अस्थमा हाताळणे खुप कठीण असते. त्यात जर लहान मुलांना अस्थमा असेल तर ही समस्या अधिकच कठीण होऊ शकते. अस्थमा असणारी मुले सर्व निरोगी मुलांप्रमाणे आपले बालपण उपभोगू शकत नसली तरी काही विशेष काळजी घेतल्यास त्यांचा अस्थमा नियंत्रणात आणता येऊ शकतो.
तुमच्या मुलांच्या अस्थमाला नियंत्रणात आणण्यासाठी या काही महत्वाच्या टीप्स-
तुमच्या मुलांचा अस्थमा वाढवणा-या गोष्टी समजून घ्या-
हवेतील धुळीचे कण, घरातील धुळ, कुत्रे व मांजर या पाळीव प्राण्यांचा संपर्क यामुळे लहान मुलांची अस्थमाची समस्या अधिकच बळावू शकते. सर्दी, खोकला, ताप, सायनस सारख्या आरोग्य समस्यांचे संक्रमण यामुळे देखील अस्थमा वाढू शकतो. दूध, अंडी, शेंगदाणे, गहू, मासे, प्रक्रिया केलेले पदार्थ या अन्नपदार्थां मुळे देखील अस्थमाचा त्रास होऊ शकतो.
लहान मुलांना अॅलर्जीपासून कसे वाचवाल?
- घरातील बेडशीट व उश्यांचे कव्हर दररोज बदला. त्याचप्रमाणे चादर व उश्यांचे कव्हर गरम पाण्यात धुवा. घरातील किचन व बाथरुम स्वच्छ व कोरडे ठेवा. ज्यामुळे झुरळे व किडामुंगी होणार नाही. घरात कारपेट असल्यास ते वरचेवर बदला.
- घरात अथवा बाहेरील पाळीव प्राण्यांच्या केसांपासून मुलांना दूर ठेवा. घरात धुम्रपान करु नका.
- तुमच्या मुलांचा अस्थमा बळावेल असे पदार्थ त्यांना देऊ नका.
- अॅसप्रीन,पेन किलर्स अशी त्रासदायक औषधे मुलांना देऊ नका. औषधे देताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मुलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवा-
अस्थमा अटॅक येण्यापुर्वी मुलांमध्ये आढळणारी लक्षणे लक्षात ठेवा. ज्यामुळे अस्थमा अटॅक येण्यापुर्वीची लक्षणे आढळल्यास मुलांवर त्वरीत उपायोयजना करणे सोपे जाईल व मुलांना अस्थमा अटॅकपासून लगेच आराम मिळेल.
मुलांना वेळेवर औषधे द्या-
डॉक्टरांनी मुलांना दिलेली औषधे त्यांना वेळेवर द्या. त्यामुळे त्यांचा अस्थमा आटोक्यात राहील.
अस्थमा अटॅक आल्यास औषध-उपचार वेळेवर करा-
मुलांना अस्थमाचा अटॅक येत आहे असे आढळल्यास त्यांना त्वरीत त्यावर आराम मिळेल असे औषध द्या. यासाठी ही औषधे व त्यांचे प्रमाण याविषयी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अस्थमाला आटोक्यात आणणा-या साधनांची माहीती घ्या-
अस्थमासाठी लहान बाळाला नॅब्यूलाइजर देण्यात येते तर मोठ्या मुलांना इल्हेनर देण्यात येते. या साधनांविषयी व्यवस्थित माहीती घ्या.
तुमच्या मुलांना इतर मुलांप्रमाणे वागू द्या-
तुमच्या मुलांना तुम्ही इतर मुलांप्रमाणे स्विमिंग, सायकलींग असे खेळ खेळण्यास देऊ शकता. असे खेळ खेळल्यामुळे अस्थमा असलेल्या मुलांना थकवा येऊन त्यांना त्रास होतो म्हणून काही पालक त्यांना खेळ खेळू देत नाहीत.पण जर तुमचे मुल व्यवस्थित व वेळेवर औषधे घेत असेल तर ते असे खेळ नक्कीच खेळू शकते. खेळण्यापुर्वी त्यांच्यासोबत त्यांना त्वरीत आराम देणारी त्यांची औषधे मात्र सोबत जरुर नेण्यास सांगा.
मुलांच्या सोबत असलेल्या मित्रांना अथवा इतर लोकांना त्यांच्या आजारपणाची कल्पना द्या-
मुलांचे शिक्षक,प्रशिक्षक,मित्र-मैत्रि
Read this in English
Translated By –Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock