आपल्या वयोमानानुसार आपली दृष्टी देखील खालावते. त्यामुळे साधारणतः ही समजूत आहे की वय झालं की चष्मा लागणार, डोळ्यांचे विकार होणार. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास आणि योग्य वेळी उपचार केल्यास आपण डोळ्यांचे आरोग्य अधिक काळ टिकवू शकतो. फोर्टिस ऐस. एल. रहेजा हॉस्पिटल मुंबईच्या नेत्रचिकित्सक Dr. Madhavi Jeste यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जर वर बघण्यासाठी तुम्हाला चष्माची गरज असेल किंवा दोन सारख्या रंगामधील फरक ओळखताना अडचण येत असेल तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?
कोरडे डोळे: डोळ्यातील पाणी अधिक प्रमाणात सुकल्याने किंवा कमी प्रमाणात अश्रूंची निर्मिती होत असल्याने कोरड्या डोळ्यांची समस्या उद्भवते. प्रदूषण. कॉम्पुटरचा अधिक वापर आणि ए. सी. मुळे डोळ्यातील पाणी अधिक सुकते. व्हिटॅमिन ए ची कमतरता, मोनोपॉज किंवा हार्मोनल इम्बॅलन्स, एखाद्या औषधाची रिअक्शन या सगळ्यामुळे डोळ्यात अश्रूंची निर्मिती कमी प्रमाणात होते. कोरड्या डोळ्यांमुळे जळजळ होणे, खाज येणे, अंधुक दृष्टी तसेच प्रकाश सहन न होणे या समस्या उद्भवतात. काही वेळा कॉर्निया मध्ये बिघाड होऊन आंधळेपण येण्याची शक्यता असते. यामागची कारणं जाणून घेतल्यास आणि दिलेलं औषध, आय ड्रॉप्स नियमित घातल्यास यावर उपचार होऊ शकतो. जरूर वाचा: आयड्रॉप्स घालताना ही काळजी नक्की घ्या !
डोळ्यातून पाणी येणे: डोळ्यात काही कचरा, धूळ गेल्यास डोळ्यातून पाणी येते, कॉर्नियल इन्फेकशन किंवा जळजळ होते. जर यावर वेळीच उपचार केले नाही तर इन्फेकशन वाढून त्याचा दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. त्या मागचे कारण जाणून घेऊन डॉक्टर त्यावर उपाय करतील. जर कारण गंभीर नसेल तर तुम्ही त्यावर घरगुती उपाय देखील करू शकता. त्यासाठी थंड पाण्यात भिजवलेला रुमाल दिवसातून काही वेळा डोळ्यावर ठेवा. डोळ्यांतून सतत पाणी येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
मोतीबिंदू: हा आजार अधिकतर वयोमानानुसार होतो. क्वचितच याचे कारण डोळ्यांची जळजळ, डोळ्यांना झालेली जखम, इन्फेकशन हे असते. मधुमेहींना हा आजार कमी वयात होऊ शकतो. यावर वेळीच उपचार न झाल्यास आंधळेपणा येऊ शकतो. आणि आपल्या देशात हे अगदी सामान्य झाले आहे. वेळीच ऑपरेशन करून मोतीबबिंदू काढून टाकल्यास आपण आपली दृष्टी परत मिळवू शकतो. नक्की वाचा: दृष्टी अंधूक होण्यामागे असू शकतात ही ’14′ कारणंं !
काचबिंदू: डोळ्यांवर येणाऱ्या ताणामुळे डोळ्यांच्या नसेत बिघाड होऊन आंधळेपणा येण्याची शक्यता असते. काचबिंदूचे निदान सुरवातीच्या काळात झाले तर त्यावर औषधे देऊन किंवा ऑपरेशन करून उपचार करता येतो. यासाठी कोणतेही घरगुती उपाय नाहीत.
डायबिटिक रेटिनोपैथी: आंधळेपणा येण्याचे हे अजून एक कारण आहे. अधिक काळापासून मधुमेह असणाऱ्यांना आणि त्याच्या अनियंत्रित प्रमाणामुळे हा आजार होतो. यावर वेळीच उपचार केलेले योग्य ठरतील. कारण तसे न झाल्यास कायमस्वरूपी आंधळेपणा येऊ शकतो.
Age-related macular degeneration: हा आजार वयोमानानुसार होतो. या आजारामध्ये सेंट्रल व्हिजन गमावण्याचा धोका असतो. यावर उपचार नाहीत. पण इंजेकशनमुळे काही प्रमाणात दृष्टी वाचवली जाऊ शकते.
Presbyopia: डोळ्यांचे स्नायू कमजोर झाल्याने ही समस्या उद्भवते. चाळिशीनंतर दृष्टीवर परिणाम होऊन चष्मा लागतो. यावर कोणताही घरगुती उपाय नाही.
डबल व्हिजन: ही गंभीर समस्या आहे. डोळ्यांच्या स्नायूंना पॅरॅलिसिस झाल्यामुळे हा आजार होतो. याचे कारण मेंदूतील बिघाड देखील असू शकते. यावर वेळीच ट्रीटमेंट होण्याची गरज असते. जाणून घ्या: मोबाईल, कॉम्प्युटरच्या अति वापराने वाढतात हे डोळ्यांचे विकार!
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock