जानेवरी महिन्यात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन असतेच पण त्याबरोबरीने येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रात ! वर्षाची दमदार सुरवात केल्यानंतर संक्रातीला तीळाचे लाडू बनवले जातात. गूळ, शेंगदाणा आणि तीळाचे मिश्रण करून लाडू बनवले जातात.. पण यासोबतीने मकरसंक्रांतीला नक्की आस्वाद घ्या या ’6′ हेल्दी गोड पदार्थांचा ! नक्की वाचा : कशी बनवाल भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी
काही वेळेस गूळ खराब किंवा दुय्यम दर्जाचा असल्यास त्यामुळेही लाडू बिघडू शकतात. तसेच मधूमेहीनी त्याचे नेमके किती प्रमाणात सेवन करावे यावर मर्यादा येतात. म्हणूनच यंदा लाडू करताना गूळाऐवजी खजूराचा वापर करून त्याला नवा ट्विस्ट द्या. असा सल्ला आहारतज्ञ कांचन पटवर्धन देतात.
मग पहा कसे कराल खजूर – तीळाचे लाडू
साहित्य -:
- भाजलेले तीळ
- भाजलेले शेंगदाणे
- काळा मऊ, सीडनेस खजूर
कृती -:
- काळा सीडलेस खजूर नैसर्गिकरित्याच मऊ असल्याने तो चमचाभर तूपात हलकाच परतून घ्या. किंवा साधा खजूर नीट सोलून त्यामधील बीया काढून तूपावर परता. खजूर थोडा मऊ झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून त्याचा गोळा करा.
- तयार गोळा थोडा थंड झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ मिसळा.
- तयार मिश्रणाचे इतर लाडवांप्रमाणे गोळे करून लाडू वळा.
- तुम्हांला आवडत असेल तर त्यामध्ये सुकामेव्याची पूड मिसळा. यामुळे लाडू अधिक चाविष्ट आणि पोषक होतील.
हिवाळ्यात भूक सतत लागत असल्याने त्यावर मात करण्यासाठीही काही हेल्दी पर्यायांची निवड करणं गरजेचे आहे. म्हणूनच हिवाळ्यात सतत लागणार्या भूकेसाठी ’5′ खास हेल्दी टेस्टी लाडू !. खजूर-तीळाचे लाडू इतर तीळ गूळ लाडवांच्या तुलनेत अधिक हेल्दी वाटत असले तरीही मधूमेहींनी त्यांचा आस्वाद प्रमाणातच घ्यावा. असा सल्ला कांचन पटवर्धन देतात. मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज ! मकर संक्रातीला पतंग उडवताना सुरक्षा आणि आरोग्य जपण्यासाठी या 8 गोष्टी ध्यानात ठेवा.
छायाचित्र सौजन्य – shutterstock