Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या आरोग्यदायी फायद्यांंसाठी आहारात करा राजगिर्‍याचा समावेश !

$
0
0

राजगिर्‍याचा वापर प्रामुख्याने उपवासाच्या दिवसात आवर्जून केला जातो. हलक्या फुलक्या राजगिर्‍यापासून पुर्‍या, चिक्की, थालिपीठं केली जातात. काही जण राजगिर्‍याचा गोड शिरा, उपमादेखील करतात. त्यामुळे नियमित जेवणातही राजगिर्‍याचा वापर करता येऊ शकतो. म्हणूनच तुमच्या आहारात नेमका राजगिर्‍याचा वापर कशाप्रकारे करता येऊ शकतो या करिता Fortis Hospital Mohali च्या Dietetics & Nutrition हेड सोनिया गांधी यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.

हाडांचे आरोग्य – अनेक धान्यांच्या तुलनेत राजगिर्‍यामध्ये कॅल्शियम हे तिप्पटीने अधिक असते. यामुळे आहारात राजगिर्‍याचा समावेश करणे हितकारी आहे. त्यामुळे हाडांना मजबुती मिळते. तसेच ऑस्टोपोरायसिसचा धोका आटोक्यात राहतो.

घट्ट केस – नियमित आहारात राजगिर्‍याचा समावेश केल्याने केस अकाली पांढरे होण्याची समस्या आटोक्यात राहते. राजागिर्‍यामध्ये आढळणारे lysine घटक केसांना मूळापासून बळकट बनवतात. तसेच राजगिर्‍यातील cysteine घटक केसांना आवश्यक असणारे प्रोटीन घटक मिळवून देण्यास मदत करतात.

पोषकता – राजगिर्‍यामध्ये कॅल्शियम घटक मुबलक असतात. त्यासोबतच मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलिक अ‍ॅसिड आणि लोहदेखील मुबलक आढळते. राजगिर्‍यामध्ये सोल्युबल फायबर,प्रोटीन आणि झिंक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. राजगिर्‍यामध्ये लोह मुबलक असल्याने अ‍ॅनिमियाचा त्रासही आटोक्यात राहतो.

कोलेस्ट्रेरॉलवर नियंत्रण ठेवा – राजगिर्‍यामध्ये आढळणारे तेल आणि phytosterols घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉलची पातळीही कमी करते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

दाह शामक – राजगिर्‍यामध्ये आढळणारे  peptides घटक दाह कमी करतात तसेच वेदना कमी करण्यास फायदेशीर ठरतात. तसेच राजगिर्‍यामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट मुबलक असल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्सचा धोका आटोक्यात ठेवण्यास मदत होते. परिणामी अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.

कसा कराल राजगिर्‍याचा तुमच्या आहारात समावेश ?

पुडींग, खीरअशा गोडाच्या पदर्थांमध्ये राजगिर्‍याचा वापर करता  येऊ शकतो. मल्टीग्रेन फ्लोअर मध्ये राजगिर्‍याचे पीठ मिसळून त्याचा वापर करणेदेखील आरोग्यदायी आहे. यासोबतच राजगिर्‍याचा डोसा, राजगिराकढी आणि बिस्किटं  यामध्ये राजगिर्‍याचा वापर केला जाऊ शकतो.

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>