Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

ब्रेस्ट लॅम्प्स म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर का?

$
0
0

एके दिवशी सकाळी अंघोळ करताना लीलाला तिच्या उजव्या छातीजवळ एक गाठ लागली. तिने पुन्हा चाचपडून पाहीले आणि तिच्यावर आभाळच कोसळले. तिच्या मनात पहिला विचार आला, ‘हा कॅन्सर तर नाही?’ तिला थोडे दुखले आणि गाठ नाजूक असल्याचे जाणवले. मग तिला आठवले तिने कुठेतरी वाचले होते, जर गाठ दुखली, तर तो कॅन्सर नाही. मग हे काय आहे? Paras Hospital, पटनाचे Dr. R N Tagore यांनी सल्ला दिला की, जर तुम्हाला असं काही जाणवलं तर घाबरून न जाता शांत व्हा. ते ब्रेस्ट लॅम्प आहे. ‘ब्रेस्ट सेल्फ एक्झाम’ – स्तनांचा कर्करोग ओळखण्याचा पहिला संकेत

तसंच छातीत येणाऱ्या १० पैकी ८ लॅम्प्स हे नाजूक आणि सौम्य असतात. ते कॅन्सर नसतात. तरुण मुली आणि मध्यम वयाच्या स्त्रिया (ज्यांची मासिकपाळी चालू आहे अशा) यांच्या मध्ये येणारे ब्रेस्ट लॅम्प्स अत्यंत सामान्य असतात. असे डॉक्टर टागोरांचे म्हणणे आहे. अशा प्रकारचे लॅम्प्स नाजूक, सौम्य आणि अगदी सहज फिरू शकतील असे असतात. तर कॅन्सरचे ट्यूमर्स अतिशय कठीण असून ते एका जागीच असतात. (ते फिरू शकत नाहीत.) कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी या ’7′ सवयी अंमलात आणाच !

जर तुम्हाला ही ब्रेस्ट लॅम्प्स जाणवले तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ब्रेस्ट लॅम्प्स होण्याची काही कारणे:

फायब्रॉसियस्टिक ब्रेस्ट चेंजेस (Fibrocystic breast changes): याला आधी फायब्रॉसियस्टिक ब्रेस्ट डिसीज म्हंटले जायचे. नंतर त्यात बदल झाला आणि फायब्रॉसियस्टिक ब्रेस्ट चेंजेस म्हटले जाऊ लागले. प्रसूतीच्या काळात सामान्यपणे हे आढळून येते.

लक्षणे: मासिक पाळीच्या दरम्यान छातीत दुखणे तसंच छातीत गोळे, गाठी जाणवतात.

कारणे: याचे अचूक कारण माहित नसले तरी मासिक पाळीच्या काळात oestrogen predominance आणि progesterone या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे असे होते. यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका नसतो. पण जर तुम्हाला काही ऍबनॉर्मल आढळ्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. संशोधक Helmuth Vorherr याच्या म्हणण्यानुसार फायब्रॉसियस्टिक ब्रेस्ट हे गंभीर नाही पण त्यापासून सुटका करण्यासाठी वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढचा धोका टाळता येईल.

ब्रेस्ट सिस्ट: ब्रेस्ट सिस्ट हे द्रवाने भरलेले गोळे असतात. हे एक किंवा कधी दोन्ही ब्रेस्ट मध्ये असू शकतात. हे कधी सिम्पल, कॉम्प्लेक्स तर कधी कॉम्प्लिकेटेड असतात. सिस्ट हे सौम्य, नाजूक असतात. परंतु कॉम्प्लेक्स सिस्ट गंभीर स्वरूपाचे असून त्यासाठी बायोप्सी करणे गरजेचे असते.

२५% ब्रेस्ट लॅम्प्स हे ब्रेस्ट सिस्ट मध्ये बदलतात. सिस्ट साधारणपणे मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रियांमध्ये म्हणजेच ३५ शीच्या पुढच्या वयोगटात आढळून येतो. तर रजोनिवृत्ती (postmenopausal) झालेल्या स्त्रियांमध्ये सिस्ट फारसे दिसून येत नाहीत. पण जर काही हार्मोनल चेंजेस झाले तर रजोनिवृत्ती नंतर ही सिस्ट आढळतात.

