अस्थमा पेशन्टसाठी अस्थमा इन्हेलर हे डिव्हाईस अतिशय परिणामकारक ठरते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे अस्थमा इन्हेलर्स उपलब्ध आहेत. एखाद्याला असलेल्या त्रासाच्या स्वरूपानुसार आणि गंभीरतेनुसार योग्य असे इन्हेलर निवडणे थोडे कठीण आहे. Venkateshwar Hospital, Dwarka, New Delhi चे Senior Consultant at Pulmonology Dr. Brig Ashok K Rajput (Retd) MD (Medicine), MD (Chest), DTCD, DNB (Pulmonary Medicine), FNCCP(I) यांनी आपल्या आजारानुसार योग्य इन्हेलर्स कसे निवडायचे आणि ते वापरण्याची अचूक पद्धत याबाबत मार्गदर्शन केले.
फुफ्फुसांच्या तीव्र आजारावर Aerosol or inhalational therapy हा ट्रीटमेंट चा महत्त्वाचा भाग आहे. Aerosol चा परिणाम हा तीन गोष्टींवर अवलंबून असतो:
- डिव्हाईसची योग्य निवड
- इन्हेलर वापरण्याची पद्धत.
- काही ठराविक परिस्थिती औषधे घेणे.
प्रामुख्याने तीन प्रकारचे इन्हेलर्स वापरले जातात.
1. Pressurized Metered Dose Inhaler (pMDI): गेल्या ३० वर्षांपासून वापरले जाणारे हे डिव्हाईस आहे. यात असलेल्या propellant- HFA (Hydro Fluoro Alkane) आणि surfactant- (sorbitan trioleate, lecithin or oleic acid) या औषधांमुळे श्वसनात अडथळा निर्माण करणाऱ्या बारीक कणांना अटकाव होतो. आणि औषधांचा योग्य परिणाम घडून येतो.
MDI वापरण्याची योग्य पद्धत:
- इन्हेलरची कॅप काढा आणि ३-४ वेळा इन्हेलर हलवा. (शेक करा.)
- इन्हेलर सरळ पकडा.
- मान ४५ अंशात मागे वाकवा. ज्यामुळे श्वसन नलिकेसोबाबत तोंडाचा भाग सरळ राहील.
- सावकाशपणे संपूर्ण श्वास सोडून द्या. फुफ्फुसं पूर्णपणे रिकामी होऊ दे.
- इन्हेलरचा तोंडात घालायचा भाग (mouthpiece) दोन ओठांच्या मध्ये पकडा. आणि ओठ बंद करा.
- सावकाश आणि खोल श्वास घेताना एकदा इन्हेलर अक्टिव्ह करा. aerosol चा मीटर डोस घशापर्यंत जाईल.
- अजून ५ सेकंद श्वास घेत रहा. जोपर्यंत फुफ्फुसं पूर्णपणे भरत नाहीत. आता औषधाचा परिणाम श्वसनमार्गाच्या खालच्या भागात जाणवू लागेल.
- १० सेकंद किंवा शक्य असल्यास अधिक वेळ श्वास धरून ठेवा.
- आता श्वास तोंडाने नव्हे तर नाकावाटे बाहेर सोडा.
- ३-५ मिनिटानंतर आधी घेतल्याप्रमाणे पुन्हा श्वास घ्या.
- कॉम्बिनेशन थेरपीमध्ये दोनदा असे केल्यानंतर तोंड पाण्याने धुवा.
Breath actuated MDI: Breath actuated metered dose inhalers (BA-MDIs) ला चालू होण्यासाठी पेशंटच्या श्वसनाची गरज असते. श्वसनाच्या कमी प्रवाहात देखील ते कार्य करते. त्यामुळे हे योग्य प्रकारे वापरण्यासाठी अधिक सरावाची किंवा ट्रेनिंग ची गरज भासत नाही. वापरण्यास अतिशय सोपं आणि अनेक वेगवेगळ्या ड्रग फॉरम्युलेशन मध्ये याचा उपयोग करता येतो. pMDI चे कार्य बिघडल्यावर देखील हे वापरणे फायदेशीर ठरते.
2. ड्राय पावडर इन्हेलर (DPI)
- एक किंवा अधिक औषधांच्या कॉम्बिनेशन साठी वापरू शकता.
- उच्छवासातून बाहेर येणारे ड्रग पार्टिकल्स कॅर्रीर मोलिक्युलस पासून वेगळे करून फुफ्फुसांना योग्य प्रमाणात औषधाचा पुरवठा करतात.
- या डिव्हाईसच्या कार्यात कोणताही अडथळा येत नाही. फक्त योग्य वापरासाठी अधिक श्वास घेण्यासोडण्याची गरज असते.
DPI वापरण्याची योग्य पद्धत:
- Assemble apparatus.
- त्यानंतर त्यात औषधाचे डोस भरा.
- माऊथपीस खालच्या दिशेला राहील अशा पद्धतीने इन्हेलर तोंडात धरा.
- डोकं थोडं मागे करा.
- सावकाश फुफ्फुसं रिकामी होईपर्यंत श्वास सोडा.
- माऊथपीस ओठांमध्ये घट्ट धरून ठेवा. (ओठ उघडू नका.)
- पटकन (२-३ सेकंद) आणि खोलवर (६०ली/मिनिट) श्वास घ्या.
- आता इन्हेलर काढा आणि नॉर्मल श्वास घ्या.
3. Nebulizers:
- हे डिव्हाईस इतके परिणामकारक नाही.
- श्वसनमार्गाच्या खालच्या भागात १-५% इतकेच औषधं पोहचतं.
- या डिव्हाईसमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते.
थोडक्यात:
- ५० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील पेशंटच्या श्वसनमार्गातील अडथळ्यांना नियंत्रित करण्यासाठी Aerosol therapy अत्यंत फायदेशीर आहे. आणि काळानुसार त्यात प्रगतशील बदल झाले आहेत.
- वेगवेगळ्या औषधांचे फॉरमेशन्स आपण यांत वापरू शकतो. पण औषधं शरीराला मिळण्याचं प्रमाण अजूनही कमीच आहे.
- प्रत्येक डिव्हाईसचे काही फायदे आणि तोटे असतातच.
- MDI हे डिव्हाईस valved spacer असताना किंवा नसताना ही चांगले कार्य करते आणि प्रामुख्याने वापरले देखील जाते. परंतु त्यासाठी योग्य परिस्थिती असणे गरजेचे आहे. तसंच काही पेशन्टसाठी हे डिव्हाईस गैरसोयीचे ठरू शकते.
- Breath‐activated डिव्हाईसच्या वापरासाठी श्वसन प्रवाह अधिक असणे गरजेचे आहे. त्यामुळे श्वसनाच्या काही मर्यादा असणाऱ्या पेशन्टसाठी हे कठीण ठरू शकेल. जरूर वाचा: लसूण- श्वसनविकारांना दूर ठेवणारा रामबाण घरगुती उपाय !
- पेशंटच्या क्षमतेनुसार आणि औषधांनुसार डिव्हाईस निवडावे.
- पेशंटला डिव्हाईसबद्दल सगळी व्यवस्थित माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निवडलेले डिव्हाईस वापरण्यास सोयीचे असायला हवे.
- aerosol medication च्या उत्तम कार्यासाठी सुरुवातील ते योग्य पद्धतीने वापरले गेले पाहिजे.
- हेल्थ प्रोफेशनल्सने सगळ्या delivery systems बाबत उत्तम माहिती ठेवणे आणि त्यात नैपुण्य साधणे गरजेचे आहे.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock