Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मुलींनो ! आत्मनिर्भर होण्यासाठी अक्षय कुमारचा हा सल्ला नक्की लक्षात ठेवा

$
0
0

सरत्या वर्षाला राम राम करत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री अनेकजण मज्जा मस्ती करत होते. मात्र बंगरूळूच्या एम जी रोडवर बाईकस्वार मुलांनी  एका मुलीची छेडछाड करून आनंदाच्या वातावरणाला गालबोट लावले. रात्री अडीच वाजता घरी परतताना रस्त्यात एका मुलीचा विनयभंग करण्यात आला. बॅंगलोर येथे झालेल्या मुलीच्या छेडछाडी प्रकरणी देशभरात अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नक्की वाचा : मुलींच्या या ’5′ वागणूकींवरून नका ठरवू त्यांची ‘नियत’!

काहींच्या मते, मुलींचे तोटे कपडे आणि वर्तन त्यांच्या छेडछाडीला कारणीभूत ठरते. त्यांच्या वर्तनामुळे मुलांमध्ये काही भावना उत्त्पन्न होतात. 21 व्या शतकात आणि विकसनशील देशात आजही अशाच प्रकारचे विचार केले जात असल्याने अनेकांकडून या  गोष्टीचा निषेध केला जात आहे. अशापैकी एक नाव म्हणजे अभिनेता अक्षय कुमार.

अक्षय कुमारने सोशल मिडीयावर एका व्हिडीयोच्या माध्यमातून आपल्या मनातील संताप व्यक्त केला आहे. अक्षयच्या मते, रात्री-अपरात्री मुलीची छेडछाड करणारे काही पुरूष आपल्या  समाजातीलच एक भाग असल्याची लाज वाटते. अशाप्रकारचे कृत्य नींदनीय आहे.यावेळी अक्षय कुमारने मुलींना स्वावलंबी होण्याचा सल्ला दिला आहे. स्त्री म्हणजे कमजोर आणि पुरूष बलवान हा समज दूर करा. तुमची कोठेही छेडछाड झाल्यास त्याला पलटून प्रतिकार करा. सहनशील न बनता मार्शल आर्टचे शिक्षण घ्या. अनेक लहान लहान ट्रिक्स वापरून प्रत्येक स्त्रीला स्वतःचे रक्षण करणे अगदीच शक्य  आहे. मात्र त्यासाठी प्रत्येकीने सक्षम होणं गरजेचे आहे. नक्की जाणून घ्या : मुलींनो आत्मसंरक्षणासाठी स्वतःजवळील या ’6′ गोष्टींचा वापर करा तसेच नक्की शिकवा मार्शिअल आर्टसचे हे ’6′ प्रकार !

अभिनेता अक्षय कुमारचा सविस्तर सल्ला जाणून घेण्यासाठी नक्की पहा हा व्हिडीयो -


व्हिडियो सौजन्य – अक्षय कुमार facebookPage

अक्षय कुमारला सिनेसृष्टीतूनही अनेकांनी पाठिंबा दिला आहे.


छायाचित्र सौजन्य – फेसबुक


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>