Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या कारणांंमुळे पायांंवर वाढते सूज !

$
0
0

पायांना सूज येण्याची समस्या अनेकांमध्ये आढळते.सामान्यत: वयस्कर लोकांमध्ये बराच काळ एकाच ठिकाणी बसणे अथवा उभे राहिल्यास हालचाल कमी झाल्याने पाय सूजण्याची समस्या आढळते.त्याचप्रमाणे ह्रदयाचे विकार,किडनी विकार,रक्तवाहिनीमध्ये रक्त गोठणे अशा अनेक समस्यांमध्ये देखील पायाला सूज येण्याचे लक्षण आढळते.पाय सूजण्याचे नेमके कारण लक्षात आल्यास वेळीच योग्य ते उपचार करणे शक्य होते.

जाणून घेऊयात पाय नेमके का सूजतात?

विशेषत: शरीराच्या खालच्या भागातील टिश्यूजमध्ये द्रवपदार्थ साठल्यामुळे पायांना सूज येते.या समस्येला’Oedema’असेही म्हणतात.या समस्येचे प्रमुख दोन प्रकार असतात.पीटींगआणि नॉन-पीटींंग.यातील पीटींग म्हणजे सूजेवर दाबले असता खळगा पडतो व पाच सेंकदानी तो पुर्ववत होतो.आणि नॉन-पीटींग म्हणजे सूजेवर दाबले असता खळगा पडत नाही.

पाय सूजण्याची काही कारणे-

  • अति वजन
  • म्हातारपण
  • गरोदरपण(गरोदरपणात पाय सूजणे हानिकारक नसते पण जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर काळजी घेणे आवश्यक आहे.)
  • पायांना इनफेक्शन होणे
  • पाय,घोटा अथवा पाऊलावर जखम होणे
  • शस्त्रक्रिया(पेल्विक सर्जरी)
  • कधीकधी नसांमध्ये अशुद्ध रक्त साठून त्रास होणे
  • आहारात मीठाचे प्रमाण अधिक असणे
  • सनबर्न अथवा पायांची जळजळ
  • काही औषधे(जसे की स्टिरॉइड,NSAIDs,कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स,मधूमेहावरील औषधे

पायाला सूज आल्यास काय कराल?

  • झोपताना पाय ह्रदयाच्या पातळीपेक्षा उंचावर ठेवा.शक्य असल्यास ४५ अंशाच्या कोनात पाय ठेवा ज्यामुळे पायात साठलेले द्रवपदार्थ परत निघून जातील.पण जर तुम्हाला श्वसनाचा त्रास असेल तर मात्र असे करु नका.
  • पायांचे कार्य वाढवा.त्यामुळे पायामध्ये रक्त साठणार नाही.
  • बराच वेळ उभे अथवा बसावे लागल्यास जाणिवपुर्वक थोड्यावेळाने काहीतरी हालचाल करा.
  • आहारातील मीठाचे प्रमाण कमी करा.
  • काहीवेळ पाय मीठाच्या पाण्यात ठेवा.
  • विमानप्रवास करताना चांगले स्टॉकिंग्ज वापरा.
  • पायाला सूज येण्याकडे दुर्लक्ष करु नका.कारण याचे पुढे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

या गंभीर समस्यांमध्ये पायाला सूज येऊ शकते-

१.ह्रदयाचे कार्य बंद पडणे-

ह्रदयाचे कार्य बंद झाल्यास रक्त शूद्धीकरण क्रियेत अडथळा येतो.ज्याचा परिणाम संपुर्ण शरीरावर होतो.याला वैद्यकीय भाषेत हार्ट फेल होणे असे म्हणतात.रक्त शुद्धीकरण कमी प्रमाणात झाल्यामुळे शरीराच्या इतर भागात रक्त प्रवाह उलट दिशेने होऊ लागतो.फुफ्फुसे,यकृत,आतड्याचा मार्ग,हात व पाय यामध्ये रक्त साठते.कोरोनरी आर्थरी डिसिस आणि वारंवार होणारा उच्च रक्तदाब यामुळे हार्ट फेल होऊ शकते. जाणून घ्या Heart attack चा धोका वेळीच ओळखण्याचे ’5′ संकेत !

ह्रदय विकारातील लक्षणे-

  • थकवा व अशक्तपणा
  • भूक कमी लागणे
  • रात्री लघवीला होणे
  • ह्रदयाची जलद गतीने अथवा अनियमित धडधड
  • काम करताना व झोपताना धाप लागणे
  • पाय व घोट्यांना सूज येणे
  • वजन अती प्रमाणात वाढणे

२.Deep venous thrombosis

या समस्येमध्ये शरीराच्या एकाच बाजूच्या पायाच्या खालील भागात अथवा मांडीमधील मोठ्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.या रक्त गुठळ्या रक्तातून प्रवाहीत होतात.त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊन रक्तप्रवाह मेंदू,ह्रदय व इतर अवयवांमध्ये थांबण्याची शक्यता असते.

