रुट कॅनल ही दातांच्या उपचारांसाठी करण्यात येणारी एक उत्तम पद्धत आहे.मात्र अनेक लोक दात खराब झाले असल्यास देखील हे उपचार करुन घेणे टाळतात.दातांच्या समस्येचा नकळत तुमचे आरोग्य व दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो.या उपचारांबाबत तुम्हाला सर्व माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.आम्हाला अनेक जणांनी रुट कॅनल या विषयी विचारलेल्या या निवडक प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देत आहोत.
१.रुट कॅनल उपचार खुप वेदनादायक असतात का?
आपल्या प्रत्येक दाताच्या पोकळीत नसा व रक्तवाहिन्या जोडलेल्या असतात ज्यामुळे दातांचे पोषण होते.दात किडू लागल्यास इनफेक्शन वाढत जाऊन ते दातांच्या मुळांपर्यंत शिरते.दातांच्या नसा व रक्तवाहिन्यांवर याचा दुष्परिणाम होतो.दातांच्या नसा व रक्तवाहिन्या निर्जीव झाल्यामुळे तिथे इनफेक्शन व पस निर्माण होतो.इनफेक्शनमुळे त्या भागाला सूज येते व वेदना होतात.त्यामुळे रुट कॅनल उपचार करावे लागतात.
जर बराच काळ हे उपचार केले गेले नाहीत तर त्याचा दातांच्या आजूबाजूच्या हाडांवर परिणाम होऊन अधिक नुकसान झाल्यास पस बाहेर येऊ शकतो.
कधीकधी जर दात अधिकच किडला असेल आणि रुट कॅनल उपचारासांठी तुम्हाला अॅन्टी बायोटीक्स दिल्या नसतील तर तुम्हाला वेदना होऊ शकतात.पण जर तुमचा दात कमी प्रमाणात किडला असेल तर वेदना होत नाहीत.त्याचप्रमाणे आजकाल करण्यात येणा-या आधुनिक पद्धतीनुसार भूल दिल्यामुळे रुट कॅनल उपचार करताना वेदना जाणवत नाही. जाणून घ्या दातांची शुभ्रता वाढवणार हा टाकाऊ पदार्थ
२.रुटकॅनल ऐवजी दात मुळापासून काढून टाकणे योग्य असू शकते का?
मुळीच नाही.आपल्या शरीरात दातांचे महत्व अनमोल आहे.खोट्या दातासोबत नैसर्गिक दातांची तुलना होऊ शकत नाही.एक दात काढून टाकल्याने समस्या कमी होत नाही तर अधिक वाढते.कारण यामुळे त्याच्या आजूबाजूचे दात खिळखिळीत होतात,हिरडयांच्या समस्या निर्माण होतात व अन्न चावणे कठीण होते.
३.रुट कॅनल उपचारांसाठी खुप वेळ का लागतो?
रुट कॅनल उपचार करताना तुमचा दात किडला असल्यास प्रथम अॅन्टीबायोटीक्स देऊन त्यामधील वेदना व सूज कमी करण्यात येते.त्यानंतर तीन ते चार दिवसांनी डेटिस्ट त्यांच्या साधनांच्या सहाय्याने तुमच्या दातांची मुळे स्वच्छ करतात.दात मुळापासून स्वच्छ केल्यानंतर मुळांमध्ये पुन्हा इनफेक्शन होऊ नये यासाठी साहित्य भरण्यात येते.व त्यानंतर दातासारखी कॅप त्या भागावर बसवण्यात येते.त्यामुळे या उपचारासाठी वेळ लागतो. नक्की वाचा एका मिनिटात हटवा दातांचा पिवळेपणा !
४.जर दातामध्ये वेदना होत नसतील तर रुट कॅनल उपचारांची गरज आहे का?
रुट कॅनल करताना वेदना होत नाहीत.जर दात काही काळापासून मृत अवस्थेत असेल तर मुळीच वेदना होत नाहीत.पण जर दात किडल्यामुळे इनफेक्शन झाले असेल तर त्या भागात झालेल्या दुखापतीमुळे वेदना होतात.त्यामुळे दात दुखू लागल्यास योग्य वेळीच रुट कॅनल करुन घेणे आवश्यक असते. जाणून घ्या दातदुखीची 10 कारणं !!
५.जर उपचारांमध्ये डॉक्टरांनी खराब झालेल्या दातांच्या नसा काढून टाकल्या आहेत तर मग त्या भागात वेदना का होतात?
काही वेळा दुखावलेला दात रुट कॅनल उपचार केल्यावर देखील पुर्ण वेदनारहीत होण्यास वेळ जातो.दातांच्या कॅपखाली असलेल्या सूजेमुळे चावल्यावर वेदना जाणवू शकतात.
काहीजणांमध्ये उपचार केल्यावर देखील पुन्हा इनफेक्शन झाल्यामुळे समस्या निर्माण होतात.समस्या कोणतीही असली तरी तुमचे डेटीस्ट तुम्हाला याबाबत योग्य मदत करु शकतात.
६.रुट कॅनल उपचारांसाठी खुप वेळ लागतो न खुप सिटींग्ज घ्याव्या लागतात असे का?
रुट कॅनल उपचारांसाठी प्रत्येक दातांसाठी दोन अथवा तीन सिटींग घ्याव्या लागू शकतात.आधूनिक उपचारांमुळे आता एका सिटींग मध्ये देखील रुट कॅनल केले जाऊ शकते.पण जर तुमच्या दाताला इनफेक्शन असेल,दाताचे कॅनल विचित्र असतील किंवा तुम्ही उपचारांसाठी योग्य प्रतिसाद देत नसाल तर मात्र तुम्हाला अधिक सिटींग्स लागू शकतात.
त्याचप्रमाणे दातावर कॅप बसवल्यानंतर तो भाग मजबूत होण्यासाठी काही वेळ लागू शकतो.
७.रुट कॅनल उपचार करताना दात निर्जीव होतो का?
रुट कॅनल उपचार हे दात निर्जीव होत असल्यास अथवा निर्जीव दातावरच करण्यात येतात.त्यामुळे या उपचारांमध्ये त्या दातांच्या फक्त डेंटल पल्प अथवा दाताच्या पोकळीतील इनफेक्शनमुळे खराब झालेल्या नसा व रक्तवाहिन्या काढून टाकण्यात येतात.ज्यामुळे इनफेक्शन वाढत नाही. नक्की वाचा दात पिवळे होण्याची कारणं जाणा, भविष्यातील धोका टाळा
८.जर रुट कॅनल मुळे मला बरे वाटत आहे तर दातावर कॅप बसवण्याची काय गरज आहे?
रुट कॅनल उपचारांमध्ये दातांवर असणारा डेंटल पल्प हा भाग काढून टाकण्यात येतो ज्या भागातून दाताचे पोषण होत असते.उपचारांनंतर अन्नपदार्थ चावताना त्या भागावर येणारा दाब सहन करता यावा यासाठी त्यावर कॅप बसवण्यात येते.हा दाब सहन करण्यासाठी व दातांचे कार्य सुरळीत होण्यासाठी डेटिस्ट तुम्हाला मेटल,सिरॅमिक अथवा इतर पदार्थांची कॅप बसवण्याचा सल्ला देतात.
जर दात खुप खराब झाला नसेल किंवा दात चावताना कमी दाब येणा-या भागातील असेल तर कॅप बसवण्याची आवशक्ता नसते.
९.मेटल कॅप बसवल्यावर चेहरा कुरुप दिसण्याची शक्यता असेल तर यावर काही पर्याय आहे का?
दातांवर बसविण्यात येणा-या क्राऊन अथवा कॅप मध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात.पुर्वी सोने व मेटलच्या कॅप बसवण्यात यायच्या.मात्र आजकाल सिरॅमिक,रेजीन पासून बनविलेली कॅप बसवण्यात येते ज्या तुमच्या दातांच्या रंगासोबत मिळत्याजुळत्या असतात.या पर्यायासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
१०.लहान मुलांच्या दातांचे रुट कॅनल करता येते का?
खरेतर नाही.तुमच्या मुलांचे दूधाचे दात किडले आहेत की कायमचे दात किडले आहेत यावर हे अवलंबून आहे.त्याचप्रमाणे तुमच्या डेटिस्ट कडूनच याबाबत सल्ला घेणे योग्य ठरेल.मुलांना कायमचे दात येईपर्यंत दूधाचे दात त्या जागी असणे खुप गरजेचे असते.दूधाचे दात वेळे आधी पडल्यास कायम दात येताना ते जागे अभावी वेडेवाकडे येऊ शकतात.असे दात आल्यास मुलांना ब्रेसेस लावावे लागतात.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock