Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

वयाच्या पन्नाशीत वजन घटवण्याचे ‘हेल्दी फंडे’

$
0
0

नियमित व्यायाम करून देखील वजन कमी होत नाही ? वयाच्या पन्नाशीमध्ये आल्यानंतर कमी होणारा मेटॅबॉलिक रेट  तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्याच्या मार्गातील एक अडथळा आहे. त्यामुळे तुम्हांला आधीपासूनच व्यायामाबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. त्यामुळे वजन घटवण्याचा प्रयत्न करताना या अडथळ्यांचादेखील विचार जरूर करा. ( मेटॅबॉलिझम वाढवतील हे ’6′ पदार्थ )

प्रसिद्ध आहारतज्ञ  प्रिया काथपाल यांच्या मते,  वजन घटवण्यासाठी तुम्ही दोन प्रमुख गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

  • कॅलरीजचा विचार करा 

कमी कॅलरीच्या आणि पोषणयुक्त पदार्थांची निवड करा. दिवसभरात तुम्हांला 1200-1500 कॅलरीज घेणे गरजेचे आहे. मात्र या कॅलरी घेताना तुम्हांला दिवसभरातील काम आणि वैद्यकीय दृष्ट्या तुमच्या शारीरिक स्थिती यावर कॅलरीची निवड करणे गरजेचे आहे.

  • कमी खा

कमी खाणे आणि पुरेसा व्यायाम करणे हा एक प्रमुख नियम आहे. कमी खाणे म्हणजे उपासमार करणे नव्हे ! तर ‘टेम्पटेशन’वर नियंत्रण मिळवणे. त्यामुळे आहारात थोडे-फार बदल करा आणि निरोगी रहा.

परिणामकारकपणे वजन घटवण्यासाठी कसा निवडाल योग्य आहार ?

  • साखर, तळलेले पदार्थ, जंक फूड खाणे टाळा. तसेच दोन  वेळेस भरपेट खाणे टाळा.
  • आहारात मासे, फळं, भाज्या अशा पोषक पदार्थांची निवड करा.
  • दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्या. आरोग्यदायी पेयं पिणे वाढवा तसेच मद्यपान टाळा.
  • मेदयुक्त दुग्धजन्य पदार्थ टाळा व लीन मीटचा आहारात समावेश करा.

परिणामकारकपणे वजन घटवण्यासाठी कसा कराल व्यायाम ? 

  • कोणताही व्यायाम करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करा.
  • स्विमिंग, वॉकिंग,सायकलिंग अशा अ‍ॅक्टिव्हिटी करा म्हणजे तुमचा कार्डीयोव्हसक्युलर व्यायामदेखील होईल. 10 मिनिटे जॉगिंग करा.
  • स्ट्रेचिंग आणि एंड्युरन्स व्यायामाबरोबरच काही हलके व्यायामदेखील करावेत. यामुळे तुमची हाडं आणि मेटॅबॉलिक  रेट मजबूत होईल. खूर्चीसोबत केलेले व्यायाम, लिफ्टस उचलणे असे व्यायाम मेटॅबॉलिझम सुधारायला मदत करतात.
  • योग्य आणि संतुलितपणे केलेला व्यायाम तुमचे पोश्चर सुधारायला मदत करतात.
  • दुखणे आणि अपघात टाळण्यासाठी अ‍ॅरोबिक्स, हेवी वेट ट्रेनिंग करणे टाळा.
  • फक्त व्यायाम करणे कंटाळवाणे वाटत असल्यास एखाद्या खेळाचा आनंद घ्यावा.

ममताच्या सल्ल्यानुसार, नियमित 25 मिनिटे आठवड्यातून 3 दिवस व्यायाम करावा.व्यायामाच्या आदल्या दिवशी जरूर पुरेशी विश्रांती घ्यावी.  तसेच वजन घटवण्यासाठी काही डेडलाईन ठेवून नका. योग्य आहार आणि व्यायामातून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

संबंधित दुवे - 


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Sourece - In your 50s? Follow these weight loss tips

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>