थायरॉईड ग्रंथींमधून हार्मोन्स सॅक्रिट होणारे हार्मोन्स शरीराची चयापचय क्रिया आणि इतर कार्य नियंत्रित करतात. ज्यामुळे शरीराचा वाढ व विकास होतो. तुमच्या शरीराच्या मेटॅबॉलिझमवर आणि ऊर्जा वापरण्याच्या पद्धतीवर थायरॉईड हार्मोन्स तुमचं वजन नियंत्रित करतात.
योग्य आहार घेत असताना ही वजन कमी होणं, हृदयाची गती वाढणं, उच्च रक्तदाब, खूप घाम येणे, अस्वस्थता, गळ्याचा भाग वाढणे, कमी काळाच्या अंतराने पिरिएड येणे त्याचबरोबर हाताची थरथर होणे ही सगळी हायपर थायरॉईजम (hyperthyroidism) ची लक्षणे आहेत. म्हणजेच हार्मोन्सचे शरीरातले प्रमाण वाढते.
वजन वाढणे, सुस्ती येणे, हृदयाची गती कमी होणे, हात सुन्न पडणे, गळ्याचा भाग वाढणे, केस, त्वचा रुक्ष होणे, मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होणे, बद्धकोष्ठता ही हायपोथायरॉईजम (hypothyroidism) ची लक्षणे आहेत. म्हणजेच हार्मोन्सचे शरीरातील प्रमाण कमी होणे. नक्की वाचा: Hypothyroidism चा त्रास कमी करण्यासाठी खास डाएट प्लॅन !
व्यायामामुळे थारॉईड च्या समस्येवर काही परिणाम होईल का?
थारॉईडसाठी अनेक औषधे बाजारात उपलब्ध आहेत. व्यायामामुळे समस्या नियंत्रित ठेवण्यात मदत होते. तसंच थारॉईडची लक्षणे आढळ्यास सुरुवातीच्या काळात व्यायामाचा चांगला फायदा होऊ शकतो.
थारॉईडचे कमी प्रमाणमुळे चयापचय(metabolism) क्रिया मंदावते. खूप सुस्ती आणि थकवा येतो. तसचं त्यामुळे हाय कोलेस्ट्रॉलची शक्यता वाढते. शरीरातील serotonin ची पातळी कमी होते. त्यामुळे डिप्रेशन चा धोका वाढतो. मनुष्य तणावग्रस्त होतो. अशी काही लक्षणे आढळ्यास आपलय वजनावर लक्ष ठेवा. अधिक वजन आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू देऊ नका. त्यामुळे तुम्हाला डिप्रेसड वाटणार नाही. त्याचबरोबर तुमचा मूड चांगला राहण्यास मदत होईल. व्यायामामुळे वजन नियंत्रित राहण्यास तसेच नैराश्य, ताणापासून दूर राहण्यास मदत होईल. ताण दूर करण्यासाठी: सलंब सर्वांगासन- ताण दूर करण्याचा उपाय
कोणत्या प्रकारचे व्यायामप्रकार फायदेशीर ठरतील?
हायपोथायरॉईजम मुळे सांधे व स्नायू आखडतात. दुखू लागतात. यासाठी तुम्ही ऍरोबिक्स करू शकता. वजन कमी करण्यासाठी आणि स्नायूंच्या बळकटीसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाईझ केल्याने फायदा होईल.
हायपर थायरॉईजममुळे वजन कमी होणे, हृदयाची गती कमी होणे असे अनेक त्रास होतात. तसंच शरीरात कॅल्शिअम आणि फॉस्फरस ची कमतरता निर्माण होते. त्यामुळे हाडाची घंटा कमी होऊन हाडं कमकुवत होतात. रेसिस्टन्स एक्सरसाइज स्यानु बळकट करतात, हाडं मजबूत करतात ज्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो.
थायरॉईडचे मुख्य कारण मनावरचा ताण हे आहे. म्हणून त्यासाठी योगसाधना करणं हा एक उत्तम उपाय आहे. ध्यानधारणा मन आणि शरीरावरचा ताण निघून जाईल आणि शांत, प्रसन्न वाटेल. जरूर वाचा: डबल चीन आणि थायरॉईड सारख्या समस्यांवर प्रभावी योगासनं !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock