Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या उपचारांनी कमी केला जातो सर्व्हायकल कॅन्सरचा धोका !

$
0
0

भारतात सर्व्हायकल कॅन्सरमुळे दरवर्षी सुमारे 33,000 महिलांचा मृत्यू होतो. तर जगभरात सुमारे सर्व्हायकल कॅन्सरने मृत्यूमुखी होणार्‍यांपैकी  27% रुग्ण  भारतीय आहेत. मूळातच भारतीय स्त्रिया घर, संसार याची जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. परिणामी वेळीच निदान न झाल्याने कॅन्सरचा धोका अंतिम टप्प्यावर आल्यानंतर अधिकच धोकादायक बनतो. म्हणूनच सर्व्हायकल कॅन्सरच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

वेळीच सर्व्हायकल कॅन्सरचा धोका ओळखू शकल्यास या काही उपायांनी त्याचा धोका कमी करण्यास मदत होते.

कॅन्सरची वाढ होण्यापूर्वी गर्भाशयात होणार्‍या बदलांवर cryosurgery, लेसर सर्जरी यांनी उपाय करता येतात. मात्र उपचारांनी कॅन्सरची वाढ झाल्यानंतर उपचार करणे कठीण असते. Cryosurgery या शस्त्रक्रियेमुळे पेशींची होणारी अनियमित वाढ रोखता येते तसेच त्यांना नष्ट करणेही शक्य असते. तर लेजर सर्जरीमध्ये काही लेजर किरणांद्वारा अनियमित पेशींना नष्ट केले जाते. तसेच लेजर सर्जरीद्वारा अधिक परिक्षणासाठी टीश्यूचा लहानसा तुकडाही काढला जातो.

सर्व्हायकल कॅन्सरवर उपचार करताना रेडिएशन थेरपी, किमोथेरपी किंवा काही वेळेस या दोन्ही पद्धतींचाही एकत्र वापर केला जातो. कॅन्सरचे स्वरूप पाहता त्याचे उपचार ठरतात.

शस्त्रक्रियेसोबतच कॅन्सरच्या वाढीला कारणीभूत असणार्‍या पेशीदेखील काढून टाकल्या जातात. सर्व्हायकल कॅन्सरच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यावरील स्त्रियांना शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवला जातो.

  • Radical trachelectomy: भविष्यात गरोदर राहण्याची इच्छा बाळगणार्‍या, ट्युमरचे स्वरूप लहान असणार्‍यांना हा उपाय सुचवला जातो. या उपायामध्ये स्त्रियांची आई होण्याची क्षमताही टिकवली जाते. मात्र गर्भाशय, योनिमार्गाचा काही भाग आणि पेल्विक भागाजवळील लिम्फ नॉड काढला जातो.
  • Hysterectomy:  यामध्ये गर्भाशय काढून टाकले जाते. यानंतर स्त्रियांना मासिकपाळी येत नाही तसेच त्या गर्भवती राहू शकत नाहीत. तर या स्त्रियांमध्ये ओव्हरीज काढून टाकल्यानंतर मेनोपॉजचा काळ सुरू होतो. त्यामुळे मेनोपॉजच्या टप्प्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यानुसार पुढील उपचार ठरवा.
  • रेडियोथेरपी -रेडियो थेरपीमध्ये काही हाय एनर्जी किरणांचा वापर करून कॅन्सर सेल्स नष्ट केल्या जातात. हा पर्याय सर्व्हायकल कॅन्सरच्या कोणत्याही टप्प्यावर वापरला जातो. काही रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेनंतर उर्वरीत कॅन्सर सेल्स नष्ट करण्यासाठी रेडियोथेरपी केली जाते. Cervix च्या पलिकडे कॅन्सरची वाढ झालेली असल्यास रेडियोथेरपी आणि केमोथेरपी अशा दोन्ही  उपचारपद्धती केल्या जातात. पेल्विक भागाजवळ रेडिएशन केल्यानंतर ओव्हरीजचेही नुकसान होऊ शकते. या उपचारांनंतर तुम्हांला गर्भवती राहण्याचा निर्णय घ्यायचा झाल्यास उपचारांपूर्वी अंडी सुरक्षित ठेवा.
  • केमोथेरपी - यामध्ये काही ड्रग्जचा वापर करून कॅन्सर सेल्स नष्ट केल्या जातात. केमो थेरपी ही रेडीएशन थेरपीसोबत केली जाते. कॅन्सर इतर अवयवांमध्ये पसरला असल्यास केवळ केमोथेरपी वापरली जाते.  नक्की वाचा : हीना – केमोथेरपीचा साईडइफेक्ट दूर करणारा नैसर्गिक उपाय


उपचारांनंतर काय काळजी घ्याल  ?

सर्व्हायकल कॅन्सरच्या उपचारांनंतर नियमित चेक अप करा. यामध्ये फिजिकल एक्झाम, चेस्ट एक्स रे यांचा समावेश असतो. त्यामुळे लहान सहान समस्या वाढल्या तरीही त्यावर उपचार करणं आवश्यक आहे. तसेच कॅन्सर पुन्हा पलटण्याचा धोकाही तपासा. उपचार त्रासदायक असल्याने त्यातून लवकरात बाहेर पडावे असे रुग्णाला वाटते. परंतू कॅन्सर पलटणार नाही याची काळजी घ्या. आणि पुढील आयुष्य अधिक आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करा.  केमोथेरपीनंतर होणारे दुष्पपरिणाम टाळण्यासाठी असा असावा तुमचा आहार !

तुम्ही उपचारांनंतर पुरेसा आराम, व्यायाम आणि आहाराचे पथ्यपाणी सांभाळणे गरजेचे आहे. उपचारांनंतर लगेजच खावेसे वाटत नाही. तोंडाला चव नसते. अनेकांमध्ये भूक मंदावते, उलट्या, मळमळ, तोंड सुकण्याचा त्रास वाढतो. म्हणूनच अधिक अ‍ॅक्टीव्ह राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे मन इतर कामांमध्ये गुंतेल.योगा, स्विमिंग, चालण्याचा व्यायाम यामुळे आजारातून लवकर बाहेर पडायला मदत होईल. व्यायामामुळे ताण तणाव, वेदना, त्रास, मळमळ कमी होण्यास मदत होईल.

सर्व्हायकल कॅन्सरची वाढ होण्यापूर्वी त्याचे निदान झाल्यास त्यावत मात करणे शक्य आहे. cervix walls च्या आतमध्ये कॅन्सर पसरल्यास 92% रुग्ण सुमारे 5 वर्ष जगतात. मात्र हा कॅन्सर बाहेरच्या बाजूनेही वाढायला सुरवात झाल्यास हळूहळू वयोमान कमी होते. तसेच चाळीशीच्या टप्प्यावर नक्की करा या 6 कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट

 

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>