Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मी कधीच फेशियल, ब्लिचिंग केलं नाही : तेजस्विनी पंडित ( Exclusive Beauty Secrets )

$
0
0

नेहमीच  साध्या, सोशिक भूमिकेतून समोर आलेल्या तेजस्विनी पंडितचा ‘ तू हि रे’ मधील ग्लॅमरस अंदाज सार्‍यांचीच वाहवा मिळवतोय. परंतू  एकेकाळी गंभीर पिंपल्सच्या समस्येवर मात करून पुढे आलेली तेजस्विनी फारशी पार्लरमध्ये न जाता स्वतःचं सौंदर्य कस जपते ? हा प्रश्न तुम्हांलाही पडलाय ना ? मग तिच्याशी बातचित करून जाणून घेतलेली ही काही खास एक्सक्लूझिव्ह ‘ब्युटी सिक्रेट्स …..

  •  त्वचेचं रहस्य डाएटमध्ये असते. मग तू कोणता विशेष डाएट पाळतेस ? 

मला खायला खूप आवडते. मी खूप खाते पण अरबट-चरबट न खाता मी थोडं  थोडं खाते. ‘बॅलन्स’ हा माझ्या खाण्यातला प्रमुख घटक आहे. भरपूर ग्रीन टी,  नारळ पाणी आणि अ‍ॅपल्स हे माझ्या दिनक्रमातील अविभाज्य घटक आहेत. डाएट प्रमाणेच व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. परंतू जिमपेक्षा मला रोज पळायला, योगासन करायला किंवा विविध अ‍ॅक्टिव्हिटी करायला खूप आवडतात. व्यस्त वेळांमुळे घरच खाणं नेहमीच मिळत असं नाही.  घरच्या खाण्यासारख दुसर सुख नाही. लोण्यापासून बनवलेले तूप  हे कधीही आरोग्यदायीच असते. पण घरच्या खाण्याबरोबरच मला पास्ता, पाणीपुरी, मॅगी असे पदार्थही आवडतात. पण ते प्रमाणात आणि आठवड्यात एकदा खाणे मी एंजॉय करते.

  • तुझ स्क्रीन केअर रुटीन कसं असतं  ? 

अभिनेत्री असल्याने सतत माझ्या चेहर्‍यावर मेकअप आणि हेव्ही लाईट असतो. त्यामुळे चेहर्‍याची काळजी घेणं गरजेचे आहे. मात्र मी फार ‘पार्लर पार्लर’ गर्ल नाही. मी  अजून कधीच फेशियल किंवा ब्लिचिंग केले नाही. माझा घरच्या घरी चेहर्‍याची काळजी घेण्यावर भर असतो.  रात्री झोपण्यापूर्वी  मी चेहरा स्वच्छ करते. नाईट क्रिम्स लावते. तसेच ग्रीन टी पिण्यावर माझ्यावर भर असतो. यातून मिळणार्‍या अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकांमुळे त्वचा सुधारते. काही वर्षांपूर्वी मी देखील ‘पिंपल्स’च्या दृष्टचक्रातून गेली आहे. अशावेळी डीप्रेस वाटणं स्वाभाविक आहे. परंतू तुमचं मनोबल खचू न देता योग्य उपचार आणि त्यामागील कारण शोधून तेच नष्ट करा.

tejswini pandit

  • त्वचेच्या/ सौंदर्याच्या काही समस्येमुळे खचलेल्यांंसाठी तू काय सांगशील ? 

