Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

त्वचा अचानक संवेदनशील होण्याची ही आहेत ५ कारणे

$
0
0

आपली त्वचा नितळ, मुलायम राहावी म्हणून आपण काय नाही करत ? आपल्याला शक्य ते सगळं करण्याचा आपला प्रयन्त असतो. पण हे सगळं करत असताना नकळत आपल्याकडून चुका होतात आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात.  योग्य ती काळजी घेत असताना देखील तुमची त्वचा अचानक लालसर आणि संवेदनशील होते. त्वचा तज्ज्ञ डॉ. सेजल शहा यांनी या मागची कारणे सांगितली आहेत.

1. तुम्ही रेटिनॉलचा अधिक वापर करता: त्वचेचा काळेपणा, सुरकुत्या दूर करण्यासाठी रेटिनॉलचा वापर करतात. विशेषतः जळल्यावर, भाजल्यावरही  रेटिनॉल वापरले जाते. परंतु  भाजल्यावर किंवा काही लागल्यावर याचा वापर करणे टाळा. जरूर वाचा: भाजण्यावर करा हे ‘७’ घरगुती उपाय

2.   तुम्ही स्क्रबचा अति वापर करता : स्क्रबच्या योग्य वापराने त्वचेला तजेला येतो. पण त्याचा अति वापर त्वचेला हानी पोहचतो. अधिक प्रमाणात स्क्रब केल्याने त्वचेच्या वरच्या भागावर क्रॅक्स येतात. त्यामुळे त्वचा लालसर होऊन जळजळ होते. स्क्रब करताना हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. घरगुती स्क्रब बनव्यासाठी वाचा: तांदूळ आणि दह्याने वाढवा त्वचेचे सौंदर्य !
3. तुम्ही जास्त प्रॉडक्ट्स वापरता: अँटी एजिंग प्रॉडक्ट्सच्या अति वापराने त्वचा अतिशय संवेदनशील होते. glycolic acid आणि salicylic acid यांसारखे घट्क अतिशय घातक असतात. त्यामुळे त्वचेसाठी कोणतेही प्रोडक्ट वापरताना काळ्जीपुर्वक वापरा. नक्की वाचा: स्ट्रॉबेरीने वाढवा तुमच्या त्वचेचं सौंदर्य !
4. तुम्ही मॉइश्चरायजर वापरणे टाळता: खरखरीत व रुक्ष त्वचेसाठी मॉइश्चरायजर  लावणे हा एक उत्तम उपाय आहे. अंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायजर  लावावे. ही मॉईशरायजर लावण्याची योग्य वेळ आहे. अंघोळीसाठी अति गरम पाणी वापरू नये. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा संवेदनशील होते.
5. तुम्ही चुकीचे क्लीन्जर वापरता: क्लीन्जर हे  alkaline pH युक्त असेल तर ते त्वचेसाठी अतिशय हानिकारक ठरते. ते त्वचेतील नैसर्गिक तेल शोषून घेतात. त्यामुळे त्वचा कोरडी व रुक्ष होते. त्यामुळे क्लीन्जर निवडताना काळजीपूर्वक निवडा.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>