दात येणे ही बाळाच्या वाढी दरम्यान होणारी एक खूप महत्वाची प्रक्रिया आहे.दात येत असल्यास बरीच मुले रडून हैराण होतात.सहाजिकच त्यामुळे बाळाला दात येणे ही पालकांसाठी एक आव्हानात्मक स्थिती असू शकते.मुंबईतील कोकीलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलच्या कन्सल्टंट पिडीयाट्रिशन डॉ.तनू सिंघल यांच्या मते सामान्यत: बाळाला वयाच्या ६ ते २४ महिन्यांच्या दरम्यान दात येतात.पण कधीकधी काही मुलांना अगदी लवकर म्हणजे ३ महीन्यांनी तर कधीकधी अगदी उशीरा म्हणजे १२ महिन्यांनी देखील दात येण्यास सुरुवात होते.त्याचप्रमाणे वरच्या पुढील दातांआधी बाळाला खालचे पुढील दात प्रथम येतात.
दात येताना बाळाच्या हिरड्या संवेदनशील होतात त्यामुळे बाळ रडते अथवा चिडचिड करते.आपल्या तान्हा बाळाला वेदना सहन करताना पहाणे पालकांना देखील थोडे कठीण जाते. तुमचे बाळ या वेदना सांगू शकत नसल्याने ते त्याच्या भावना रडून अथवा चिडून व्यक्त करु शकते.
दात येताना बाळामध्ये दिसणारी काही लक्षणे-
- बाळ चिडचिड करते-असे असल्यास काळजी करु नका.तुमच्या बाळाला दात येत आहेत का ते पहा.
- दूध पिण्यास अथवा खाण्यास नकार देते-असे असल्यास बाळाला जबरदस्ती खाण्यास देऊ नका कारण दात येत असल्यामुळे बाळाची भूक कमी होते.
- तुमच्या बाळाची नेहमीपेक्षा जास्त लाळ गळते-बाळाची नेहमीेपेक्षा जास्त गळणारी लाळ हे त्याला दात येण्याचे एक प्रमुख लक्षण असू शकते.पण ब-याचदा पालकांचा असा गैरसमज होतो की ही लाळ आपल्या हातातील चॉकलेट किंवा गोड पदार्थांमुळे गळत आहे.
- हात,बोटे किंवा मिळेल ती वस्तू बाळ चावू लागते-असे पदार्थ अथवा बोटे चावल्याने बाळाच्या हिरड्यांना आराम मिळतो.
- काहीही कारण नसताना मोठ्या मोठ्याने ओरडून आवाज करणे-बाळ रागाने चिडचिड करत नसून त्याला तुम्हाला त्याचा वेदना सांगायच्या असतात म्हणून ते मोठ्या मोठ्याने आवाज करते.
बाळाला दात येताना होणा-या वेदनेपासून आराम देण्यासाठी काही टीप्स-
तुमच्या बाळाला दात येत आहेत हे लक्षात येताच त्याला आराम मिळण्यासाठी या गोष्टी जरुर करा.
तुमच्या बाळाच्या हिरड्यांना मसाज करा-
तुमच्या बाळाला हिरड्या येत आहेत हे लक्षात येताच त्याच्या कोवळ्या हिरड्यांवरुन स्वच्छ बोटे अथवा कापड फिरवून त्याच्या हिरड्यांना हलका मसाज करा.डॉ.सिंघल यांच्यामते यासाठी कोणतेही औषधी जेल वापरणे टाळा. जाणून घ्या लहान मुलांच्या दूधाच्या दातांबाबत वेळीच जाणून घ्या या ’8′ गोष्टी !
बाळासाठी तीथर्स खरेदी करा-बाळासाठी योग्य व सुरक्षित अशी पाणी,जेल अथवा बीपीए फ्री प्लास्टीकचा वापर केलेली तीथर्स अथवा खेळणी त्यांना चावण्यासाठी द्या.डॉ.सिंघल यांच्या मते थंड तिथींग रिंग मुळे बाळाला आराम मिळू शकतो फक्त ती फ्रोजन नसावी कारण त्यामुळे बाळाच्या हिरड्यांना जखम होऊ शकते.
बाळाला नैसर्गिक पदार्थ चावण्यास द्या-
तुमच्या समोर तुम्ही तुमच्या बाळाला थंड गाजरासारखे नैसर्गिक पदार्थ चावण्यास देऊ शकता.डॉ.सिंघल यांच्या मते फक्त असे करताना तुम्ही स्वत: लक्ष ठेवा कारण असे पदार्थ चावल्यास त्याचा तुकडा बाळाच्या घशात अडकण्याची शक्यता असते.
इतर काही गोष्टी-जर सतत बाळाची लाळ गळत असेल तर मऊ कापडाने ती स्वच्छ करा नाहीतर त्यामुळे तुमच्या बाळाच्या गळा व चेह-यावर रॅशेस येऊ शकतात.
त्रास अगदीच असह्य असेल तर बाळाला औषधे द्या-
डॉ.सिंघल यांच्या मते सर्वात आधी बाळाचा त्रास कमी करण्यासाठी वरील सर्व गोष्टी करा.पण तरीही बाळाला वेदना सहन होत नसतील तर बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासिटीमॉलचा छोटा डोस ६ ते ८ तासांनी द्या.मात्र बाळाच्या या समस्येवर होमियोपॅथीवर करण्यात येणारे उपचार योग्य आहेत याबाबत अजून कोणतेही वैद्यकीय पुरावे हाती आले नाही आहेत. नक्की वाचा लहान मुलांचे दात काढल्यानंतर कशी घ्याल काळजी ?
लक्षात ठेवा-
बाळाला दात येताना ताप व डायरिया येेणे हे दात येण्याचे लक्षण नाही.त्यामुळे तुमच्या बाळाला ताप व डायरिया असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जा.त्याकडे दात येण्याचे लक्षण म्हणून दुर्लक्ष करु नका.
तुमच्या बाळाला दुधाचे काही दात आल्यावर ते दिवसातून दोन वेळा मऊ टुथब्रशने स्वच्छ करण्यास विसरु नका.
बाळ जरा मोठे झाल्यावर रात्री स्तनपान करणे अथवा दूधाच्या बाटलीने दूध देणे कमी करा.त्यामुळे बाळाचे दात लवकर किडणार नाहीत.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock