Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

त्वचेवर दिसणारी ही ’6′लक्षणं देतात लैंंगिक आजारांचे संकेत !

$
0
0

सेक्शूली ट्रान्समिटेड डिसिस म्हणजेच लैंगिक आजाराविषयी आपल्याला सर्व माहिती असणे खूप गरजेचे आहे.कारण या विकारांमध्ये कोणतेही लक्षण लगेच दिसून येत नाही.हा विकार वाढल्यावर त्याची लक्षणे दिसू लागतात.एसटीडी  मध्ये निरनिराळे प्रकार आहेत.हे आजार संक्रमित व्यक्तीसोबत सेक्स संबंध आल्यास पसरतात.या विकारांचे संक्रमण झाल्यास त्या व्यक्तीच्या त्वचेमध्ये देखील अनेक बदल दिसून येतात.यासाठी जाणून घ्या एसटीडी मध्ये आढळणारी ही काही त्वचा लक्षणे.

खाज येणे व त्वचा लालसर होणे-

एसटीडीमध्ये येणा-या बुरशीमुळे त्वचा लाल होते व मांड्यांकडील भागावर खाज येते.यीस्ट इनफेक्शनमध्ये देखील पेनिस व व्हरजायनामध्ये खाज येते व त्वचेचा दाह होतो.खरुज(Scabies) झाल्यास त्वचेला रात्री भयंकर खाज येते.public lice या समस्येमध्ये देखील खाज येणे हे लक्षण आढळते.ट्रायकोमोनास या परजीवी इनफेक्शन मध्ये देखील गुप्तांगाला खाज,जळजळ,लालसरपणा व वेदना होतात.सिफलीस syphilis या विकाराच्या दुस-या टप्प्यात योनीमार्ग व गुद्दवाराच्या मुखाच्या भागाला लाल किंवा तपकिरी रॅशेस येतात.त्याचप्रमाणे हे रॅशेस हात व पायाच्या तळव्यांना देखील येतात.नागिण (herpes infection) मध्ये देखील प्रथम त्वचेला दाह होतो व मुंग्या येतात.

अल्सर-

जेनीटल अल्सर वेदना रहित असतात यामुळे मांड्याच्या सांध्या कडील भागात Granuloma inguinale येतात. तर Chancroid मध्ये असणारा जेनीटल अल्सर हा वेदनायुक्त असतो.

फोड अथवा जखम होणे-

Herpes virus infection अथवा नागीण हा आजार असल्यास जननेद्रिये व गुद्दवाराच्या मुखाकडील भागावर छोटे पाणीदार फोड येतात.हे फोड खुप संवेदनशील असून लगेच फुटू शकतात. ओठांवर देखील लहान फोड येणे हे Herpes virus infection चे एक लक्षण आहे.

जननेद्रिंय,गुदाशय,तोंड अथवा ओठ अशा इनफेक्शन झालेल्या भागाला वेदनारहित छोटे फोड येणे सिफलीस Syphilis या विकाराचे एक प्रमुख लक्षण आहे. दहा दिवसांनंतर हे फोड लालसर झाल्यास व शरीरावर पेनी-साईज रॅशेस आल्यास हे  सिफलीस syphilis या विकाराचे दुस-या टप्यातील लक्षण असू शकते.

गुप्तांगाला वेदना व फोड हे Chancroid चे लक्षण आहे.एका दिवसामध्ये त्याचे रुपांतर पिवळसर राखाडी रंगाच्या अल्सरमध्ये होते.

चामखीळ अथवा Warts-

संक्रमण झालेल्या त्वचेचा जवळून संबध आल्यास एचपीव्ही विकार होतो ज्यामुळे जनेनद्रिंयाना चामखीळे अथवा Warts येतात.या संक्रमणामुळे जनेनद्रिंयाला लहानलहान त्वचेच्या रंगाचे चामखीळ अथवा काळपट सूज येते.या विकाराच्या संक्रमित व्यक्तीसह ओरल सेक्स केल्यास त्यामुळे तोंड अथवा घश्यामध्ये देखील हे संक्रमण होते.काही जणांमध्ये या चामखीळांचा आकार मोठा असू शकतो.

डोळे व त्वचा पिवळसर होणे-

हिपॅटायटीस इनफेक्शन मध्ये त्वचा व डोळे पिवळसर होतात.

लहान पुळ्या येणे-

Molluscum contagiosum मध्ये त्वचेवर अगदी लहान आकाराच्या पुळ्या येतात. Herpes  infectionअथवा नागीण इनफेक्शन मध्ये देखील जननेद्रिंयावर लहान लहान पुळ्या येतात.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>