लक्षणे:

सिम्पल सिस्ट: सिम्पल सिस्ट हे गोलाकार किंवा अंडाकार असून द्रवाने भरलेले असतात. कधी एक तर कधी बरेच असतात. तर कधी अलिप्त तर कधी एकत्रित दिसून येतात. याचा आकार आणि संख्या मासिक चक्रानुसार बदलते. प्रामुख्याने हे मोनोपॉजच्या आधीच्या टप्प्यात आढळून येतात.

कॉम्प्लिकेटेड सिस्ट: कॉम्प्लिकेटेड सिस्ट हे सुद्धा द्रवाने भरलेले असून त्यात पू देखील असतो. हे सिम्पल सिस्ट सोबत आढळून येतात आणि ते जलद गतीने वाढतात, दुखतात तर कधी जळजळही होते. काही वेळेस निप्पल्स मधून स्त्राव होण्याची शक्यता असते.

कॉम्प्लेक्स सिस्ट: हे घन(solid) स्वरूपात असून अतिशय कठीण असतात. या प्रकारचे लॅम्प्स हे फारसे आढळून येत नाहीत. पण आढळ्यास ते फार गंभीर असते. त्यासाठी बायोप्सी करावी लागते.

कारणे:

संशोधकांनासुद्धा ब्रेस्ट सिस्टचे अचूक कारण समजलेले नाही. काही अनुभवांवरून असे दिसून येते की मासिक पाळीच्या काळात oestrogen predominance आणि progesterone या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे ब्रेस्ट सिस्ट येतात.

ब्रेस्ट फाइब्रोअडीनोमा (Breast fibroadenoma): ब्रेस्ट फाइब्रोअडीनोमा हे ट्युमर मऊ, टणक असून fibrous आणि glandular टिश्यू पासून बनलेले असतात. हे ट्युमर  प्रामुख्याने किशोरवयीन मुलींमध्ये आणि ३० पेक्षा कमी वयाच्या तरुण स्त्रियांमध्ये आढळून येतात. या लॅम्प्सची साईझ साधारण १-३ सेमी असून ब्रेस्टच्या वरच्या भागात आढळतात. तर काही लॅम्प्स हे १० सेमी पेक्षा मोठे असतात.

फाइब्रोअडीनोमा ट्यूमर्स हे imple fibroadenoma, giant juvenile fibroadenoma आणि  multicentricfibroadenoma या तीन प्रकारचे असतात.

लक्षणे:

  • हे ट्युनर्स मऊ, हालचाल करणारे, न दुखणारे आणि रबर सारखे असतात.
  • त्यांचा आकार साधारणपणे १ ते ३ सेमी इतका असतो. पण मोठे ट्यूमर्स हे ५ सेमी पेक्षा मोठे असून त्याचे वजन ५०० ग्रॅम असते.
  • सामान्यपणे हे ट्यूमर्स ब्रेस्टच्या वरच्या भागात उजव्या बाजूच्या आढळतात. पण multicentricfibroadenomas ट्यूमर्स हे ब्रेस्टच्या कोणत्याही भागात दिसून येतात.
  • हे ट्यूमर्स त्वचा, निप्पल्स मध्ये काही बदल न करता सावकाश वाढतात. दुखतही नाही. पण त्याचा आकार मासिक पाळीच्या चक्रानुसार बदलू लागेल.
  • हे लक्षणे साधारणपणे ५ महिन्यांपर्यंत दिसून येतात.

कारणे:

इतर लॅम्प्स प्रमाणे हे देखील oestrogen मुळेच वाढतात.

रिस्क फॅक्टर: जर मोनोपॉजच्या आधी oestrogen-progesterone oral contraceptive चे प्रमाण अधिक झाले आणि BMI चे प्रमाण २५-३० पर्यंत वाढले तर
फाइब्रोअडीनोमा होण्याचा धोका वाढतो.

अहवालानुसार हे ट्यूमर्स झालेल्या स्त्रियांमध्ये बरसत कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो.

ब्रेस्ट कॅन्सर: ब्रेस्ट सेल्सपासून तयार झालेल्या ट्युमरमुळे ब्रेस्ट कॅन्सर सारखा गंभीर आजार होतो. यावर जर वेळीच उपचार झाले नाही तर त्याचा परिणाम आजूबाजूच्या सेल्सवर होतो आणि आजार शरीरभर पसरू लागतो. ही ’6′ लक्षणं देतात ‘ब्रेस्ट कॅन्सर’चा संकेत !

