हिंदीसिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव (50) यांचे शनिवारी पहाटे 12.30 मिनिटांनी मुंबईत निधन झाले. गेले काही दिवस अंधेरी येथील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली.
पाच वर्षांपूर्वी आदेश श्रीवास्तव यांना कर्कारोगाचे निदान झाले होते. मात्र त्यावेळी या आजारावर मात करून पुन्हा नव्या जोमाने त्यांनी कामाला सुरवात केली होती. मात्र गेल्या काही महिन्यांत हा आजार पुन्हा बळावल्याने आदेश रुग्णालयात उपचार घेत होते. परंतू सतत खालावणार्या स्थितीमुळे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
‘ बागबान’, ‘चलते चलते’,’बाबूल’ अशा प्रसिद्ध सिनेमांना आदेश श्रीवास्तव यांनी संगीत दिले होते. हिंदीप्रमाणेच ‘माया’ या मराठी चित्रपटाला त्यांनी संगीत दिले आहे. यामध्ये त्यांनी 4 गाणी संगीतबद्ध केली होती.
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.