बहिणाबाईंनी सांगितल्यानुसार, ‘आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर’… संसार, घरकाम आले की लहान सहान जखमा, अपघात होणारच. पण त्याचे व्रण दीर्घकाळ राहिल्यास त्या त्रासदायक आठवणी पुन्हा पुन्हा मनात येतात. म्हणूनच नो मार्स्क च्या मेडीकल अॅडव्हायझर डॉ. उमा सिंघ यांनी सुचवलेल्या या पारंपारिक औषधोपचारांनी त्या जखमांचे व्रणतुम्ही काही घरगुती उपायांनीच दूर करू शकता.
1) लिंबू व टोमॅटोचा रस – या रसाच्या मिश्रणामुळे त्वचेवरील मृत त्वचा जाण्यास तसेच त्वचेला नवा उजाळा येण्यास मदत होते. लिंबातील अॅसिडिक घटक नैसर्गिकरित्या व्रणांचे डाग हलके करतात.तर ताज्या टोमॅटोच्या रसामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने व्रण कमी होण्यास मदत होते.
मग कसा वापराल हा रस ?
- जखम साध्या पाण्याने धुवा.
- जखमेवर काही तास ओला वॉश क्लोथ ठेवा.
- काही तासाने ताज्या लिंबाच्या रसात बुडवलेला वॉश क्लोथ जखमेवर ठेवा.
- त्वचा सुकल्यानंतर तुम्ही त्यावर टोमॅटोचा रसही लावू शकता.
असे नियमित दिवसातून दोनदा केल्यास तुम्हांला नक्कीच जखमेच्या व्रणांपासून सुटका मिळेल.
2) बदामाचे तेल -
बदामाचे तेल जखमेवर लावल्यास तुम्हांला त्यापासून लवकर आराम मिळेल. दिवसातून दोनदा हे तेल जखमेवर लावून हलका मसाज करावा.
3) मेथीचे दाणे -
- मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी त्याची पेस्ट बनवा.
- तयार पेस्ट जखमेवर लावा व पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
- मेथीप्रमाणेच हळदीची पेस्ट बनवून लावल्यास जखम लवकर भरण्यास तसेच त्याचे व्रण दूर होण्यास मदत होते.
4) लव्हेंडर ऑईल-
हे तेल दाहशामक असल्याने तसेच जखम भरून काढण्यास मदत करतात.
- जखम झाल्यानंतर जितक्या लवकर तुम्ही लव्हेंडर ऑईल लावाल तेवढी व्रण पडण्याची शक्यता कमी होते.
- जखम खूपच मोठी असल्यास, कापडाच्या बोळ्यावर तेल घालून ते काही ठराविक तासाने पुन्हा लावा.
5) इंडियन युनानी कॉटन अॅश पेस्ट -
हा एक रेडीमेड उपाय आहे.
- कॉटन वूल / सुती कपडा जाळा.
- त्याची राख ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून पेस्ट तयार करा.
- ही पेस्ट जखमेवर लावून त्यावर क्लिंग फिल्म लावा. यामुळे वेदना तत्काळ कमी होण्यास मदत होते.
6) बटाट्याची साल -
हा एक प्राचीन आणि फायदेशीर घरगुती उपाय आहे. यातील दाहशामक गुणधर्मामुळे तसेच अॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
- बटाट्याची साल काढून ती जखमेवर लावा.
- तुम्ही झटपट आराम मिळवण्यासाठी ही साल बॅन्डेज म्हणून बांधून ठेवू शकता.
7) बार्ली, हळद आणि दही -
बार्ली, हळद आणि दही हे मिश्रण एक उत्तम घरगुती उपाय आहे.
- बार्ली, हळद आणि दही समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण बनवा.
- तयार मिश्रण हलक्या हाताने जखमेवर लावावे.
8) कलॉइडल सिल्वर-
कलॉइडल सिल्वर हे अॅन्टीसेप्टिक असल्याने त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत करतात.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Sourece - How to get rid of burn scars and marks at home
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.