या समस्येची काही प्रमुख लक्षणे-

  • पाय व तळव्यांना सूज येणे
  • पायांमध्ये वेदना होणे
  • पायाची त्वचा लालसर होते व त्वचा उष्ण होणे

३.Nephrotic syndrome-

लघवीमधून किडनीतील प्रोटीनची गळती झाल्यामुळे होणारा हा एक गंभीर विकार आहे. कर्करोग,अनुवंशिक विकार,इनफेक्शन,रोगप्रतिकारक विकार व काही औषधांमुळे किडनीवर परिणाम झाल्यास हा विकार होतो.हा विकार कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये व पुुरुषांपेक्षा महीलांमध्ये अधिक आढळतो.

या विकाराची लक्षणे-

  • पाय व चेह-यामध्ये सूज येणे(प्राथमिक लक्षण)
  • बेंबीच्या भागात सूज येणे
  • रक्तातील प्रोटीनचे प्रमाण कमी व कोलेस्ट्रॉल व ट्रिग्लीसीराइडचे प्रमाण वाढणे
  • लघवीला फेस येणे
  • शरीराच्या वजनात प्रमाणापेक्षा वाढ होणे

४.तीव्र किडनी विकार-

या विकारामध्ये किडनीच्या अशा भागाला दाह व सूज येते ज्या भागामुळे किडनीतील रक्त शुद्ध होऊन लघवी निर्माण होते व टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात.या प्रक्रियेमध्ये रक्त व प्रथिने लघवीमध्ये आल्यास त्या भागाचा दाह होतो.

किडनी विकाराची लक्षणे-

  • पाय व इतर भागात सूज येणे
  • लघवीमधून रक्त येणे
  • लघवी कमी प्रमाणात निर्माण होणे अथवा लघवी निर्माण न होणे
  • सांधेदुखी,स्नायूंवेदना,डोकेदुखी
  • थकवा व आळस येणे
  • श्वास घेण्यास समस्या होणे

५.Cirrhosis

गंभीर यकृत विकाराची ही शेवटची अवस्था आहे अथवा यामध्ये यकृत पुर्णपणे निकामी होते.हिपॅटायटीस बी व सीच्या इनफेक्शनमुळे आणि मद्याच्या आहारी गेल्यामुळे हा विकार होतो.हा विकार काही औषधे,अनुवंशिक विकार,इतर यकृत विकारामुळे देखील होऊ शकतो.

या विकाराची लक्षणे-

  • त्वचेवर लालसर रक्तवाहिन्यांचे छोटे जाळे तयार होणे
  • थकवा
  • मळमळ,भूक कमी लागणे,वजन कमी होणे
  • रोग बळावल्यास शरीरातील इतर अवयव व पायामध्ये सूज येणे
  • काविळ
  • पुरुषांमध्ये नपुंसकत्व येणे व वृषण संकुचित होणे

६.हायपोथायरॉडीसम-

हायपोथायरॉडीसम या स्थितीमध्ये थायरॉइड ग्रंथी पुरेसे थायरॉइड हॉर्मोन्स निर्माण करण्यास अक्षम असते.शरीरातील मेटाबॉ़लिजम नियंत्रित ठेवण्यामध्ये व शरीरातील प्रत्येक पेशीमधील उर्जा नियंत्रित करण्यामध्ये थायरॉइड ग्रंथी प्रमुख भुमिका बजावते.रोगप्रतिकार शक्ती कमी असणे,श्वसनाचे इनफेक्शन,काही औषधे यामुळे ही समस्या निर्माण होते.पुरुषांपेक्षा स्त्रीयांमध्ये ही समस्या अधिक आढळते.कधीकधी प्रेगन्सीचादेखील थायरॉइड ग्रंथीच्या कार्यात प्रभाव पडतो.

हायपोथायरॉडीसम ची लक्षणे-

  • हात,पाय व चेह-यावर सूज येणे
  • डिप्रेशन
  • सांधे व स्नायू दुखणे
  • बद्धकोष्ठता
  • मासिक पाळी अनियमित होणे व मासिक पाळीत जास्त प्रमाणात अंगावरुन जाणे
  • समस्या अतिशय बिकट झाल्यास चव व गंध ज्ञान कमी होते.

विशेष सूचना-

जर तुम्हाला किडनी विकार,ह्रदय विकार,यकृत विकार अथवा एखादा गंभीर आजार असेल आणि तुम्हाला तापासह पायावर जास्त सूज आली तर त्वरीत तुमच्या डॉक्टरांना संपर्क करा.

Read this in English

Translated By – Trupti Paradkar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>