Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लो ब्लड प्रेशरला प्रतिबंध करणाऱ्या ६ एक्स्पर्ट टीप्स

$
0
0

रक्तदाब म्हटलं की आपल्याला उच्च रक्तदाब, त्याची लक्षणे, गंभीरता डोक्यात येते. पण हायपोटेन्शन म्हणजे लो ब्लड प्रेशर ही समस्या देखील तितकीच गंभीर आहे. आजकाल या त्रासाने अनेकजण ग्रासले आहेत. आणि यावर वेळीच उपचार केले नाही तर हा आजार देखील उच्च रक्तदाबइतकाच गंभीर होऊ शकतो. अचानक रक्तदाब कमी झाल्यास चक्कर येते, थकवा जाणवतो. आणि हे काळजी करण्यासारखे आहे. कारण मेंदूला रक्ताचा योग्य पुरवठा झाला नाही तर ती व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. Cardiology, FMRI चे Associate Director & Unit Head डॉ. संजीव चौधरी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषधांव्यतिरिक्त इतर काही मार्ग आहेत ज्यामुळे आपण भविष्यात होणाऱ्या लो बीपी ला प्रतिबंध करू शकतो.

भरपूर पाणी प्या: Orthostatic hypotension म्हणजे रक्तदाबात होणारा क्षणिक बदल (रक्तदाब कमी होतो) जो सामान्यपणे डिहायड्रेशनमुळे होतो. यावर झटपट आणि खात्रीचा उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे ब्लड वोल्युम वाढते आणि रक्तदाब काही मिनिटातच सुरळीत होतो. दिवसातून ८ ग्लास पाणी अवश्य प्या. अवश्य वाचा: या टीप्सने पूर्ण होईल तुमचं नियमित 8 ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य !

काही वेळच्या अंतराने थोडं थोडं खा: एका वेळी भरपूर खाल्याने पचनसंस्थेवर एकाच वेळी अधिक ताण येईल. त्यामुळे रक्तप्रवाह देखील पचनसंस्थेच्या दिशेने वाहू लागेल. आणि शरीराच्या इतर भागातील रक्तप्रवाह कमी होईल. याचा परिणाम म्हणजे रक्तदाब कमी होईल. त्याऐवजी तुम्ही जर काही वेळच्या अंतराने थोडं थोडं खाल्लं तर  पचनसंस्थेवर एकाच वेळी ताण येणार नाही आणि रक्तप्रवाह सुरळीत राहील. Puvi-Rajasingham and Mathias CJ यांच्या अहवालानुसार रक्तदाब अचानक कमी होऊ नये म्हणून थोडं थोडं खाणं गरजेचं आहे. आहारामध्ये हे ’6′ बदल करून कमी करा Low BP चा त्रास !

डोकं थोडं वर ठेवून पडून रहा: अनेकदा आपण आराम करत असताना रक्तदाब कमी असतो. त्यामुळे डोकं थोडं वर च्या अँगलला ठेवून पडून रहा. त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर रक्तदाबात अचानक होणारा बदल टाळता येईल.

काळजीपूर्वक उभे रहा: खूप वेळ बसल्यानंतर किंवा झोपेतून उठल्यानंतर पटकन उठून उभे राहू नका. त्यामुळे डोळ्यापुढे अंधारी येऊ शकते. आणि चक्कर येऊन बेशुद्ध होण्याची भीती असते. अधिक माहितीसाठी वाचा: ‘बीपी लो’ झाल्यास करा हे प्रथमोपचार !

नियमित व्यायाम करा: नियमित व्यायाम केल्याने orthostatic hypotension ला प्रतिबंध होतो. व्यायामामुळे रक्तप्रवाह एकाच भागात न होता संपूर्ण शरीरभर रक्ताचा व्यवस्थित संचार होतो. चालणे, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग याचबरोबर आयसोटॉनिक एक्ससरसाईझ म्हणजेच लाईट वेट लिफ्टिंग असे व्यायामप्रकार तुम्ही करू शकता.

मिठाचा योग्य वापर करा: असे सांगितले जाते की, दिवसाला १०-२०ग्रॅम मीठ खाल्ले पाहिजे. पण तुमच्यासाठी योग्य प्रमाण काय असेल हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचबरोबर पालक, केळी यांसारखे पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. कारण आहारातून मीठ अधिक घेतल्याने पोटॅशियमचे प्रमाण कमी होईल. Low BP झाल्यानंतर साखर, मीठ की Electrolyte Solution नेमके काय घ्यावे ?

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>