Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पुरूषांना अधिक हॅन्डसम करतील या ’7′ब्युटी ट्रीटमेंंट्स !

$
0
0

सध्या पुरुषांमध्ये देखील मेल ग्रुमींग व सौदर्यांबाबत अधिक जागरुकता वाढू लागली आहे.अधिक आकर्षक दिसण्यासाठी पुरुष स्त्रीयांप्रमाणेच सौदर्योपचार करुन घेतात.दिल्लीच्या नॅशनल स्कीन सेंटर मधील डॉ.तनेजा यांच्या मते सध्या अनेक पुरुष फेशियल व क्लिन-अप करुन घेताना आढळतात तर अनेक जोडप्यांना त्यांच्या लग्न प्रसंंगी प्रि-वेडींग पॅकेजमधील खास उपचार करुन घेणे आवडते.

पुरुषांच्या चेह-याचा आकार व त्वचा स्त्रीयांच्या चेह-याच्या आकार व त्वचेपेक्षा वेगळी असते.त्यामुळे पुरुषांवर करण्यात येणारे सौदर्योपचार वेगळे असतात.पुरुषांची त्वचा जाड व केसाळ असते.त्यामुळे त्यांच्या त्वचेचा प्रकार,संवेदनशीलता,त्वचा समस्या,गरज यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येतात.

स्त्री अथवा पुरुष दोघांमध्ये देखील त्वचा तजेलदार दिसण्यासाठी करण्यात येणारे व अॅन्टी एजींग उपचार हे समान असू शकतात.फक्त त्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल अथवा ऑरर्गेनिक पील,लेझर एनर्जी व इन्टेन्टसीटी,बोटोक्स व फिलर्स प्रत्येकाच्या त्वचेच्या गरजेनुसार निरनिराळे असू शकतात.पुरुष ब-याचदा चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी,अ‍ॅक्नेची भीती घालवण्यासाठी,अपघातानंतर आलेले व्रण काढण्यासाठी,त्वचा अधिक तजेलदार करण्यासाठी,केमिकल पील यासारखे सौदर्योपचार करण्यात येतात.अशा वेळी त्यांच्या समस्येनुसार योग्य त्वचातज्ञांचा सल्ला घेऊन त्यांच्यावर सौदर्योपचार करण्यात येतात.

दिल्लीच्या नॅशनल स्कीन सेंटरचे डायरेक्टर,डर्मोटोलॉजीस्ट  डॉ.नवीन तनेजा यांच्या सल्लानुसार पुरुषांसाठी करण्यात येणारे हे काही सौदर्योपचार-

डर्मल फिलर्स-

डर्मल फिलर्स हा उपचार त्वचेवरील स्कार्स व रिंकल्स या सारख्या समस्या दूर करण्यासाठी करण्यात येताे.आधुनिक पद्धतीनुसार यासाठी Restylane, Perlane, Juviderm ultra, Juviderm ultra plus व Juviderm XC चा वापर करण्यात येतो.त्वचेवर सुरकुत्या व अ‍ॅक्नेचे व्रण असल्यास हे फिलर्स त्वचेमध्ये इंजेक्शन द्वारा सोडण्यात येतात.हा उपचार सहन करण्यासारखा असून त्यामुळे त्वरीत परिणाम दिसून येतो. नक्की वाचा : तेलकट त्वचेसाठी 5 उपयुक्त फेसवॉश

बोटोक्स-

बोटोक्स हे एक नैसर्गिक प्रोटीन असून त्यामुळे चेह-यावरील स्नायू पुर्ववत झाल्याने सुरकुत्या कमी होतात.बोटोक्समुळे आयब्रोजवळील आडव्या फ्रोन लाईन्स,कपाळावरील आडव्या रेघा,डोळ्यांच्या कोप-याजवळ असलेल्या सुरकुत्या,नाकाच्या खाली असलेल्या बनी लाईन्स नाहीशा होतात.

केमिकल पील्स-

चेह-याच्या त्वचेवरील आऊटर लाईन्स काढण्यासाठी केमिकल पील मध्ये सेद्रींय फळांचे अॅसिड सोल्यूशन वापरण्यात येते.या फेशियल पील मुळे त्वचेचा पोत सुधारतो व त्वचा अधिक मुलायम होते.चेह-यावर डाग,सुरकुत्या व असमान पिंगमेंटेंशन असल्यास हा उपचार लाभदायक ठरतो.

मेसोथेरपी-

या थेरपीमध्ये त्वचेच्या खालील थरात विटामिन,मिनरल्स,औषधे व अमिनो अॅसिड असलेले वेदनारहीत इंजेक्शन दिले जाते.या थेरपीमुळे केसांची वाढ,चेहरा व मानेला तजेलदारपणा,चेहरा उठावदार दिसणे हा फायदा होतो. जाणून घ्या नवरदेवांसाठी खास ’7′ एक्सपर्ट ब्युटी टीप्स !

फोटो फेशियल-फोटोथेरपी अथवा लाईट थेरपीमुळे त्वचेला कृत्रिम तजेला येतो.सुरकुत्या,पिंगमेंटशेनचे डाग आणि वयोमानानूसार येणारी इतर काही लक्षणे असल्यास या उपचारांचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

लेझर स्कीन रिज्यूवेशन-

आजकाल लेझर उपचार करुन सहज त्वचेचा वरचा थर काढून टाकण्यात येतो.या उपचारांमुळे त्वचेमध्ये टाईटनींग इफेक्ट येतो.त्वचा मुलायम होते व त्वचेवरील डाग कमी होतात.त्वचेची छिद्रे मोठी झाली असल्यास लहान करता येतात.लेझर उपचारांचा रिंकल,फाईन लाईन्स,फोरडेड क्रिजींग व काऊज फिट या समस्या देखील फायदा होतो.

डार्क सर्कल ट्रिटमेंट-

जर तुमच्या त्वचेवर हायपर पिंगमेंटेश मुळे डार्क सर्कल्स आले असतील तर लवकरात लवकर चांगल्या एखाद्या त्वचातज्ञाचा सल्ला घ्या.कारण ते तुम्हाला याबाबत योग्य उपचार करण्याचा सल्ला देऊ शकतील.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>