नवी वर्षाचा संकल्प म्हणून तुम्ही सूर्यनमस्कार करायला सुरुवात केली असेल किंवा या आधी तुम्ही कधीतरी सूर्यनमस्कार करत असाल तर त्यासाठी महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जिम मध्ये वर्कआऊट करताना, विविध नृत्यशैली किंवा खेळ खेळताना वॉर्म अप आणि कूल डाउन ची गरज असते. सूर्यनमस्कारासाठी या सगळ्याची गरज नाही. होलिस्टिक फिटनेस एक्स्पर्ट आणि फिटनेस व द गो चे लेखक अभिषेक शर्मा यांनी हे चुकीचे असल्याचे सांगितले.
अभिषेक शर्मांच्या सल्यानुसार जर तुम्ही सूर्यनमस्कार करण्यासाठी नवखे असाल तर तुम्हाला वॉर्म अप ची अत्यंत गरज आहे. त्यामुळे तुमचे मेटाबोलिझम सुधारेल आणि तुमचे शरीर व्यायामासाठी तयार होईल. तसंच त्यामुळे स्नायू आखडले जाणार नाहीत किंवा त्यांना इजा पोहचणार नाही. नक्की पहा: व्हिडीयो: वॉर्मअप पण योगसाधनेतून !
वॉर्म अप प्रमाणे सातत्याने केलेल्या सूर्यनमस्कारानंतर नंतर १०-२० मिनिटं कूल डाउन ची देखील गरज असते. थोडी विश्रांती घेतल्याशिवाय अंघोळ करू नका. हृदयाची वाढलेली गती सुरळीत होण्यासाठी आणि शरीर पूर्ववत होण्यासाठी पुरेसा वेळ द्या. विश्रांती घेण्यासाठी काही वेळ पाठीवर झोपा, पवनमुक्तासन यासारखी आसने केल्याने ही फायदा होईल. ताठ बसून १५ मिनिटे ध्यान करा. प्राणायाम केल्याने ही खूप रिलॅक्स वाटेल. सगळ्यात उत्तम म्हणजे शवासन. त्यात कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल नसल्यामुळे शरीर व मनाला पुरेशी विश्रांती मिळते. नक्की वाचा: शरीरातील शीण घालवणारे ‘शवासन’
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock