Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मासिक पाळी दरम्यान पाळा या १० स्वच्छता टीप्स

$
0
0

स्त्रीला येणा-या मासिक पाळीचा सबंध तिच्या आरोग्यासोबत असतो.त्यामुळे स्त्रीने प्रत्येक मासिकपाळी दरम्यान स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे.आजकाल स्त्रीयांना अथवा मुलींना दिवसभर शिक्षण अथवा कामामुळे घरा बाहेर रहावे लागते.त्यामुळे मासिकपाळी दरम्यान काही जणी दिवसभर एकच सॅनिटरी पॅड वापरतात.तर गावाकडील स्त्रीया आजही मासिकपाळी साठी घरगुती कपड्यांचा वापर करतात.या कपड्यांची नीट स्वच्छता देखील राखली जात नाही.असे करणे अयोग्य आहे यामुळे स्त्रीयांमध्ये अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

यासाठी जाणून घेऊयात स्त्रीयांनी मासिक पाळीत स्वच्छता कशी राखावी-

१.मासिकपाळी साठी योग्य स्वच्छता साधनांची निवड करा-

आजकाल बाजारात मासिकपाळीच्या स्वच्छतेसाठी सॅनिटरी नॅपकीन्स,टेम्पॉन्स,मॅन्युस्टरल कप ही साधने सहज उपलब्ध असतात.साधारपणे भारतामध्ये तरुण अविवाहित मुली सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात.ज्याचा मासिक रक्तस्त्राव कमी प्रमाणात असतो त्या टेम्पॉन्स वापरु शकतात.त्याचप्रमाणे काही महीला त्यांच्या मासिक पाळीच्या दिवस व फ्लोनूसार वेगवेगळ्या प्रकारचे सॅनिटरी नॅपकीन अथवा इतर साधने वापरतात.काही जणी त्यांच्या मासिक पाळीत वापरणा-या साधनांच्या प्रकार व ब्रॅन्ड बाबत अधिकच जागरुक असतात.तुमच्या गरजेनूसार एकाच प्रकारची व ब्रॅन्डची ही सुरक्षेची साधने निवडणे हा उत्तम पर्याय असू शकतो.कारण यासाठी सतत निरनिराळे ब्रॅन्ड वापरल्यामुळे गैरसोय होऊ शकते.

२.स्वच्छता साधने वारंवार बदला-

मासिक पाळी दरम्यान वापरण्यात येणारी स्वच्छता साधने वारंवार बदलणे आवश्यक आहे.जरी तुम्हाला कमी रक्तस्त्राव होत असेल किंवा तुमचे सॅनिटरी पॅड खराब झाले नसेल तरी तुम्ही स्वच्छता साधने वेळेवर बदलणे गरजेचे आहे.कारण असे न केल्यास तुम्हाला मूत्रमार्गातील इनफेक्शन,वजानल इनफेक्शन आणि त्वचेवर रॅशेस येण्याची शक्यता असते.

त्यामुळे दर  सहा तासांनी सॅनिटरी पॅड व दर दोन तासांनी टेम्पॉन्स बदलणे योग्य असू शकते.तुम्ही तुमच्या गरजेनूसार तुमची साधने बदलण्याची वेळ ठरवा.थोडक्यात ज्यांना अती रक्तस्त्राव होतो त्यांची ही साधने बदलण्याची वेळ ही अजून कमी असू शकते तर ज्यांना कमी रक्तस्त्राव होतो त्यांनी ही वेळ वाढवण्यास हरकत नाही.पण वेळ ठरवल्यानंतर एखाद्या दिवशी जरी तुम्हाला कमी रक्तस्त्राव झाला तरी तुम्ही तुमचे साधन बदलणे आवश्यक आहे.

टेम्पॉन्स वापराताना याची विशेष दक्षता घ्या कारण ते योनीमार्गात आत बसवावे लागतात.त्यामुळे जर ते वरचेवर बदलले नाही तर जंतुसंसंर्ग होऊन टॉक्सिक शॉक सिन्ड्रोम टीएसएस सारखे गंभीर विकार होऊ शकतात.या विकारावर लवकर उपचार न झाल्यास ही समस्या प्राणघातक असू शकते.

३.शारीरिक स्वच्छता राखा-

मासिकपाळी मध्ये होणारा रक्तस्त्राव तुमच्या अंतर्गत अवयवांमध्ये देखील लागण्याची शक्यता असते.यासाठी तुमच्या गुप्तांगाची वेळच्यावेळी स्वच्छता राखा.असे न केल्यास योनीमार्गातून दुर्गंध येऊ शकतो.त्यामुळे सॅनीटरी पॅड बदलण्यापुर्वी तुमचे गुप्तांग स्वच्छ पाण्याने धुवा.जर तसे करणे शक्य नसेल तर टिश्यू पेपर अथवा टॉयलेट पेपरने ते स्वच्छ पुसून घ्या.

४.योनीमार्गाच्या स्वच्छतेसाठी साबण वापरु नका-

योनामार्गातील सुरक्षा यंत्रणा चांगल्या व वाईट जिवाणूंचे संतुलन राखत स्वत:च स्वच्छता राखत असते.मात्र योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी साबण वापरल्यामुळे तिथले चांगले जिवाणू मरण पावतात.यासाठी स्वच्छता करताना नेहमी फक्त कोमट पाण्याचा वापर करा.बाहेरील भागासाठी तुम्ही साबण वापरु शकता पण साबण योनीमार्गात जाणार नाही याची काळजी घ्या.

५.स्वच्छता करताना योग्य पद्धत वापरा-

गुप्तांग स्वच्छ करताना प्रथम योनीमार्ग स्वच्छ करा व त्यानंतर गुद्दवार धुवा.कधीही उलटया पद्धतीने धुवू नका.गुद्दवार प्रथम धुतल्यास त्यामधील जंतूंचा संपर्क योनीमार्गाला होण्याची शक्यता असते त्यामुळे इनफेक्शन होऊ शकते.

६.वापरलेल्या सॅनीटरी साधनांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा-

वापरलेली सॅनीटरी साधने योग्य पद्धतीने टाकून न दिल्यास त्यामुळे दुर्गंध व इनफेक्शन पसरु शकते.यासाठी प्रथम ते योग्य पद्धतीने कागदात गुंडाळा.त्याचप्रमाणे सॅनीटरी पॅड कधीही टॉयलेट मध्ये टाकू नका कारण त्यामुळे टॉयलेट ब्लॉक होऊ शकते.सॅनीटरी साधने टाकून दिल्यानंतर सर्वात आधी तुमचे हात स्वच्छ करा.

७.पॅड रॅशेस पासून सावध रहा-

मासिक पाळीत अती स्त्राव झाल्यास तुम्हाला पॅड रॅशेस येतात.बराच वेळ खराब झालेले पॅड न बदलल्यामुळे मांड्यांमधील भागात हे रॅशेस येतात.पॅड रॅशेस टाळण्यासाठी पॅड वरचेवर बदला ज्यामुळे तुम्ही कोरडे रहाल.तसेच रॅशेस आल्यास अंघोळीनंतर आणि रात्री झोपताना अॅन्टीसेप्टीक ऑईनमेंट लावा.त्यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल.रॅशेसमुळे खुप त्रास होत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या ते तुम्हाला यासाठी एखादी मेडीकेटेड पावडर देऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला लवकर बरे वाटेल.

८.एका वेळी एकच पद्धतीचे स्वच्छता साधन वापरा-

काही महीला अधिक रक्तस्त्राव असल्यास दोन सॅनीटरी पॅड,सॅनीटरी पॅड व टेम्पॉन्स,सॅनीटरी पॅड व कापड अशी साधने एकत्र वापरतात.तुम्हाला त्यावेळी गरजेनूसार असे करणे योग्य वाटत असले तरी हे अजिबात योग्य नाही.कारण त्यामुळे तुम्हाला स्वच्छता साधने बदलण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.सहाजिकच अधिक अस्वच्छते मुळे तुम्हाला इनफेक्शन,रॅशेस येतात जर तुम्ही टेम्पॉन्स वापरले तर टीएसएस हा गंभीर विकार देखील होऊ शकतो.तसेच असे अधिक स्वच्छता साधने वापरल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते.

९.दररोज अंघोळ करा-

काही संस्कृतीमध्ये मासिक पाळीच्या काळात स्त्रीयांनी अंघोळ करु नये असे सांगण्यात येते.पण हा एक गैरसमज आहे पुर्वी असे सांगण्यात यायचे कारण पुर्वी स्त्रीया नदी अथवा तलावात उघड्यावर अंघोळ करीत असत.मात्र आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान दररोज अंघोळ करा.अंघोळ करताना संपुर्ण शरीरासोबत तुमच्या प्रायव्हेट भागांची देखील स्वच्छता राखा.यामुळे तुम्हाला मासिक पाळी दरम्यान होणा-या वेदना,क्रॅम्प,पाठदुखी,गोळा येणे,मूड बदलणे यामध्ये आराम मिळेल.अधिक आरामासाठी अंधोळ करताना पाठ व ओटीपोट कोमट पाण्याने शेकवा.

१०.मासिक पाळीसाठी तयार रहा-

बाहेर जाताना मासिक पाळीसाठी लागणारी स्वच्छता साधने,स्वच्छ पिशव्या,पेपर बॅग्स,मऊ ़टॉवेल,टिश्यू पेपर,हॅन्ड सैनिटायझर,हेल्थी स्नॅक्स,पाण्याची बाटली,तुम्हाला लागणारी औषधे सोबत घ्या.

मासिक पाळीच्या काळात नेहमी जास्त सॅनीटरी पॅड जवळ ठेवा.ज्यामुळे तुम्ही ते वरचेवर बदलू शकता.तसेच पॅड्स व टेम्पॉन्स स्वच्छ पिशवीतून घेऊन जा ज्यामुळे जंतूसंसर्ग होणार नाही.अशा वेळी पॅड बदलल्यानंतर हात स्वच्छ करण्यासाठी एखादा छोटा व मऊ टॉवेल तुम्हाला उपयोगी पडू शकतो.योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी टिश्यू पेपर किंवा टॉयलेट पेपरचा वापर करा.सार्वजनिक ठिकाणी टॉयलेटमधील नळांना हात लावल्यास हॅन्ड सैनीटायझर ने हात स्वच्छ करा.त्याचप्रमाणे मासिक पाळी दरम्यान जाणवणा-या थकव्यामुळे अशक्त वाटल्यास तुमच्या कडील खाऊ व पाण्याने तुम्हाला त्वरीत बरे वाटेल.अशा प्रकारे तुम्ही मासिक पाळीत स्वच्छता पाळून निरोगी राहू शकता.

Read this in English

Translated By –Trupti Paradkar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>