Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

नखांची वाढ आणि सौंंदर्य वाढवण्यासाठी असा करा ऑलिव्ह ऑईलचा वापर

$
0
0

ऑलिव्ह ऑईलचे महत्त्व, फायदे थोड्याफार प्रमाणात आपण सगळेच जाणतो. ऑलिव्ह ऑइल आरोग्यवर्धक असण्यासोबत सौंदर्यवर्धक ही आहे. आपली त्वचा, केस यांबरोबरच आपल्या नखांचे सौंदर्य राखण्यासाठी देखील ऑलीव्ह ऑइल अतिशय फायदेशीर आहे. नखं सुंदर व मजबूत होण्यासाठी बाजारात अनेक क्रीम उपलब्ध आहेत. पण त्या महागड्या क्रीम्स वापरण्याआधी कॉस्मेटॉलिस्ट नंदिता दास यांनी नखांच्या मजबुती आणि वाढीसाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत ते करून बघूया. जाणून घ्या:  नखं कमजोर होण्याची कारणं आणि उपाय !

ऑलिव्ह ऑईल कशाप्रकारे फायदेशीर ठरतं?

ऑलिव्ह ऑइलमुळे क्युटिकल मजबूत होतात व नखं वाढायला मदत होते. ऑलिव्ह ऑइल मध्ये असलेल्या व्हिटॅमिन इ मुळे नखांचे पोषण होते तसंच ते नखांमध्ये अगदी सहज मुरतं व नख वाढण्यासाठी अतिशय उत्तम ठरतं. ऑलिव्ह ऑइलमुळे बोन मिनरलाइजेशन (bone mineralisation) आणि कॅल्शिफिकेशन (calcification) च्या क्रिया अधिक चांगल्या प्रकारे होतात.

ऑलिव्ह ऑइल कसे वापरावे?

नखांना मजबूत बनवण्याचा हा सगळ्यात सोपा आणि कमी खर्चिक उपाय आहे. आठवड्यातून एकदा नखं २० मिनिटांसाठी ऑलिव्ह ऑइल मध्ये बुडवून ठेवा आणि स्वतःच फरक बघा. नैसर्गिकरित्या वाढवा नखांची शुभ्रता !

नखं मजबूत होण्यासाठी ऑलिव्ह ऑइल बरोबरच इतर काही गोष्टी आहेत. ज्या पाळल्यास फायदा होईल.

  • सारखे पाण्यात हात घालू नका. वारंवार हात धुतल्याने देखील नखं कमकुवत होतात. म्हणून सारखे सारखे हात धुणे टाळा.
  • नेलपॉलिश रिमूव्हर वापरणे टाळा. कारण त्यात असलेल्या केमिकल्समुळे नखं कोरडी होतील आणि ती तुटण्याची शक्यता वाढेल. नक्की वाचा: नखांचा पिवळेपणा हटवणारा घरगुती उपाय !
  • आरोग्यपूर्ण आहाराचे सेवन करा. बायोटिन (biotin) म्हणजेच व्हिटॅमिन बी७ आणि ओमेगा थ्री फॅटी असिड युक्त अन्नपदार्थ आहारात समाविष्ट करा. तसंच आळशी, सुकामेवा, कडधान्य, डाळी, अंडी, ब्रोकोली, दूध हे पदार्थ आहारात घेतल्याने नखांना मजबूती येईल.
  • हिवाळ्यात नखं तुटण्याची शक्यता अधिक असते म्हणून हातमोजे घाला. त्यामुळे नखं आणि त्वचा दोन्ही सुरक्षित राहील.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>