Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

हिवाळ्यात व्यायाम करताना कपड्यांकडे द्या विशेष लक्ष

$
0
0

हिवाळा तसा सुखद, उत्साही आणि हवाहवासा वाटणारा ऋतू. या  दिवसात आपल्यात उत्साह, आनंद आणि जोश असल्याने व्यायाम सुरु करण्यासाठी  हा अतिशय उत्तम ऋतू असल्याचं मानलं जातं. परंतु हृद्यविकार असलेल्यांसाठी या काळात व्यायाम करणं थोडं अवघड होऊ शकतं. थंडीमुळे शरीरात आणि शरीराच्या तापमानात होणारे बदल यामुळे काही समस्या उदभवू नये म्हणून व्यायाम करताना योग्य कपडे घालणे गरजेचे आहे. Fortis Escorts Heart Institute चे Director and HOD, Non- invasive and preventive cardiology डॉ. पियुष जैन यांच्या सल्ल्यानुसार खालील गोष्टी महत्वाच्या आहेत. अगदी लहानसहन गोष्टींचा विचार टिप्स देताना केला आहे. कारण हृदयविकार असलेल्यांना हिवाळ्यात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

१. थंडीच्या दिवसात डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण शरीर  सुरक्षित राहील, याची खबरदारी घ्यावी. कान, हात-पाय झाकले जातील असे कपडे वापरावे. आऊटडोअर एक्सरसाइज करताना थंडीपासून सुरक्षा देणारे तरीही शरीरातला घाम बाहेर पडण्यास सोयीस्कर असे कपडे घालणे योग्य ठरेल. त्याचबरोबर ज्यामुळे घाम येईल, गुदमरल्यासारखं वाटेल असे अतिशय घट्ट कपडे टाळावेत.

२. ग्लोव्हस ऐवजी Mittens (हातमोजे जे फक्त दोन भागात असतात चार बोटांसाठी एक भाग आणि अंगठ्यासाठी एक) थंडीपासून अधिक सुरक्षा देतात. या हातमोज्यांना वेगवेगळे भाग नसल्याने संपूर्ण हाताला हवा खेळती राहते आणि जास्त घाम न येता योग्य ऊब मिळते. तसंच पायांसाठी ट्यूब सॉक्सचा पर्याय आहे.

३. कानटोपी घालणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे संपूर्ण शरीराला ऊब मिळते. कारण डोक्यातून जास्तीत जास्त उष्णता  बाहेर पडते. आणि टोपी घातल्याने शरीरातल्या ८०% उष्णता राहते. परंतु कानटोपी लोकरीची असावी. आवशकतेनुसार कानावरून, गळ्याभोवती ओढून घ्यावी. आजकाल बाजारात टोपी, मफलर यात खूप व्हरायटी उपलब्ध आहे.

४. शरीराची आद्रता ( body moisture) टिकून राहण्यासाठी कॉटन आणि सिन्थेटिक (Cotton or synthetics) अतिशय उत्तम. आणि थंडीपासून सुरक्षेसाठी लोकरीचे कपडे बेस्ट. हृद्यविकार असणाऱ्यांना अधिक काळजी घ्यावी लागते. तो टाळण्यासाठी वाचा: हिवाळ्यात हार्टअटॅकपासुन दूर राहण्याचे नऊ उपाय.

५. खूप थंडी असल्यास पोटऱ्यापर्यंत येणारे मोजे घालावे. थंडीपासून अधिक बचावासाठी डबल सॉक्स देखील तुम्ही घालू शकता. पण हे सगळं करताना सॉक्स नायलॉन चे नसल्याची खात्री करा.

६. शरीरावरील कपडे ओले होतात तेव्हा शरीरातील ९०% insulating properties कमी होतात. त्याने शरीरातील उष्णता कमी होते. अशावेळी शरीरातून अधिक उष्णता बाहेर पडू नये म्हणून ओले कपडे ताबडतोब बदलणे गरजेचे आहे.

७. थंडीच्या दिवसात गरम कपडे घातल्याने हृद्यविकाराचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. सायनस चा त्रास रोखण्यासाठी तुम्ही फेस मास्क देखील वापरू शकता. थंडीच्या दिवसात आत थर्मल्स घालणार असाल तर वरचे  कपडे नायलॉनचे असावे. नक्की वाचा: हार्ट सर्जरीनंतर पुन्हा फीट होण्यासाठी करा हे व्यायामप्रकार !

८. धुक्यात चालणे म्हणजे अंधारात चालण्यासारखेच असते. तेव्हा चालताना काळजीपूर्वक चालावे. सफेद, ग्रे असे लाईट कलरचे कपडे घालू नयेत. लाल. केसरी असे डार्क रंगाचे कपडे घालावेत. त्यामुळे धुक्याच्या गडद छायेत तुम्ही व्यवथित दिसून याल. 

Read this in English Translated By –Darshana Pawar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>