Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या सहज सोप्या उपायाने वाढवा शुक्राणूची संख्या !

$
0
0

भारतीय पुरुषांमध्ये वंध्यत्व ही वाढत चाललेली समस्या आहे. आपली बदललेली जीवनशैली हे यामागचे कारण आहे. पण याची कल्पना बऱ्याचजणांना नाही. याचबरोबर टाईट अंडरवेअर घातल्याने वंधत्व येण्याचा धोका वाढतो. तसंच गरम पाण्याने अंघोळ केल्यास किंवा सोना बाथ घेतल्याने देखील इंफेर्टीलिटीचा धोका वाढतो. याचीही अनेकांना माहिती नाही. केइएम हॉस्पिटल आणि जी. एस. मेडिकल कॉलेज मुंबईचे होनर्री प्रोफेसर आणि सेक्शुअल मेडिसिन डिपार्टमेंटचे हेड डॉ. राजन भोसले यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार गुप्त भागाची स्वच्छता कोमट पाण्याने करावी. नक्की वाचा : या ’5′ व्यवसायातील पुरूषांमध्ये इन्फ़र्टीलिटीचा धोका अधिक असतो !

ट्रक ट्रायव्हर सतत गाडी चालवत असतात आणि अति उष्णतेच्या सान्निध्यात असल्याने त्यांना वंध्यत्व येऊ शकते. खेळाडू जे ट्रेनिंग घेताना सतत जलद गतीने हालचाली करत असतात त्यांना देखील लो स्पर्म काउंटमुळे येणाऱ्या इन्फर्टिलिटीच्या समस्येला सामोरे जावे लागते. नक्की वाचा: Sperm Count कमी होण्यामागील ’17′ कारणं !

जर तुम्हाला देखील ही समस्या असेल तर डॉ. राजन भोसले यांनी यावर परिमाणकारक अशी टीप दिली आहे. यासाठी गुप्त भाग बर्फाच्या थंड पाण्याने धुवावा किंवा रोज १५ मिनिटे बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवा. डॉ. भोसले यांच्या म्हणण्यानुसार या उपायाने अनेकांना फायदा झाला आहे. याचे कारण असे की टेस्टिकल जे शुक्राणूंची निर्मिती करतं, त्याचं तापमान शरीराच्या तापमानापेक्षा एक किंवा दोन अंश कमी असतं. आणि हे तापमान स्पर्म काउंट करण्यासाठी योग्य असतं. तापमानात थोडसं जरी वाढलं तरी शुक्राणूंच्या निर्मितीत अडथळा येतो. त्यामुळे स्पर्म काउंट कमी होतो. टेस्ट्सचे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा कमी असल्याने ते शरीराबाहेर असतात. म्हणूनच गरम पाण्याने अंघोळ केल्याने किंवा सोना बाथ घेतल्याने टेस्ट्सचे कार्य मंदावते आणि वंधत्वाचा धोका वाढतो. जरूर वाचा:  अश्वगंधा – पुरूषांमधील इन्फर्टिलीटीचा त्रास दूर करण्याचा रामबाण उपाय !

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>