पिंपल्स सारखी समस्या 100% तुम्हांला निराश करते. यातून मीदेखील गेली आहे. पण तुमच्या गरजेनुसार योग्य उपचार पद्धती निवडा. पिंपल्समागे तीन कारणं प्रमुख कारणं असू शकातात. वयानुसार हार्मोनल बदलांमुळे काहींमध्ये ही समस्या आढळते, काहींमध्ये खाण्या-पिण्याची सवय आड येते तर काही जणांमध्ये हा अनुवंशिक त्रास समजला जातो. त्यामूळे एकदा तुम्हांला मूळ कारण समजल तर त्यावर उपचार  करणे शक्य होते. केवळ तुमच्या बाह्यस्वरूपावरून तुम्हांला जज करणारी किंवा जवळ राहणारी माणसं ही तुमची नसतात. त्यामुळे अशा लोकांपेक्षा योग्य उपचारांकडे लक्ष द्या. (घरगुती फेसपॅकने करा, मुरूमांचा समूळ नाश ! )

  • तू कोणत्या ब्युटी प्रोडक्टशिवाय राहू शकत नाहीस ? 

मस्कारा आणि लिपबाम हे माझे लॉयलिस्ट फ्रेंड्स आहेत.

  • तुला फक्त 5 ब्युटी प्रोडक्ट  तुझ्याजवळ ठेवण्याची वेळ आली तर ते कोणते असतील ?

मस्कारा , लिपबाम, ब्लश ऑन,  कॉम्पॅक्ट, आयब्रो- शॅडो …  खरतर याच पाच गोष्टी माझ्याकडे असतात.

  • तुला कोणाची ब्युटी भावते ?

मला नितळ, खड्डे नसलेली त्वचा भावते. अभिनेत्री निथा शेट्टी ही अभिनेत्री मला खूप आवडते.  ती एका 2 वर्षाच्या मुलीची आई असूनही तिची त्वचा अप्रतिम आहे.

  • अल्टिमेट ब्युटी टीप  

हसत रहा. आनंदी रहा.

Tejaswini-Pandit8

  • आवडता लीप कलर ?

शक्यतो डार्क कलरची लिपस्टिक लावणं मी टाळते. हा टेंन्ड असो  वा नसो मला नुड / लाईट  कलर आवडतात. कारण मी डोळे  हायलाईट करते.  त्यामुळे जर तुम्ही डोळे हायलाईट करत असाल तर ओठ लाईट ठेवावेत.  किंवा उलट ओठ डार्क ठेवून डोळ्यांचा मेकअप कमी करावा.

  • तू ट्रेडिशनल आणि वेस्टर्न दोन्ही प्रकारच्या भूमिकांमध्ये दिसली आहेस. मग  तू कशात  जास्त कम्फरटेबल असते ?  

मी दोन्ही प्रकारचे कपडे घालते. मी टॉमबॉईश असल्याने जीन्स घालणे मला अधिक आवडतात. मला ट्रेडिशनल लूकमध्ये अधिक कॉम्प्लिमेंट्स मिळतात. पण मी दोंन्ही प्रकारचे कपडे उत्तमरित्या कॅरी करू शकते  याचा मला अभिमान आहे.

  • तुला मिळालेली कॉम्पलिमेंट 

खुप  कॉम्प्लिमेंट्स मिळतात. माझा  गोरा  रंग अनेकांना भावतो. त्याची प्रशंसा  करतात. माझे काही जवळचे  मित्र- मैत्रिणी यावरून माझी थट्टा करतात. त्यातले काही विनोदी म्हणजे –  तू इतकी गोरी आहेस  की तुझ्या हाता-पायाच्या   नसांमधून होणारा  रक्तप्रवाहही दिसेल. किंवा ‘ मस्तानी नंतर तूच !  पानाचा विडा खाल्ल्यानंतर तुमच्याही गळ्यातून आत जाणारा  रस दिसेल. थट्टेचा भाग बाजूला  ठेवा.  पण  माझ्याहूनही सुंदर मुली जगात आहेत.  आणि खरं सौंदर्य  हे  तुमच्या  मनात  असतं

  • तुझी ब्युटीची  व्याख्या काय आहे? 

आनंदी आणि आरोग्यदायी जीवनतच  खरं  सौंदर्य आहे.


मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>