Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पुरुषांना देखील मोनोपॉजला सामोरे जावे लागते का?

$
0
0

सुरेश ४० वर्षांचा असून त्याचं करियर उत्तम आहे आणि त्याला मस्त फ्रेंड्स देखील आहेत. ‘पार्टी मॅन’ म्हणून ओळखला जाणारा सुरेश खरंतर दोन आयुष्य जगतोय. एकीकडे हा पार्टी मॅन आहे तर दुसरीकडे त्याला अनेकदा भावनिक चढउतार, मूड सविंग्सला सामोरे जावे लागते. आणि त्याची कामवासना (सेक्सुअल डिजायर) मरत चालली आहे. त्याची पार्टी मॅनची इमेज कायम राखण्यासाठी तो त्याच्या या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि ताणामुळे असं होत, असं मानतो. पण हा त्याचा मोनोपॉजचा टप्पा असल्याची पुसटशी कल्पना त्याला आहे.

पुरुषांमध्ये होणारा मोनोपॉज ही एक सत्य परिस्थिती आहे. जी प्रत्येक पुरुषामध्ये ४०शी नंतर आणि ५०शी च्या आधीच्या काळात दिसून येते. हे नक्की काय आहे? असा प्रश्न पडला का? तर आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं Men’s health physician and medical sex therapist Dr Vijayasarathi Ramanathan यांनी दिली आहेत.

मेन मोनोपॉज म्हणजे नक्की काय? हा एक गैरसमज आहे का?

नाही. हा गैरसमज नाही. काही पुरुषांमध्ये ४०शीच्या शेवटच्या टप्प्यात आणि ५० शी च्या सुरवातीच्या टप्प्यात काही शारीरिक, मानसिक, भावनिक, लेंगिक बदल किंवा लक्षणे दिसून येतात. या सर्व लक्षणावरून समजते की हा andropause किंवा male menopause चा काळ आहे. हार्मोनल इमबॅलन्समुळे स्त्रियांमध्ये होणारे बदल आणि मेन मोनोपॉजची ही लक्षणे साधारणपणे सारखीच असतात. मध्यम वयात हार्मोन testosteroneच्या स्त्रावामुळे ही लक्षणे दिसून येतात, असे म्हटले जाते. पण हे चुकीचे आहे. खरंतर वाढत्या वयाबरोबर पुरुषांच्या शरीरातील testosterone ची पातळी कमी होते. काही वेळेस testosterone च्या कमतरतेमुळे ही लक्षणे दिसून येतात. परंतु काही पुरुषांमध्ये ही लक्षणे आढळण्याचा आणि testosterone चा काही संबंध नसतो.

हे कधी आणि केव्हा होतं?

साधारपणे ही लक्षणे मध्यम वयात दिसून येतात. आयुष्याचा अर्धा टप्पा पूर्ण झाल्यावर ही फेज येते म्हणून याला ‘मिडलाईफ क्रायसेस’ असे म्हणतात. या सर्व लक्षणांसाठी आर्थिक अडचणी, नातेसंबंधातील समस्या, व्यस्त जीवनशैली आणि आरोग्यविषयी समस्या इत्यादींमुळे येणारा ताण आणि वाटणारी काळजी या गोष्टी कारणीभूत ठरतात.

पुरुषांना ठळकपणे जाणवतील अशी याची लक्षणे कोणती? फीमेल मोनोपॉजप्रमाणे हे देखील गंभीर असते?

नैराश्य, सेक्सची इच्छा न होणे, मूड सविंग्स, कोरडी आणि पातळ त्वचा, थकवा, अधिक घाम येणे, चिडचिड करणे, निरुत्साही वाटणे, मसल्स कमी होणे, एकाग्रता कमी होणे, erectile dysfunction, hot flashes अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. सगळ्यांच पुरुषांमध्ये सारखी लक्षणे आढळत नाहीत. या लक्षणांची तीव्रता आणि प्रकार हे व्यक्तीनुसार बदलते.

एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांच्या सल्ल्याची किंवा ट्रीटमेंटची गरज का भासते?

काहीतरी चुकीचं, वेगळं जाणवू लागलं की आपल्या विश्वासु व्यक्तीसोबत सगळं शेअर करा. या गोष्टी मनात ठेवण्यापेक्षा शेअर केल्यास बरं वाटतं. आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास स्थिती सुधारण्यास आणि लक्षणे आटोक्यात येण्यास मदत होते. त्याचबरोबर आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आयुष्यात पुढे जाण्याची मानसिकता विकसित होण्यास मदत होईल.

यावर उपाय काय?

यावर अनेक उपाय आहेत आणि लक्षणांच्या गंभीरतेनुसार ते केले जातात. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ऑलोपेथिक औषधे, समुपदेशन, वागण्यातील बदल असे अनेक उपाय आहेत.

या परिस्थितीतून जाताना पुरुषांना कमी ‘manly’ वाटतं का?

काही लक्षणांना सामोरं जाताना असं वाटू शकतं. उदा. erectile dysfunction त्यामुळे अचानक सेक्सुअल इनअक्टिव्हनेस येतो. त्यामुळे मनात अशी शंका येऊ शकते.

मोनोपॉजचा टप्पा कधी संपतो?

हे सांगणं खरंतर कठीण आहे. काही लक्षणं आयुष्यभर (व्यक्ती जिवंत असेपर्यंत) दिसून येतात. तर काही काळानुसार विरून जातात. काही लक्षणे औषधांनी आटोक्यात येतात आणि त्या व्यक्तीला पुन्हा आत्मविश्वास मिळवून देण्यास मदत करतात. त्यामुळे ती व्यक्ती आनंदी आयुष्य जगू शकते.

ही लक्षणे आटोक्यात आणण्यासाठी स्वतःहून काही प्रयत्न करता येईल का? आणि यासाठी उत्तम पर्याय कोणता?

नियमित योगसाधना, प्राणायाम, ध्यानधारणा केल्यामुळे नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे संवाद साधा. तुमच्या जवळच्या व्यक्तीशी किंवा डॉक्टरांशी याविषयी बोला. त्यामुळे परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होईल. खरंतर पुरुषांना आपल्या आरोग्यविषयक तक्रारी  इतरांना सांगणे आवडतं नाही. पण या समजातून बाहेर पडा आणि समस्या गंभीर होण्याआधी ती खुलेपणाने सांगून त्यावर मार्ग काढा.

पुरुषाच्या अशा परिस्थितीत त्याच्या पार्टनरने त्याला कशी मदत करावी?

सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे या कठीण काळात त्याला आधार देणे. त्याच्या अवस्थेबद्दल त्याची चेष्टा करण्याऐवजी जे काही मनात आहे, जे काही वाटतं ते बोलण्यास प्रवृत्त करणे. आणि जरी तो सेक्सुअली कमी पडत असेल तरी त्याचा पुरुषार्थ जपण्याचा प्रयन्त करा.

Reference:

NHS

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>