काही लोकांचा असा समज असतो की नाकातून रक्त येणे ही खूप गंभीर समस्या नाही.खरेतर नाकातून येणारे रक्त सहज थांबले तर ती खरंच गंभीर समस्या नसू शकते.पण जर तुमच्या नाकातून येणारे रक्त दहा मिनीटांपेक्षा जास्त अधिक काळ वाहत असेल किंवा तुम्हाला वारंवार नाकातून रक्त येण्याचा त्रास होत असेल तर मात्र ही गंभीर समस्या असू शकते.असे असल्यास त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
नाकातून रक्त का येते?
सर्दीमध्ये नाक ओढताना अथवा वारंवार पुसताना,शिंकरताना नाकामधील छोटया रक्तवाहिन्या फुटल्यास सामान्यत: नाकातून रक्त येण्याची शक्यता असते.कधीकधी नाकाला एखादा धक्का बसल्यास देखील नाकातून रक्त येऊ शकते.नाक गळण्याच्या या सर्वसामान्य प्रकाराला अॅन्थरीअर नोजब्लीड्स असे म्हणतात.या स्थितीत फक्त नाकाच्या पुढच्या भागाला दुखापत होते.
मात्र कधीकधी नाकाच्या अगदी आतील भागातील रक्तरोहिनीला दुखापत झाल्यास तिच्यातून रक्त येऊ लागते याला पोस्टेरीअर नोजब्लीड्स असे म्हणतात.ही स्थिती गंभीर असल्याने यासाठी तुम्हाला इएनटी स्पेशलिस्ट(नाक,कान,घसा तज्ञ)कडे जावे लागते.या स्थितीत उच्च रक्तदाब,रक्त गोठणे अथवा इतर काही समस्या निर्माण होण्याची देखील शक्यता असते. जाणून घ्या नाकात या ’5′ गोष्टी घालणे ठरू शकते त्रासदायी !
नाकातून रक्त येण्याची काही प्रमुख कारणे-
कोरडी हवा-
कोरड्या हवेमुळे सामान्यत: नाकातून रक्त येण्याची समस्या निर्माण होते.वातावरणातील बदल अथवा घरातील वातानूकुलीत उपकरणे यामुळे हवा कोरडी होऊ शकते.त्यामुळे नाकामधील टीश्यूज कोरड्या व कडक होतात.त्या कडक झाल्यामुळे जेव्हा तुम्ही नाक ओढता अथवा खरडवता त्यातून रक्त येऊ लागते.अखाद्या अॅन्टी-अॅलर्जीक अथवा नाक मोकळे करण्यासाठी घेण्यात येणा-या औषधामुळे देखील नाकाच्या आतील पडदा कोरडा होऊन नाकातून रक्त येऊ शकते.
सर्दी-
सर्दी व तापामुळे देखील नाकातून रक्त येऊ शकते.सर्दी खरंतर वर्षभरात खरंतर कधीही होऊ शकते.पण सामान्यत: सर्दी होण्याचे अधिक प्रमाण हे हिवाळ्यात असते.वातावरणातील बदलामुळे,सर्दीमुळे तुम्ही जर वारंवार शिंकलात,किंवा नाक साफ केलेत तर किंवा सर्दीमुळे इनफेक्शन झाल्यामुळे तुमच्या नाकातून रक्त येऊ शकते. नक्की वाचा घरच्या घरी मिळवा सर्दी – खोकल्यापासून आराम !
Allergic rhinitis-
अॅलरजीक र्हिनाटीस याची अनेक लक्षणे आढळतात.अॅलरजीक र्हिनाटीसचा नाकावर देखील परिणाम होतो.धुळ,परागकण अथवा एखाद्या खाद्यपदार्थामुळे ही अॅलर्जी होऊ शकते.यामध्ये नाक,त्वचा,घसा व डोळे यामध्ये खाज येणे,शिंका येणे,डोळ्यातून पाणी येणे,नाक गळणे ही लक्षणे आढळतात.ब्रिटीश,कोलंबिया,कॅनडा युनिव्हसिर्टीमध्ये करण्यात आलेल्या संशोधनात या समस्येमुळे लहान मुलांच्या नाकातून रक्त आल्याचे लक्षण आढळले आहे.या संशोधनानूसार या समस्येमध्ये इतर लक्षणांसह नाकातून अधिक रक्त आल्यास रक्त गोठण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
Barotrauma-
जेव्हा तुम्ही विमानातून अथवा घाटमाथ्यावरुन गाडीने प्रवास करता तेव्हा तुम्हाला कानात दडे बसण्याचा अनुभव येतो.असे घडण्याचे कारण तुमच्या शरीरातील व वातावरणातील हवेमध्ये असलेला फरक हे असते यालाच Barotrauma असे म्हणतात.जेव्हा आपल्याला अॅलर्जी,सर्दी,घशामध्ये दाह,घशामध्ये सूज अथवा श्वसनाचे इनफेक्शन होते तेव्हा देखील Barotrauma ही स्थिती निर्माण होते ज्यामुळे नाकातून रक्त येते व घशामध्ये सूज येते.नाक,घसा व कानाच्या अंतर्गत भागात अडथळा आल्यास देखील ही स्थिती निर्माण होते.
जखम-
एखादा अपघात अथवा नाकावर मुक्का बसल्यास नाकातून रक्त येते.नाकाला गंभीर जखम होणे,डोक्याला मार लागणे अथवा अंतर्गत रक्तस्त्रावाचे हे लक्षण एक असू शकते.त्यामुळे अशा परिस्थितीत नाकातून रक्त येत असल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जा. जाणून घ्या अल्कोहलने जखम स्वच्छ करणे का टाळावे ?
Juvenile angiofibroma-
या विकारामध्ये नाकाच्या व घश्याच्या वरच्या भागात कॅन्सर नसलेली एखादी गाठ येते.हा दुर्मिळ विकार फक्त ७ ते १९ वयाच्या मुलांमध्ये आढळतो.यामध्ये वारंवार नाकातून रक्त येते,श्वास घेण्यास त्रास होतो,नाकपुड्यांतून रक्तासारखा पदार्थ येतो व ऐकू येत नाही.ही गाठ वाढून श्वसनमार्ग बंद झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.
उच्च रक्तदाब-
उच्च रक्तदाब असल्यास नाकातून रक्त येते.ऑक्सफर्ड संशोधकाच्या मते तुम्हाला रक्तदाब असण्याचे हे एक प्रमुख लक्षण असू शकते.त्यांच्यामते या स्थितीत नाकातून एकदा अथवा वारंवार रक्त येण्याची शक्यता असते. नक्की वाचा आवळ्याचा रस – रक्तदाब आटोक्यात ठेवणारा नैसर्गिक उपाय
Hereditary Heamorrhagic Telangiectasia-
हा एक अनुवंशिक विकार असून यामध्ये मेंदू,फुफ्फुसे,यकृत,आतडे अशा शरीराच्या विविध भागात असामान्य रक्तवाहिन्या विकसित होतात.जेव्हा या रक्तवाहिन्या त्वचेवर विकसित होतात त्या विकाराला telangiectasia असे म्हणतात.नाकातून रक्त येणे हे या विकाराचे लहान मुलांमध्ये आढळणारे एक प्रमुख लक्षण आहे.त्याचप्रमाणे जन्मखूण व श्वास घेताना धाप लागणे ही लक्षणे देखील यामध्ये आढळतात.
केमिकल्स इरीटन्ट्स-
सल्फरीक अॅसिडस,अमोनिया,गॅसोलीन आणि इतर केमिकल्स इरीटन्ट्सच्या संपर्कात आल्यास नाकातून रक्त येऊ लागते.केमिकल कंपनी व केमिकल्सचा वापर केल्या जाणा-या ठिकाणी काम करण्या-या लोकांमध्ये हे लक्षण प्रामुख्याने आढळते.धुम्रपान करणारे व धुम्रपान करताना शेजारी असणा-या लोकांना त्या धूरातील केमिकल मुळे नाकातून रक्त येण्याची समस्या होऊ शकते.
अती मद्यपान-
अती मद्यपान करणा-या लोकांना नाकातून रक्त येण्याचा धोका असतो.संशोधकाच्या मते जे लोक सतत अती मद्यपान करतात त्याच्या रक्तातील प्लेटलेटच्या कार्यात समस्या निर्माण होतात.यामुळे त्यांना रक्तात गुठळ्या होण्याची समस्या होऊ शकते.यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.अती मद्यपानामुळे रक्तप्रवाह प्रवाहीत करताना रक्तवाहिन्यांवर विशिष्ठ दाब येतो व त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जखम निर्माण होऊ शकते.यामुळे नाकातून रक्त येऊ शकते.
काही औषधे-
वॉरफ्रीन,अॅसप्रीन आणि इबूप्रोफीन सारख्या काही रक्त पातळ करणा-या औषधांमुळे व NSAIDs(non-steroidal anti-inflammatory drugs) औषधांमुळे रक्तामध्ये गुठळ्या निर्माण होतात व काही वेळा त्यामुळे नाकातून रक्त येते.त्याच प्रमाणे नाक मोकळे करण्यासाठी वापरण्यात येणारे औषध अतीप्रमाणात वापरल्यास देखील ही समस्या होते.काही पर्यायी औषधे व आहारातील सप्लीमेंटसमुळे देखील नाकातून रक्त येऊ शकते.उदा.आले,लसूण,विटामिन ई,जिंक्गो,जीन्सॅन्ग,फिवरफीव व इतर औषधे.
त्याचप्रमाणे किडनी फेल,यकृत विकार व काही अनुवंशिक विकारांमध्ये देखील नाकातून रक्त येण्याची समस्या निर्माण होते.
त्यामुळे जर तुमच्या नाकातून वारंवार रक्त येत असेल,प्राथमिक उपचारांनी ते थांबत नसेल व नाकातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येत असेल तर त्वरीत तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या.
नाकातून येणारे रक्त थांबवण्यासाठी काय उपाय कराल?
तुम्हाला तुमच्या नाकातून रक्त येत आहे असे आढळल्यास तर त्वरीत उठून बसा अथवा उभे रहा ज्यामुळे तुमचे डोके तुमच्या ह्रदयापेक्षा उंचावर येईल.त्यानंतर तुमचे डोके पुढच्या दिशेने झुकवा व नाकाचा शेंडा धरुन ठेवा.असे दहा मिनिटे केल्याने रक्तप्रवाह थांबेल.लक्षात ठेवा मान पाठीमागे झूकवू नका कारण त्यामुळे रक्त घशात उतरण्याची शक्यता असते.अशा परिस्थितीत जास्त ताण घेऊ नका व २४ तासांच्या आत पुन्हा नाक साफ करु नका कारण यामुळे पुन्हा नाकातून रक्त येण्याची शक्यता असते.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock