Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

जाणून घ्या इरीटेबल बोवल सिन्ड्रोमचा धोका वाढवणारे घटक

$
0
0

इरीटेबल बोवल सिन्‍ड्रोम अथवा आयबीएस या आतड्यांच्या विकारामध्ये निरनिराळी लक्षणे आढळून येतात.आतड्याच्या आंकुचन व प्रसरण क्रियेतून अन्नाचे योग्य पचन होत असते. इरीटेबव बोवल सिन्‍ड्रोममुळे आतड्याच्या या क्रियेत बिघाड होतो.त्यामुळे सहाजिकच अन्नपदार्थ आतड्यांमधून वेगाने पुढे ढकलले जातात. यामुळे पोटात वेदना, डायरिया, बद्धकोष्ठता, पोटात वायू आणि गोळा येणे अशा समस्या निर्माण होतात. या लक्षणांसोबत आतड्यांच्या इतर समस्या देखील निर्माण होतात. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत चेक-अप करणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा आतड्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास पुढे गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागू शकते.

आयबीएस या गंभीर विकाराचे कारण अद्याप अज्ञात आहे. मात्र संशोधकांच्या मते काही शारीरिक व मानसिक आरोग्य समस्येमुळे आयबीएस समस्या निर्माण होते.

यासाठी जाणून घेऊयात आयबीएस समस्येचा धोका वाढवण्या-या गोष्टी-

१.वय-

तुमचे वय चाळीस वर्षांच्या पुढे असेल तर तुम्हाला आयबीएसचा धोका कमी आहे. मात्र चाळीस वर्षाखालील तरुण लोकांना आयबीएसचा धोका अधिक असू शकतो. असे असले तरी कोणत्याही वयात आयबीएस विकार होऊ शकतो.

२.लिंग-

आयबीएसची शक्यता पुरुषांपेक्षा महीलांमध्ये अधिक असते. या विकारात महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान ओटीपोटातील वेदना, पोटात गोळा येणे, डायरिया ही लक्षणे आढळतात. या काळात प्रोस्टाग्लॅन्डीनची पातळी वाढल्यामुळे महीलांमध्ये ही समस्या आढळून येते.

३.जेनेटीक-

जर तुमच्या कुटूंबातील लोकांना आतड्यांची समस्या असेल तर तुम्हाला आयबीएसचा धोका अधिक असू शकतो. याचे कारण अनुवंशिक अथवा पर्यावरणातील घटक हे असू शकते.

४.ताण-तणाव व मानसिक विकार-

मानसिक परिस्थिती व चिंता-काळजीमुळे तुम्हाला ताण येऊ शकतो. ताण आल्यास त्यावर मात करण्यासाठी शरीरातून काही हॉर्मोन्स सो़डण्यात येतात. पण जर या हॉर्मोन्सची पातळी वाढली तर त्यामुळे त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. ताण वाढल्यास तुमची रोगप्रतिकार शक्ती, रक्ताभिसरण क्रिया, पचनक्रिया अशा शरीराच्या वेगवेगळ्या कार्यावर देखील परिणाम होतो. संशोधकांना ताणामुळे आयबीएस विकसित झाल्याचे पुरावे आढळले आहेत. मात्र असे का होते याचे कारण अजून अज्ञात आहे. असे असले तरी काही रुग्णांवर काही मानसिक उपचार केल्याने यातून आराम मिळाला आहे. तसेच संशोधकांना असेही आढळले आहे की मानसिक विकारांसोबत आढळणा-या आयबीएसमुळे एन्झायटी डिसॉर्डर, पॅनिक डिसॉर्डर, मेजर डिप्रेसिव्ह डिसॉर्डर, बायपोलर डिसॉर्डर, स्क्रीझोफ्रेनिया हे विकार होण्याची शक्यता असते.

५.पोटाचे इनफेक्शन-

संशोधकाच्या मते पोटाच्या इनफेक्शनमुळे आयबीएस होऊ शकतो. कारण पोटाच्या इनफेक्शनमुळे तुुमच्या शरीराचे संतुलन बिघडते व आतड्यांमध्ये इनफेक्शन होऊन आयबीएसचा धोका वाढतो.

६.मद्यपान-

मद्यपानामुळे देखील आयबीएस चा धोका वाढू शकतो. संशोधनानूसार दररोज मद्य घेण्या-या लोकांना आयबीएसचा धोका अधिक असतो. काही संशोधनानूसार आठवड्यातून एकदा मद्य घेणा-या महीलांना देखील आयबीएस होऊ शकतो.

७. Fibromyalgia-

Fibromyalgia या समस्येमध्ये खुप थकवा व तीव्र वेदना होतात. अशा रुग्णांना कोणतेही कारण नसताना सांधे, स्नायू व स्नायूबंधामध्ये दीर्घकाळ वेदना होत राहतात. संशोधकाच्या मते असे असल्यास तुम्हाला आयबीएसचा दिडपट जास्त धोका असतो.

संदर्भ-

1. Nam SY, Kim BC, Ryu KH, Park BJ. Prevalence and Risk Factors of Irritable Bowel Syndrome in Healthy Screenee Undergoing Colonoscopy and Laboratory Tests. Journal of Neurogastroenterology and Motility. 2010;16(1):47-51. doi:10.5056/jnm.2010.16.1.47.

2. Lovell RM, Ford AC. Effect of gender on prevalence of irritable bowel syndrome in the community: systematic review and meta-analysis. Am J Gastroenterol. 2012 Jul;107(7):991-1000. doi: 10.1038/ajg.2012.131. Epub 2012 May 22. Review. PubMed PMID: 22613905.

3. Bharadwaj S, Barber MD, Graff LA, Shen B. Symptomatology of irritable bowel syndrome and inflammatory bowel disease during the menstrual cycle. Gastroenterol Rep (Oxf). 2015 Aug;3(3):185-93. doi: 10.1093/gastro/gov010. Epub 2015 Mar 18. Review. PubMed PMID: 25788484; PubMed Central PMCID: PMC4527267.

4. Fukudo S. Stress and visceral pain: focusing on irritable bowel syndrome. Pain. 2013 Dec;154 Suppl 1:S63-70. doi: 10.1016/j.pain.2013.09.008. Epub 2013 Sep 8. Review. PubMed PMID: 24021863.

5. Fadgyas-Stanculete M, Buga AM, Popa-Wagner A, Dumitrascu DL. The relationship between irritable bowel syndrome and psychiatric disorders: from molecular changes to clinical manifestations. J Mol Psychiatry. 2014 Jun 27;2(1):4. doi: 10.1186/2049-9256-2-4. eCollection 2014. Review. PubMed PMID: 25408914; PubMed Central PMCID: PMC4223878.

6. Hsu T-Y, He G-Y, Wang Y-C, et al. Alcohol Use Disorder Increases the Risk of Irritable Bowel Disease: A Nationwide Retrospective Cohort Study. Sar. V, ed. Medicine. 2015;94(51):e2334. doi:10.1097/MD.0000000000002334.

7. Yang T-Y, Chen C-S, Lin C-L, Lin W-M, Kuo C-N, Kao C-H. Risk for Irritable Bowel Syndrome in Fibromyalgia Patients: A National Database Study. Zapata. E, ed. Medicine. 2015;94(10):e616. doi:10.1097/MD.0000000000000616.

Read this in English

Translated By –Trupti Paradkar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>