हा आजार कोणाला होऊ शकतो?

लक्षणे:

  • ब्रेस्ट लॅम्प्स
  • ब्रेस्ट पेन
  • निप्पल्स मधून होणारा स्त्राव

एका प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कॅन्सरचे प्रमाण ब्रेस्ट पेन, ब्रेस्ट लॅम्स आणि निप्पल्स मधून होणार स्त्राव या रुग्णांमध्ये अनुक्रमे ३.२, १६.४ आणि १२.० इतके आहे.

तर दुसऱ्या अहवालानुसार ब्रेस्ट लॅम्प असणाऱ्या स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण ब्रेस्ट पेन आणि निप्पल्स डिस्चार्ज होणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे.

आणखी एका अहवालानुसार malignancy ट्युमर धुखात नसेल पण छातीत इतर ठिकाणी दुखत असेल तरी कॅन्सरची शक्यता असते.

काही वेळा सुरुवातीच्या टप्प्यात निदान झालेल्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ब्रेस्ट लॅम्प्स हे मुव्हेबल (हालचाल करणारे) असतात. फिक्स असणारे लॅम्स अधिक धोकादायक असतात कारण ते ऍडव्हान्स प्रकारच्या कॅन्सरमध्ये दिसून येतात. आणि ते छातीच्या इतर भागातही पसरतात.

फक्त हाताने स्पर्श करून ब्रेस्ट लॅम्सची गंभीरता लक्षात येणार नाही. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्लाची आवश्यकता आहे. तुमच्या ब्रेस्ट लॅम्प्सच्या प्रकारानुसार डॉक्टर उपचार करतील.
जरूर वाचा: ब्रेस्ट कॅन्सरशी धैर्याने सामना करण्यासाठी खास ’10′ टीप्स !

 

Reference:

  1. Vorherr, H. Fibrocystic Breast Disease: Pathophysiology, Pathomorphology, Clinical Picture, And Management. American Journal of Obstetrics and Gynecology 154.1 (1986): 161-179.
  2. [Heisey RE, McCready DR. Office management of a palpable breast lump with aspiration. CMAJ : Canadian Medical Association Journal. 2010;182(7):693-696. doi:10.1503/cmaj.090416.
  3. Berg WA, Sechtin AG, Marques H, Zhang Z. Cystic Breast Masses and the ACRIN 6666 Experience. Radiologic clinics of North America. 2010;48(5):931-987. doi:10.1016/j.rcl.2010.06.007.
  1. Lee M, Soltanian HT. Breast fibroadenomas in adolescents: current perspectives. Adolescent Health, Medicine and Therapeutics. 2015;6:159-163. doi:10.2147/AHMT.S55833.
  2. Cerrato F, Labow BI. Diagnosis and Management of Fibroadenomas in the Adolescent Breast. Seminars in Plastic Surgery. 2013;27(1):23-25. doi:10.1055/s-0033-1343992.
  3. Dupont WD, Page DL, Parl FF, Vnencak-Jones CL, Plummer WD, Rados MS, et al. Long-term risk of breast cancer in women with fibroadenoma. N Engl J Med. 1994;331:10–5.
  4. Lumachi F, Ermani M, Brandes AA, Boccagni P, Polistina F, Basso SM, Favia G, D’Amico DF. Breast complaints and risk of breast cancer. Population-based study of 2,879 self-selected women and long-term follow-up. Biomed Pharmacother. 2002 Mar; 56(2):88-92.
  5. Singh D, Malila N, Pokhrel A, Anttila A. Association of symptoms and breast cancer in population-based mammography screening in Finland. International Journal of Cancer Journal International du Cancer. 2015;136(6):E630-E637. doi:10.1002/ijc.29170.
  6. Foulkes RE, Heard G, Boyce T, Skyrme R, Holland PA, Gateley CA. Duct Excision is Still Necessary to Rule out Breast Cancer in Patients Presenting with Spontaneous Bloodstained Nipple Discharge. International journal of breast cancer. 2011;2011:495315.

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>