गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवाची तयारी अगदी जोमात सुरू असेल. परंतू या उत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे ‘गणेशमूर्ती’. प्राचीन काळी यामूर्ती शाडू मातीच्या बनवल्या जात असे. मात्र आता वेळ आणि पैशांचं गणित पाळताना अनेकजण प्लास्टर ऑफ़ पॅरिसच्या मूर्त्या घरी आणतात. परंतू यामुळे पर्यावरणाचे आणि परिणामी मानवी आरोग्यही धोक्यात येते. म्हणूनच यावर्षी ‘इको फ्रेंड्ली’ गणेशोत्सवाची सुरवात करा.
‘इको-फेंडली’ गणेशमूर्ती या मातीपासून, नैसर्गिक घटकांपासून तसेच पर्यावरणाला घातक न ठरणार्या पदार्थांपासून बनवली जाते. त्यामुळे विसर्जनंतरही त्याचे विघटन होणे शक्य होते. म्हणूनच या ’4′ आरोग्यदायी कारणांसाठी यंदाचा गणेशोत्सव ‘इको-फ्रेंडली’ कराच !
1. नैसर्गिक पाण्याचे स्रोत खराब करू नका :
पीओपी म्हणजेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचा प्रमुख तोटा म्हणजे त्याचे विघटन न झाल्याने पाण्यामध्ये प्रदूषण वाढते. त्यातील विषारी घटक पाण्यातील मासे, वनस्पती अशांचा नाश करण्यास कारणीभूत ठरतात. याचा थेट आणि ताबडतोब परिणाम आढळून येत नसला तरीही यामुळे नैसर्गीक चक्र बिघडते. पाण्यातील सजीवांमुळे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत स्वच्छ आणि आरोग्यदायी राहतात. तसेच मच्छरांचा प्रादुर्भावदेखील कमी होतो. तसेच दुषित पाणी लोकांच्या शरीरात गेल्यास यामुळे काही संसर्गजन्य आजार, फुफ्फुसांचे विकार तसेच त्वचारोग, रक्ताचे विकार आणि डोळ्यांचे दुखणे वाढण्याची शक्यता असते.
2. धातूमिश्रित पाण्यामुळे पदार्थांचा दर्जा खालावतो :
प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये मॅग्नेशियम,फ़ॉस्फरस,सल्फर अशा घातक रसायनांचा समावेश असतो. तसेच मूर्ती रंगवण्यासाठी वापरण्यात येणार्या रंगांमध्येदेखील पारा, आर्सेनिक,लेड, कार्बन असे घातक पदार्थ आढळतात. असे दुषित पाणी माश्यांना तसेच वनस्पतींना मारतात. तसेच हे पाणी मानवी शरीरात गेल्यास विषबाधा होण्याची शक्यता असते. यामुळे चेतासंस्थेवर, रक्ताभिसरण क्षमतेवर तसेच पचनक्रियेवरदेखील परिणाम होण्याची शक्यता असते.
3. मुर्तीवरील रंगामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येते :
प्लॅस्टर ऑफ़ पॅरिसमुळे पाणी दुषित होते. त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतातच. परंतू मूर्ती रंगवताना वापरण्यात येणारा रंग़ आणि चमकी ( ग्लिटर्स) सहज हाताला लागू शकते. अशा रंग़ामध्ये घातक घटकांचा समावेश असल्याने आरोग्य बिघडू शकते. यामुळे फुफ्फुसं, डोळे यांना संसर्ग होऊ शकतो. उलट इको-फ्रेंडली गणेशमूर्तीचा असा कोणताच धोका नसतो.
4.इको फ्रेंडली गणपती हा एक फ़ॅमिली एक्सरसाईज आहे:
इको फ्रेंडली गणपतीचा प्रमुख फायदा म्हणजे तुम्ही या मुर्त्या स्वतः आणि घरच्या घरी बनवू शकतात. सुरवातीला तुम्हांला काही मार्गदर्शनाची गरज भासेल मात्र नंतर तुम्हीच यातून आनंद मिळवाल. त्यामुळे गणपतीच्या तयारीला तुम्ही आणि तुमच्या परिवारातील अनेक सद्स्य जवळ येऊ शकतील. इको फ्रेंडली गणपती बनवताना तुम्ही कागादाचा लगदा, माती, पीठ, हळद अशा पर्यावरणप्रेमी गोष्टींचा वापर करू शकता.
संबंधित दुवे -
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Sourece - 4 reasons an eco-friendly Ganesha is good for you
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.