असं म्हणतात की लग्न हे लोणच्या प्रमाणे असते ते जितके मुरतं तितकी त्याची गोडी अवीट ! मग साथीदार निवडताना तुम्ही तो तुमच्या आवडीने आणि पूर्ण वेळ घेऊन त्याची पारख करून निवडाल. की अरेंज मॅरेज करून हळूहळू तुमच्या नात्यांतील पदर उलगडत सहजीवनाची मजा घ्याल ?
दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी पाठोपाठ आता ‘ तू हि रे’ या आगामी चित्रपटातून सई , स्वप्नील आणि दिग्दर्शक संजय जाधव हे त्रिकुट ‘हॅट्रीक’ करण्याच्या तयारीत आहे. आजच प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर मधून ग्लॅमरस तेजस्विनी पंडीत, नेहमीपेक्षा हटके लूकमध्ये दिसणारी सई ताम्हणकर आणि रोमॅन्टिक स्वप्नील जोशी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. पण ट्रेलर पाहता या चित्रपटातील ‘डायलॉग’ पुन्हा भाव खाऊन जाणार हे नक्की.. मग पहा हा ट्रेलर
व्हिडियो सौजन्य - Dreaming Twenty Four Seven /Youtube channel