बाळाला स्तनपान करण्याचे अनेक फायदे असतात.स्तनपानामुळे बाळाचे पुरेसे पोषण होते.स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते.मात्र आजकाल करीयरसाठी स्त्रीयांना बाळंतपणानंतर लगेच घराबाहेर पडावे लागते.त्यामुळे त्यांना बाळाला स्तनपान करण्यासाठी मर्यादा येतात.अशा वेळी तुम्हाला ब्रेस्टपंपचा नक्कीच फायदा होऊ शकतो.घराबाहेर पडणा-या नवमातांसाठी ब्रेस्टपंप वरदान ठरु शकते.यासाठी नवमातेला ब्रेस्टपंपचा उपयोग व फायद्यांविषयी माहीती असणे आवश्यक आहे.ब्रेस्टपंप विषयी अधिक जाणून घेण्यासाठी ही माहीती जरुर वाचा.
ब्रेस्टपंपचा कसा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
ब्रेस्टपंपच्या सहाय्याने तुम्ही बाळासाठी तुमचे दूध काढून साठवून ठेऊ शकता व त्यामुळे तुम्ही बाळाजवळ नसलात तरी बाळाला तुमचे दूध मिळू शकते.ब्रेस्टपंपमुळे तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावरही तुमच्या बाळाला तुमच्या दूधाची कमतरता भासत नाही.केवळ काम करणा-याच नव्हे तर घरी रहाणा-या बाळाच्या आईला देखील या ब्रेस्टपंप मुळे एखाद्या महत्वाच्या कामासाठी वेळ काढता येऊ शकतो.एखाद्या बाळाला जन्मानंतर दूध चोखण्यास त्रास होत असेल अशा वेळी देखील ब्रेस्ट पंप फायद्याचा ठरु शकतो.प्रिमॅच्यूर बाळाला ठराविक काळाने वेळेत दूध देण्यासाठी देखील या ब्रेस्टपंपचा तुम्हाला फायदा चांगला फायदा होतो. जाणून घ्या स्तनपान करणाऱ्या मातांच्या आहारात असावेत हे ‘६’ पदार्थ !
चांगला ब्रेस्टपंप कसा निवडाल?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आईची गरज व वापर यानूसार ब्रेस्टपंप निवडा.
इंटरनॅशनली सर्टिफाईड प्रेगन्सी,लेक्टेशन अॅन्ड चाईल्ड न्यूट्रीशियन काउंसलर सोनाली शिवलानी यांच्या मते जर तुम्हाला कधीतरीच ब्रेस्टपंप वापरायचा असेल तर तुम्ही मॅन्युअल पंप खरेदी करु शकता.पण जर तुम्हाला डिलीव्हरी नंतर पुन्हा तुमच्या नोकरीवर रुजू व्हायचे असेल आणि तुमचे बाळ सहामहिन्यांपेक्षा लहान असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक ब्रेस्टंपंप वापरणे योग्य ठरेल.ब्रेस्टपंप निवडताना तो पंप तुमच्या स्तनाग्रांवर योग्य रितीने बसेल व तुम्हाला आराम मिळेल अशा पद्धतीचा निवडा.चांगल्या दर्जाच्या ब्रेस्टपंप मधून दूध काढताना जास्त वेदना होत नाहीत.इलेक्ट्रॉनिक ब्रेस्टपंप वापरताना तो स्तनांग्रांवर बसवून मशिन सुरु करावे लागते त्यामुळे दूध पंपाला जोडलेल्या उपकरणात जमा होते.इलेक्ट्रॉनिक ब्रेस्टपंपच्या सहाय्याने दोन्ही स्तनातून १५ मिनीटामध्ये दूध काढले जाते.जर तुम्हाला यासाठी खुपच कमी वेळ मिळत असेल तर तुम्ही ऑटोमेटीक ड्यूअल पंप वापरु शकता. नक्की वाचा जाणून घ्या नवमातांचे दूध वाढवतील आयुर्वेदाने सुचवलेले हे ’5′ घरगुती उपाय
मॅन्यूअल ब्रेस्ट पंप मध्ये मात्र तुम्हाला दूध सक्शन पंपाच्या सहाय्याने दूध स्तनामधून पिळून काढावे लागते.मॅन्यूअल पंपाने दूध काढण्यासाठी खुप वेळ व कष्ठ लागतात.मॅन्यूअल पंपाच्या सहाय्याने दोन्ही स्तनांमधील दूध काढण्यास ४५ मिनीटे लागतात.
