक्टड भागाशी संबंध आल्यास gonorrhoea, chlamydia, herpes, hepatitis इत्यादी बॅक्टरीया, व्हायरस यांची लागण होते. त्याचप्रमाणे गुप्त भागात शेव्ह केल्याने त्वचेवर ब्रेक्स येतात आणि इन्फेकशनचा धोका वाढतो. vaginal infections जडण्याची कारणं, लक्षणं आणि उपचार !

स्वच्छतागृहांमधून STD चे इन्फेकशन होऊ शकते का?

ही शक्यता देखील नक्कीच आहे. अस्वच्छ टॉयलेट मधून अशा प्रकारचं इन्फेकशन पसरू शकतं. स्वच्छतागृहामध्ये इन्फेकशन पसरवणारे किटाणू, वस्तू असेल आणि ती जर ब्रेक्स असलेल्या त्वचेच्या संपर्कात आली तर STD चे इन्फेकशन होऊ शकते.

trichomoniasis या सारखे आजार ओले कपडे किंवा टॉवेल याच्या संपर्क इन्फेकशन झालेल्या भागाशी आला तर होतात. केसातील उवा एकमेकांच्या अती जवळीकतेमुळे होतात. त्याचबरोबर एकमेकांचे कपडे, टॉवेल वापरल्याने देखील केसात उवा होण्याची भीती असते.

STD चे सामान्य प्रकार आणि ते पसरण्याचे मार्ग:

 1. Gonorrhoea and Chlamydia
Gonorrhoea and Chlamydia याप्रकारचे इन्फेकशन साधारणपणे ओरल सेक्स किंवा शारीरिक संबंधांमुळे पसरते. गर्भारावस्थेत आईला झाले असेल तर बाळाला होऊ शकते.
टीप: शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करा. तसंच ओरल-व्हेजीनल सेक्स करताना डेंटल डॅम्स वापरल्यास इन्फेकशन होण्याचा धोका कमी होतो.

2. हेपिटायटिस
हेपिटायटिस ए हा आजार इन्फेक्टड व्यक्तीशी अतिशय घनिष्ट संबंध आल्यास किंवा असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास होतो. नक्की वाचा: असुरक्षित सेक्सनंतर घ्या हे ’3′ खबरदारीचे उपाय !

हेपिटायटिस बी हा आजार अतिशय गंभीर असून इन्फेक्टड व्यक्तीच्या रक्त, सेमेन किंवा योनीतून येणाऱ्या द्रवाशी थेट संबंध आल्यास होतो.
हा आजार आईकडून बाळाला होण्याची शक्यता अधिक असते. कारण त्यांचा सारखा जवळून संबंध येत असतो. घरातील इन्फेक्टड वस्तू यामुळे हा आजार होऊ शकतो. तसंच असुरक्षित इंजेकशन्स आणि रक्ताची देवाणघेवाण यातूनही हे इन्फेकशन पसरण्याची संभावना असते.
हेपिटायटिस सी हा आजार रक्ताची देवाणघेवाण करताना इन्फेक्टड रक्त शरीराला मिळाल्यास हा आजार पसरतो. आईमुळे बाळाला होऊ शकतो. औषधोपचार करताना झालेल्या असुरक्षित इंजेकशन्स मुळे तसंच इंजेकशन मध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधामुळे हा आजार होऊ शकतो.
हेपेटायटिसला प्रतिबंध करणाऱ्या काही टीप्स:
योग्य लसीकरण करून घेणे ही हेपेटायटिसला प्रतिबंध करण्याची पहिली पायरी आहे. लहान मुलं आणि मोठी माणसे या दोघांना ही हे उपयुक्त ठरेल.
स्वच्छ पाणी प्या, टॉयलेटवरून आल्यावर स्वच्छ हात धुवा, सुरक्षित सेक्सचा आनंद घ्या, स्वतःचे लेझर्स, सुया इतरांना वापरायला देऊ नका. स्वच्छतेच्या अशा काही लहान सहन गोष्टी नक्कीच फायदेशीर ठरतील.

3. Herpes:
Herpes हा व्हायरस एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी जवळचा संबंध आल्यास पसरतो. तसंच ओरल सेक्स, टूथब्रश, जेवणाची ताट, ग्लास इन्फेक्टड व्यक्तीसोबत शेअर केल्याने हा आजार होतो. आईमुळे बाळाला हा आजार होऊ शकतो.
टीप: काही साध्या सवयी आपल्याला या आजारापासून दूर ठेवतील. उदा. स्वच्छता राखणे व पाळणे, हात स्वच्छ धुणे, इत्यादी.
4. एचआयव्ही:
ओरल सेक्स मुळे एचआयव्ही होण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी असते. पण त्याबाबत गाफील राहू नये.
इन्फेक्टड रक्ताशी संबंध आल्यास, इन्फेक्टड इंजेकशन्स किंवा सुया वापरल्यास, ट्याटू करताना असुरक्षित सुई वापरली गेल्यास एचआयव्ही होण्याचा धोका असतो. प्रेग्नसी मध्ये एचआयव्ही झालेल्या आईकडून बाळाला तसंच ब्रेस्टफीडिंग करताना बाळाला हा रोग होऊ शकतो. जरूर वाचा: आईकडून बाळाला संक्रमित होणार्‍या HIV च्या धोक्याबाबत ’10′ प्रश्न व त्याची एक्सपर्ट उत्तरं !

हा व्हायरस अधिक काळ माणसाच्या शरीराच्या बाहेर राहत नाही.  शरीरातील ज्या द्रवात याची उत्पत्ती होते ते सुकल्यावर हा व्हायरस पटकन मरतो. त्यामुळे हा आजार किटाणूंपासून होत नाही. आणि तापाच्या व्हायरस सारखा तो पसरत ही नाही.

टीप: असुरक्षित लैंगिक संबंध टाळल्यास आणि योग्य ती स्वच्छता पाळल्यास आपण एचआयव्हीला प्रतिबंध करू शकतो.

1. Aspinall EJ, Hawkins G, Fraser A, Hutchinson SJ, Goldberg D. Hepatitis B prevention, diagnosis, treatment and care: a review. Occup Med (Lond). 2011 Dec;61(8):531-40. doi: 10.1093/occmed/kqr136. Review. PubMed PMID: 22114089.

2. Lü FX, Jacobson RS. Oral mucosal immunity and HIV/SIV infection. J Dent Res. 2007 Mar;86(3):216-26. Review. PubMed PMID: 17314252.

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>