सोनाली यांच्या मते ब्रेस्टपंपची निवड करताना अधिक स्पीड असलेला व बाळाप्रमाणे दूध ओढण्याची क्रिया करणारा ब्रेस्टपंप निवडा ज्यामुळे तुम्हाला अधिक आराम मिळेल.
जर तुम्हाला रोज ब्रेस्टपंप वापरावा लागणार असेल तर प्रथम ब्रेस्टपंप वापरण्याआधी एकदा ब्रेस्टपंपने दूध काढण्याचा सराव करा.सुरवातीला स्पीड कमी ठेऊन सराव करा त्यानंतर पंपाचा वेग वाढवा.सराव केल्याने दररोज तुम्ही शांतपणे व आरामात दूध काढू शकता.
प्रत्येक वेळी वापर केल्यानंतर मात्र ब्रेस्टपंपचा प्रत्येक भाग स्वच्छ व निर्जंतुक करण्यास विसरु नका.
ब्रेस्टमिल्क साठवून ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता?
बाळासाठी ब्रेस्टमिल्क साठवण्याचे अनेक मार्ग आहेत. दूध साठवून ठेवताना या गोष्टी जरुर लक्षात ठेवा.
- बाळासाठी ब्रेस्टमिल्क साठवताना ते चांगल्या स्टीलच्या भांड्यात अथवा मिल्क स्टोरेज बॅग्ज मध्ये साठवणे गरजेचे असते.सोनाली यांच्या मते.दूध साठवण्यासाठी काचेचे भांडे घेणे टाळा कारण काचेला दूधातील पेशी चिकटतात व त्यामुळे त्या बाळापर्यंत पोहचू शकत नाहीत.
- स्तनांमधील दूध काढल्यानंतर ते सामान्य तापमानामध्ये चार तास राहू शकते.सोनाली यांच्या मते जर यापेक्षा अधिक काळ दूध साठवण्याची गरज असेल तर ते फ्रीज मध्ये ठेवा किंवा खुपच जास्त वेळ साठवण्याची गरज असेल तर ते तुम्ही फ्रीजर मध्ये देखील ठेऊ शकता.
- फ्रीजमधील आईचे दूध पाच दिवस चांगले राहू शकते.तर फ्रीजर मध्ये तुम्ही आईचे दूध दोन आठवडे टिकवून ठेऊ शकता.
- फ्रीजरसाठी वेगळा कप्पा व डोअर असल्यास टेंपरेचर शुन्य डिग्री एफ वर हे दूध तुम्ही सहा महीने तर अगदी डीप फ्रीजर मध्ये टेंपरेचर-४डिग्री एफ वर १२ महीने दूध तुम्ही साठवू शकता.पण लक्षात ठेवा जितके जास्त दिवस दूध साठवणार तितकी जास्त त्यातील गुणवत्ता कमी होत जाणार.यासाठी साठवलेले दूध लवकरात लवकर बाळाला देणे हे फायदेशीर असू शकते.
- २४ तासांच्या वर गोठवलेले दूध सामान्य तापमानावर आणल्यानंतर एक तासाच्या आत बाळाला द्या.
- बाळाला पाजल्या नंतर भांड्यात उरलेले दूध टाकून द्या.
- स्तनातून दूध काढताना आनंदी रहा.
- ब्रेस्टपंप अथवा त्याच्या उपकरणांना हात लावण्यापुर्वी तुमचे हात स्वच्छ धुवा.
साठवलेले ब्रेस्ट मिल्क बाळाला कसे पाजावे?
साठवलेले स्तनातील दूध प्रथम सामान्य तापमानावर आणा व मगच बाळाला द्या.सोनाली यांच्या मते यासाठी दूधाची बॉटल वापरु नका कारण त्यामुळे बाळाला निपल्स मधला फरक जाणवेल.साठवलेले दूध बाळाला चमचा अथवा सिप्परच्या सहाय्याने पाजा.जर बॉटलने दूध द्यायचे असेल तर प्रत्येक वेळी ती स्वच्छ व निर्जंतुक करायला विसरु नका.तुम्ही बॉटल स्टर्लाझर वापरुन अथवा १५ मिनिटे पाण्यात उकळून निर्जतुक करु शकता. नक्की वाचा: स्तनपान देणार्या नवमातांसाठी खास ८ एक्सपर्ट टीप्स !
ब्रेस्टपंप दिवसातून किती वेळा वापरता येतो?
आईच्या ईच्छेनूसार ती ब्रेस्टपंप कधीही व कितीही वेळा वापरु शकते.मात्र फक्त आवश्यक्ता असेल तेव्हाच ब्रेस्टपंपचा वापर करा.जर पुरेसे दूध साठवले असेल तर उगाचच पंपने दूध दिवसभर काढत बसू नका.
ब्रेस्टपंप वापरण्याच्या काय मर्यादा आहेत?
वेळ मर्यादा-कामाच्या ठिकाणी प्रत्येक वेळी ब्रेस्टपंपने दूध काढण्यासाठी खाजगी वेळ व जागा तुम्हाला मिळेलच असे नाही.त्याचप्रमाणे दूध बाहेर साठवण्यासाठी देखील मर्यादा येतात.तसेच काही मातांच्या मते बाळाला स्तनपान करण्यापेक्षा ब्रेस्टपंप वापरण्यातच अधिक वेळ जाऊ शकतो.
भावनिक मर्यादा-सोनाली यांच्या मते ब्रेस्टपंपाच्या सहाय्याने काढलेले दूध पाजल्यामुळे बाळ व आईमध्ये भावनिक नाते दृढ होत नाही.त्यामुळे याचा परिणाम बाळाच्या वाढ व विकासावर होतो.
नव्या बाळासोबत ‘बॉन्डींग’ वाढवण्यासाठी स्टेप बाय स्टेप गाईड !
शारीरिक मर्यादा-जास्त प्रमाणात ब्रेस्टपंप वापरल्यामुळे आईच्या दूधाच्या पुरवठयावर दुष्परिणाम होतो.पंप कितीही चांगला असला तरी तो बाळाप्रमाणे दूध ओढू शकत नाही त्यामुळे आईला दूध भरपूर येण्याची प्रेरणा मिळू शकत नाही.
जर ब्रेस्टपंपने पुरेसे दूध येत नसेल तर काय कराल?
- यासाठी चांगल्या रचनेते व आकाराचे ब्रेस्ट पंप घ्या जे तुमच्या स्तनांवर योग्य रितीने बसवता येतील.
- ब्रेस्टपंपची सेटींग व्यवस्थित करा ज्यामुळे दूध योग्य वेगाने काढणे तुम्हाला शक्य होईल.अती वेगाने अथवा कमी वेगाने दूध काढल्यास त्याचा दूध पुरवठयावर परिणाम होतो.
- सारखा सारखा पंप वापरल्यामुळे देखील दूध कमी येऊ शकते.तुमच्या शरीराला दूध निर्माण करण्यासाठी पुरेसा वेळ द्या.एकदा दूध काढल्यानंतर दोन तासांनी पुन्हा पुरेसे दूध निर्माण होऊ शकते.त्यामुळे सारखे सारखे दूध काढू नका.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock